26/01/2024
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन..❤️🇮🇳
“उत्सव तीन रंगांचा, आकाशी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला…!
भारत देशाला मानाचा मुजरा !”
“स्वातंत्र्यवीरांना करुया, शतशः प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!”🙏🏼💖🇮🇳
04/07/2023
बच्चेकंपनीने अतिशय सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने _"गुरुपौर्णिमा"_ साजरी करून धक्काचं दिला... लेकरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे... आपणास देखील #गुरुपौर्णिमेच्या_अगणित_शुभेच्छा.!
🙏💐🌹
01/07/2023
🩸 #निस्वार्थ_रूग्ण_सेवा_परिवार🩸
#भव्य_उद्घाटन_सोहळा
दि :- 02/07/2023 वार - रविवार
वेळ :- सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत
निस्वार्थ रुग्ण सेवा परिवार यांच्याकडून सूर्योदय बालगृहातील मुलांना रक्ताची गरज भासते त्यासाठी आम्ही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
भव्य रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित व्हा🙏🏻
रक्तदान हेच श्रेष्ठदान आपण निस्वार्थ रूग्ण सेवा परिवाराची सुरुवात सूर्योदय बालगृह पासून सुरू करत आहे.
मी रक्तदान करतो तुम्ही पण रक्तदान करा तुमच्या पंधरा मिनिटांमध्ये कोणा एका गरजू रुग्णाचा जीव वाचेल त्याला जीवनदान मिळेल.. 🙏🩸
स्थळ :- सूर्योदय बालगृह स्व.भरतीया स्मृती भवन महर्षी वाल्मिकी नर्सिंग कॉलेज जवळ बसेरा कॉलनी मलकापूर अकोला
टिप :- ज्या रक्तदात्याला रक्तदान करायची इच्छा असेल त्यांनी संपर्क साधावा.
शिवराज पाटील :-9028233077
अतुल भांगे :-7276707919
12/06/2023
"जागतिक बालकामगार विरोधी दिन"
मुलं हीच राष्ट्राची संपत्ती आहे. देशाचा आधारस्तंभ आहेत. बालकांना कामगार बनवून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका. त्यांचे आयुष्य शिक्षणाने घडवू द्या. तरच त्यांचे उद्याचे भविष्य उज्वल होईल..!
#जागतिक_बालकामगार_विरोधी_दिन..!
12/06/2023
राष्ट्रसंत अध्यात्मिक गुरु परम पूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन डॉ.उदयसिंह (भय्यूजी महाराज) देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..
🙏💐🌹
06/06/2023
आज मातीला सूर्य लाभला, शिव सुंदर केशरी!
आज आमचा राजा बसला, तख्त मराठी वरी!!! ⛳
विचार, धाडस, कृती, मावळे आणि युक्ती यांचा एकत्रित संगम करून स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवण्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या थोर राजा शिवबाचा आज राज्याभिषेक सोहळा!
शत्रूंशी दोन हात करताना लागणारे गुण, मावळ्यांना प्रथम स्थानी ठेवण्याचा मोठेपणा अन् आपल्या माणसासाठी अंगी असणारा कनवाळूपणा यामुळे सत्यात उतरले हे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न!
हा त्यांच्या धैर्याचा, एकजुटीचा आणि कर्तृत्वाचा विजय आहे!
महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे !
#शिवराज्याभिषेक #शिवराज्याभिषेकसोहळा
23/04/2023
ागतिक_पुस्तक_दिवस,
पुस्तकांसाठी घर बांधणारे,
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर म्हणतात,
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर,एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या.
रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल,
तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.
26/01/2023
#भारतीय #प्रजासत्ताक #दिनाच्या #हार्दीक #सदिच्छा!
भारतीय संविधानाला अपेक्षित भारतीय नागरिक तयार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी भारतीय संविधानातील मूल्यांचा अंगिकार करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मुलांमध्ये लोकशाही रुजवण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध असायला हवं. मुलं रोज मोठी होत असतात, १८ वर्षाची झाल्यावर ती कायद्याने सज्ञान होत असतात. त्यामुळे जन्मल्यापासूनच मुलांना संविधानाबद्दल माहिती देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे!
#प्रजासत्ताक_दिन_चिरायू_होवो!