Amravati Municipal Corporation

Call Directions Website Contact the organization

Amravati Municipal Corporation Official page of Amravati Municipal Corporation, the local governing body of Amravati city.

For the development of Amravati and Amravatikars, AMC makes policies and plans. To bridge the gap between the governing body and the governed, AMC has created this page. Moreover, AMC also has its presence on Instagram and Twitter with the USERNAME: . Follow the pages to stay updated with about AMC's work and governance.

थकीत मालमत्ता कराविरोधात मनपाची कारवाई; ४० फ्लॅट व माधव लॉनला जप्तीची नोटीसअमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. ३ अंतर्गत द...
07/10/2026

थकीत मालमत्ता कराविरोधात मनपाची कारवाई; ४० फ्लॅट व माधव लॉनला जप्तीची नोटीस

अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. ३ अंतर्गत दस्तूरनगर परिसरातील नंदनवन कॉलनी येथे मागील तीन वर्षांपासून मालमत्ता कर थकीत असल्याने एकूण ४० फ्लॅटवर जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या.

तसेच, याच परिसरातील माधव लॉनचा थकीत मालमत्ता कर लक्षात घेता तेथेही नोटीस बजावण्यात आली.

थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी महानगरपालिकेकडून नियमानुसार कारवाई सुरू असून, नागरिक व मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरून सहकार्य करावे.

वेळेत कर भरा — शहराच्या विकासाला हातभार लावा!

स्वच्छतेसाठी विशेष तपासणी मोहीम; ४ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईअमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. ३ दस्तुरनगर अंतर्गत द...
07/10/2026

स्वच्छतेसाठी विशेष तपासणी मोहीम; ४ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. ३ दस्तुरनगर अंतर्गत दस्तुरनगर चौक परिसरात स्वच्छता, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर रोखणे आणि ओला-सुका कचरा वर्गीकरणाबाबत विशेष तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

तपासणीदरम्यान दोन डस्टबिनचा योग्य वापर न करणाऱ्या ४ व्यावसायिकांवर प्रत्येकी ₹१,००० दंड आकारण्यात आला. या कारवाईत एकूण ₹४,००० दंड वसूल करण्यात आला.

नागरिक व व्यावसायिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करावे आणि प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले.

स्वच्छ अमरावतीसाठी मनपाची तपासणी व जनजागृती मोहीम सातत्याने सुरू!

गाडगेनगर परिसरात प्लास्टिक प्रतिबंधासाठी विशेष मोहीम; ₹५,००० दंड वसूलअमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. १ रामपुरी कॅम्प अ...
07/10/2026

गाडगेनगर परिसरात प्लास्टिक प्रतिबंधासाठी विशेष मोहीम; ₹५,००० दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. १ रामपुरी कॅम्प अंतर्गत गाडगेनगर प्रभाग परिसरात प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

गाडगेबाबा मंदिरासमोरील परिसरात प्लास्टिकचा वापर, स्वच्छता तसेच दोन डस्टबिनची उपलब्धता याबाबत तपासणी करण्यात आली. हॉकर झोनमधील विक्रेत्यांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या व आढळलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले.

तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्याने ₹५,००० दंड वसूल करण्यात आला.

प्लास्टिकमुक्त अमरावतीसाठी मनपाची कारवाई सुरूच राहणार!
नागरिक व व्यावसायिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून सहकार्य करावे.

स्वच्छतेसाठी विशेष तपासणी मोहीम; ₹७ हजारांचा दंड वसूलअमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. २ राजापेठ अंतर्गत समर्थ शाळेसमोरी...
06/10/2026

स्वच्छतेसाठी विशेष तपासणी मोहीम; ₹७ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. २ राजापेठ अंतर्गत समर्थ शाळेसमोरील परिसरात स्वच्छता व प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

तपासणीदरम्यान प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर तसेच ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र डस्टबिनचा वापर याबाबत पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३ आस्थापनांवर कारवाई करून एकूण ₹७,००० दंड वसूल करण्यात आला.

नागरिक व व्यावसायिकांना परिसर स्वच्छ ठेवणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे आणि प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले.

स्वच्छ अमरावतीसाठी नियमांचे पालन आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा!

इतवारा बाजारात प्लास्टिकमुक्तीसाठी मनपाची तपासणी मोहीमअमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. १ रामपुरी कॅम्प अंतर्गत इतवारा ब...
06/10/2026

इतवारा बाजारात प्लास्टिकमुक्तीसाठी मनपाची तपासणी मोहीम

अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. १ रामपुरी कॅम्प अंतर्गत इतवारा बाजार परिसरात प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

यावेळी दुकानदारांना परिसरात स्वच्छता राखणे तसेच ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी दोन डस्टबिनचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्याने विविध दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ₹८,००० दंड वसूल करण्यात आला.

स्वच्छता राखूया, प्लास्टिकचा वापर टाळूया — स्वच्छ व प्लास्टिकमुक्त अमरावतीसाठी सहकार्य करूया!

बडनेरा झोनमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष मोहीमअमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ४ बडनेरा अंतर्गत साईनगर प्रभ...
06/10/2026

बडनेरा झोनमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष मोहीम

अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ४ बडनेरा अंतर्गत साईनगर प्रभाग परिसरात प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईत ९ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी जैन प्रोव्हिजनवर ₹५,००० दंड आकारून वसूल करण्यात आला.

हॉकर्स झोनमधील विक्रेते व नागरिकांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

स्वच्छ अमरावती, प्लास्टिकमुक्त अमरावती — पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा!

आशियाई सुवर्णविजेत्या कुमकुम मोहोडचा मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार! आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अमरावतीचे ...
06/10/2026

आशियाई सुवर्णविजेत्या कुमकुम मोहोडचा मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार!

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अमरावतीचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या कुमकुम अनिल मोहोड हिचा अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते मंगळवारी, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सत्कार करण्यात आला.

यावेळी कुमकुमचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तिच्या मेहनतीला, जिद्दीला आणि सातत्यपूर्ण सरावाला मिळालेले हे यश अमरावतीकरांसाठी अभिमानास्पद आहे.

“कुमकुमच्या यशातून अमरावतीतील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल,” असा विश्वास आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी व्यक्त केला.

यावेळी उपायुक्त नरेंद्र वानखडे, अभिनेते भारत गणेशपुरे, महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर व प्रशिक्षक प्रफुल डांगे उपस्थित होते.

अमरावतीची शान, देशाचा अभिमान — कुमकुमला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

06/10/2026

आशियाई सुवर्णविजेत्या कुमकुम मोहोडचा मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार!

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अमरावतीचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या कुमकुम अनिल मोहोड हिचा अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते मंगळवारी, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सत्कार करण्यात आला.

यावेळी कुमकुमचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तिच्या मेहनतीला, जिद्दीला आणि सातत्यपूर्ण सरावाला मिळालेले हे यश अमरावतीकरांसाठी अभिमानास्पद आहे.

“कुमकुमच्या यशातून अमरावतीतील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल,” असा विश्वास आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी व्यक्त केला.

यावेळी उपायुक्त नरेंद्र वानखडे, अभिनेते भारत गणेशपुरे, महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर व प्रशिक्षक प्रफुल डांगे उपस्थित होते.

अमर

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी मोजमाप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!अमरावती महानगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभिय...
05/10/2026

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी मोजमाप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अमरावती महानगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान अंतर्गत ADIP-SSA (समग्र शिक्षा) योजनेंतर्गत ० ते १८ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ALIMCO संस्थेच्या तज्ज्ञ पथकामार्फत मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात अस्थिव्यंग, सी.पी., बहुविकलांग, कर्णबधिर व अल्पदृष्टी प्रवर्गातील १४७ दिव्यांग विद्यार्थ्यांची मोजमाप तपासणी करण्यात आली असून, त्यांना २३८ सहाय्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सदैव त्यांच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.

प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला सक्षम बनविण्यासाठी अमरावती महानगरपालिकेचा सातत्यपूर्ण प्रयत्न!

अमरावतीच्या कुंकुम मोहोडची सुवर्णभरारी; दुसऱ्या सुवर्णपदकाने वाढविला अभिमान! अमरावतीची गुणवान कन्या कुंकुम मोहोड हिने आश...
03/10/2026

अमरावतीच्या कुंकुम मोहोडची सुवर्णभरारी; दुसऱ्या सुवर्णपदकाने वाढविला अभिमान!

अमरावतीची गुणवान कन्या कुंकुम मोहोड हिने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये आपल्या दमदार कामगिरीने अमरावतीचा गौरव उंचावला आहे!

महिला रिकर्व्ह सांघिक तिरंदाजी प्रकारात कुंकुम मोहोड, कीर्ती आणि अंकिता या भारतीय त्रिकुटाने शानदार कामगिरी करत दुसरे सुवर्णपदक पटकावले.

कुंकुमची ही सुवर्णकामगिरी तिच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित असून संपूर्ण अमरावतीकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

अमरावती महानगरपालिकेतर्फे कुंकुम मोहोड आणि संपूर्ण भारतीय तिरंदाजी संघाचे हार्दिक अभिनंदन! तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

लक्ष्य सुवर्णपदकाचे, अभिमान अमरावतीचा

Address

Raj Kamal Square
Amravati
444601

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am

Telephone

+917212576482

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amravati Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amravati Municipal Corporation:

Shortcuts

Share