Amravati City Police

Call Directions Website Contact the organization

Amravati City Police This is the official account of Amravati City Police. Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 06 pm. For any emergency, please dial 112.

अमरावती शहर पोलीसांचे अधिकृत खाते.
आपत्कालीन संपर्क: ११२ / ०७२१-२५५१००० / ९९२३०७८६४६
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

27/10/2026
🚫💊 ड्रग्स फ्री अमरावती – हाफ मॅरेथॉन २०२६ 🏃‍♂️🏃‍♀️अंमली पदार्थविरोधी विशेष जनजागृती व कारवाई मोहिमेच्या अनुषंगाने, पोलीस...
25/10/2026

🚫💊 ड्रग्स फ्री अमरावती – हाफ मॅरेथॉन २०२६ 🏃‍♂️🏃‍♀️

अंमली पदार्थविरोधी विशेष जनजागृती व कारवाई मोहिमेच्या अनुषंगाने, पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर यांच्या वतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ‘ड्रग्स फ्री अमरावती’ हाफ मॅरेथॉनमध्ये जवळपास ३,५०० धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मा. विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या उपस्थितीत तसेच अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या सहभागाने पार पडलेल्या या उपक्रमातून अमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश देण्यात आला.

धावपटूंनी उत्साहाने सहभाग घेत “ड्रग्स फ्री अमरावती!” असा नारा देत तरुणाईला व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.

💙 नशामुक्त युवा, सुरक्षित समाज!

🚫 Say No to Drugs, Yes to Life!

#नशामुक्तअमरावती #व्यसनमुक्तभारत

🚨 बँक खाते आणि WhatsApp अकाउंट भाड्याने देणे म्हणजे सायबर गुन्ह्यांना आमंत्रण! 🚨💸 पैशांच्या आमिषाला बळी पडून आपले बँक खा...
25/10/2026

🚨 बँक खाते आणि WhatsApp अकाउंट भाड्याने देणे म्हणजे सायबर गुन्ह्यांना आमंत्रण! 🚨

💸 पैशांच्या आमिषाला बळी पडून आपले बँक खाते, ATM कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा WhatsApp अकाउंट इतरांना वापरण्यास देऊ नका. तुमच्या खात्यांचा वापर सायबर फसवणूक, बनावट व्यवहार आणि इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी होऊ शकतो.

🔐 सायबर सुरक्षिततेसाठी लक्षात ठेवा:
✅ बँक खाते किंवा WhatsApp अकाउंट कोणालाही भाड्याने देऊ नका.
✅ OTP, PIN, पासवर्ड किंवा WhatsApp लिंकिंगसाठीचा QR कोड शेअर करू नका.
✅ अनोळखी व्यक्तींच्या पैशांच्या आमिषाला बळी पडू नका.
✅ संशयास्पद मेसेज व लिंकपासून सावध राहा.
✅ आपले खाते गैरवापरासाठी वापरले जात असल्याचे आढळल्यास त्वरित संबंधित बँक व पोलिसांना कळवा.

📞 सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा.

25/10/2026

टोल, FASTag आणि वाहतूक दंड भरण्याच्या फसवणुकीपासून सावध!

सावधान! तुमचा WhatsApp अकाउंट हॅक होऊ शकतो! 📱⚠️खोटे QR कोड, OTP मागणी, बनावट व्हेरिफिकेशन लिंक आणि अनोळखी लिंकद्वारे साय...
23/10/2026

सावधान! तुमचा WhatsApp अकाउंट हॅक होऊ शकतो! 📱⚠️

खोटे QR कोड, OTP मागणी, बनावट व्हेरिफिकेशन लिंक आणि अनोळखी लिंकद्वारे सायबर गुन्हेगार तुमचे WhatsApp अकाउंट ताब्यात घेऊ शकतात.

🔐 सायबर सुरक्षिततेसाठी या गोष्टी लक्षात ठेवा:
✅ अनोळखी QR कोड स्कॅन करू नका.
✅ कोणालाही OTP शेअर करू नका.
✅ WhatsApp मध्ये Two-Step Verification सुरू ठेवा.
✅ Linked Devices नियमित तपासा.
✅ संशयास्पद लिंक आणि मेसेजपासून सावध राहा.

🚨 तुमचे WhatsApp अकाउंट हॅक झाल्यास त्वरित योग्य ती कारवाई करा आणि सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवा.

📞 सायबर हेल्पलाइन: 1930
🌐 अधिकृत संकेतस्थळ: https://cybercrime.gov.in

23/10/2026

Online Gaming Scams: Stay Safe from | Maharashtra Cyber

22/10/2026

ऑनलाईन गेमिंग धोका ठरू शकते!
#ऑनलाइनगेमिंग #गेमिंगचेधोके #मोबाईलगेम #जनजागृती

दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, अमरावती शहर येथील कवायत मैदानावर आयोजित पोलीस स्मृतीदिन कार्यक्रमात प्रमुख अतिथ...
21/10/2026

दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, अमरावती शहर येथील कवायत मैदानावर आयोजित पोलीस स्मृतीदिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी मा. श्रीमती उज्वला मनोहर नंदेश्वर, जिल्हा व सत्र न्यायाधीश, अमरावती यांच्या उपस्थितीत शहीद पोलीस जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी मा. श्रीमती नयना गुंडे (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त, अमरावती; मा. श्री महेश पाटील (भा.पो.से.), पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र; मा. श्री राकेश ओला (भा.पो.से.), पोलीस आयुक्त, अमरावती शहर, तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी,व प्रतिष्ठित नागरिक व पोलीस अधिकारी-अंमलदारांचे कुटुंबीय उपस्थित होते.

🚨 अमरावती शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!अपहरण झालेल्या ५ वर्षीय बालकाची अवघ्या २४ तासांच्या आत सुखरूप सुटका!दि. १८ ऑक्...
21/10/2026

🚨 अमरावती शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!

अपहरण झालेल्या ५ वर्षीय बालकाची अवघ्या २४ तासांच्या आत सुखरूप सुटका!

दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी राजापेठ येथील ओसवाल भवन परिसरातून ५ वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची घटना घडली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व राजापेठ पोलीस ठाण्याची एकूण १० पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर आमगाव पोलीस, जि. गोंदिया यांच्या सहकार्याने अपहृत बालकाची २४ तासांच्या आत सुखरूप सुटका करण्यात आली. संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Address

Police Commissioner Office, Maltekdi Road, Camp
Amravati
444602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amravati City Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amravati City Police:

Shortcuts

Share