Nilesh Nikam- निलेश निकम

Nilesh Nikam- निलेश निकम

Share

श्री.निलेशभाऊ प्रकाश निकम.
निर्भीड, जनतेच्या हक्कासाठी लढणारा, महा घोटाळे यांची पोलखोल.

11/11/2025

आपल्या सेवेसाठी.. मी आहे तयार..
आपल्या कुटुंबातील हक्काचा माणूस..
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम..

25/01/2025

साहेब मला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही... पण जर कुणी दारू पिऊन माझ्या भागामध्ये डांग डिंग करत असेल तर तो कोणीही असो त्याला मी सुट्टी देणार नाही मग कुणाला काय समजायचे ते समजा, गुन्हा तर गुन्हा ... वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे मला म्हणतात प्रशासनाला दाद मागा म्हणून तुमच्याकडे तक्रार केली तुम्ही काय कारवाई केली ???? कागदी घोडे नुसते नाचून उपयोग नाही !!! असो पोलीस प्रशासनावरती ताण न येण्यासाठी उद्याचा आंदोलन हे स्थगित करण्यात येत आहे माझ्या तमाम कार्यकर्त्यांनाही या मेसेज वरून मी सांगत आहे...
आपल्या कुटुंबातील हक्काचा माणूस..
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम..

19/01/2025

📍खरंतर सामान्य लोकां च्या समस्या मार्गी लावून समस्यांचे निवारण करणे नव्या कल्पना समजून घेणे हा निश्चितच माझ्यासाठी समाधान देणारा आणि या जनता दरबाराचे यश अधोरेखित करणारा आहे. समाजाच्या सर्व घटकातील नागरिकांची उपस्थिती आणि मोठा सहभाग आहे.. हा जनतेचा दरबार आहे ..
जनता दरबारच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी जनसंवादातून जनतेच्या अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच त्वरित मार्गी लागतील अशी कामे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकरणे कालच मार्गी लागली ...अडीअडचणी सोडवण्यासाठीचा माझा संकल्प जनता दरबारच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. गोखलेनगर, जनवाडी भागातील अडीअडचणी जाणून घेणे व त्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.

आपल्या कुटुंबातील हक्काचा माणूस ..
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम..

19/01/2025

छत्रपती शिवाजीनगर भागातील वन विभागाच्या कार्यालयात रात्रीच खेळ चाले ... पोस्ट नक्की वाचा आणि आवडली तर शेअर करा..

या फॉरेस्ट ऑफिसर च करायचं काय तुम्ही सांगा ?? फॉरेस्ट वर्दीवर असताना पूर्णपणे दारूच्या नशेत आणि कारवाई करण्यासाठी आला आणि कारवाई न करता निघून गेला .. का तर त्याला एकच प्रश्न विचारला साहेब तुम्ही दारू पिलेत का त्याचं त्याला उत्तर देता आलं नाही म्हणून त्यांनी धक्काबुक्की करत स्वतःच्या पदाचा गैरवापर केला ... याच्यावरती कारवाई झाली पाहिजे... तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिसांसमोर आश्वासन दिले त्याच्यावरती कारवाई करू म्हणून... या अधिकाऱ्यांच्या माज बघा बिंदास बोलतोय आणि बेधडक दारू पिऊन वर्दी वरती कारवाई करायला आलाय ... मान फक्त वर्दीचा ठेवलाय .. नाहीतर याला चांगला धडा शिकवला असता.. धक्काबुक्की तर केलीच त्यांनी आणि बोलला कुठून कुठून गोळ्या घालेल हे तुला तुझ्या समजणार नाही ... वास्तविक पाहता याचे वरिष्ठ अधिकाऱ्याचे आणि आमच्या भागातील एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचे घनिष्ठ संबंध आहे असं त्यांनी सांगितलं आणि तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून दाखवतो असा हि बोलला पोलीस आमचं काही वाकड करू शकत नाही आणि हा माणूस चक्क तिथून निघून गेला ... ज्यावेळेस मार्शल आले त्यांना सुद्धा या अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केली आहे असे आपल्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले त्याबाबतची स्टेशन डायरी करण्यास मी विनंती केली आहे आता तुम्ही सांगा या अधिकाऱ्याचं करायचं काय????

16/01/2025

रणधुरंदर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन निमित्त त्यांना त्रिवार मानाचा मुजरा !

सिंहासनाधिश्वर धरी सुवर्णछत्र l
मृत्युंजयी महानायक जय शंभोरौद्र l
न्यायमूर्ती पंडीत धर्मशास्त्र l
संस्कृत ब्रज काव्य रचे नृप शंभोरौद्र l
🚩🚩 स्वराजाच्ये धाकले धनी 🚩🚩

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन
१६ जानेवारी १६८१ स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा रायगडावरती संपन्न झाला होता.हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन! धैर्य, शौर्य, चातुर्य, बुद्धिमत्ता यांनी त्यांचे चरित्र सदैव तेजाने झळाळत आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्म, भाषा अशा अनेक क्षेत्रांत त्यांचे कर्तृत्व प्रेरणा देत राहील. त्रिवार मानाचा मुजरा !

#छत्रपती_संभाजी_महाराज
#मराठीएकीकरणसमिती #संभाजीमहाराज #स्वराज्यरक्षक

26/11/2024

जिसे भगवा से प्यार नहीं, उसे यहां रहने का अधिकार नहीं।

अरे लाज वाटली पाहिजे आमच्या छत्रपतींच्या स्वराज्यात लातूरच्या विधानसभेच्या विजय जल्लोष असला कसला ??? देशमुख साहेब हे काय चाललय तुमच्या राज्यात ??? टिपू सुलतान यांचे छापील फलक मिरवणुकीत झळकतात , तसेच हातात हिरवे झेंडे घेऊन ते फडकतात??? मला उत्तर द्या मी आपले उत्तर ची वाट बघतोय ... माझा मोबाईल नंबर 9763395222

जेव्हा उठेल हिंदूंची तलवार तेव्हा एकच गोंधळ उडून जाईल,वाद झाला तरी चालेल, पण नाद फक्त भगव्याचाच झाला पाहिजे..

जय भवानी... जय शिवराय...


18/08/2024

" जपावे या बंधनास निरामय भावनेने, जसे जपले हळुवार मुक्ताई ज्ञानेश्वराने "
#राखी एक विश्वास !
राखी एक धागा आपूलकीचा!
राखी एक नातं बहिण-भावाचं!
राखी एक नातं प्रेमाचं अन् विश्वासाचं!
जगातलं सर्वात सुंदर, शब्दांत व्यक्त करता न येणारं, अपार जिव्हाळा व प्रेमाचं नातं म्हणजेचं भावा-बहीणीचं नातं....

#रक्षाबंधन #राखी
#रक्षाबंधन

Want your business to be the top-listed Government Service in Ambegaon?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Ambegaon