Bhimrao Dhonde

Call Directions Contact the organization

Bhimrao Dhonde मा.आमदार (231) आष्टी,मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट ).
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ बीड जिल्हा अध्यक्ष

08/10/2026

भावपूर्ण श्रद्धांजली!

आजची घटना अत्यंत दुःखद आहे. चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे.

मी जेव्हा चित्रपटसृष्टीत काम करत होतो, त्या वेळी ‘तहान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी मी त्यांना माझ्या तहान मराठी चित्रपटात माझ्यासोबत काम करण्याची विनंती केली होती. त्यांनीही माझ्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना वेळ देता आला नाही.

नाना पाटेकर हे केवळ एक महान अभिनेते नव्हते, तर आपल्या दमदार अभिनयाने आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार होते. त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आजही एक अविस्मरणीय आठवण म्हणून मनात राहील.

नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेच; पण सामाजिक बांधिलकी जपत ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देत माणुसकीचा आदर्शही निर्माण केला. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना व असंख्य रसिकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली!

#नाना_पाटेकर #भावपूर्ण_श्रद्धांजली #विनम्र_अभिवादन #नाम_फाउंडेशन #शेतकऱ्यांचे_कैवारी #सामाजिक_बांधिलकी #शेतकरी_सेवा #माणुसकीचा_धर्म #मराठी_चित्रपटसृष्टी #अविस्मरणीय_व्यक्तिमत्त्व

NCPSpeaks_Official

भावपूर्ण श्रद्धांजली! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे.आपल्या द...
08/10/2026

भावपूर्ण श्रद्धांजली!

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे.

आपल्या दमदार अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि प्रभावी संवादफेकीने त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण केले. विविधांगी भूमिका साकारत त्यांनी कोट्यवधी रसिकांच्या मनावर अमीट ठसा उमटवला.

त्यांच्या असंख्य भूमिका आणि अविस्मरणीय अभिनय सदैव रसिकांच्या स्मरणात राहतील.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

भावपूर्ण श्रद्धांजली!

#नाना_पाटेकर #भावपूर्ण_श्रद्धांजली #नटसम्राट

सावरगाव घाट, ता. आष्टी येथे कै. हौसराव बाजीराव म्हस्के (सरपंच) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त उपस्थित राहून भावपूर...
07/10/2026

सावरगाव घाट, ता. आष्टी येथे कै. हौसराव बाजीराव म्हस्के (सरपंच) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कै. हौसराव म्हस्के यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी तसेच सामाजिक कार्यासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या सेवाभावी कार्याला आणि प्रेमळ स्मृतींना विनम्र अभिवादन.

यावेळी ह.भ.प. आदिनाथ महाराज आंधळे, ह.भ.प. भानुदास महाराज म्हस्के, ह.भ.प. अडसरे महाराज, ॲड. साहेबराव म्हस्के, पंढरीनाथ चंदनशिव (माजी सरपंच), भाऊसाहेब म्हस्के, बाबासाहेब पिसोरे, महादेव नाना वायभासे, औटी सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कै. हौसराव बाजीराव म्हस्के यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि सेवाभावी कार्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने योगदान दे...
06/10/2026

सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि सेवाभावी कार्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांना ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आपल्या सेवाभावी कार्याचा हा गौरव समाजहितासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या कर्तृत्वाचा आणि सामाजिक योगदानाचा हा सन्मान अधिकाधिक लोकांना समाजसेवेची प्रेरणा देणारा ठरो, हीच सदिच्छा!

आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!

#लोकमतसखीसन्मान #हार्दिकअभिनंदन

छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत आमदार सतीश च...
05/10/2026

छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत आमदार सतीश चव्हाण,आमदार श्रीमती सना मलिक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते डॉ.अजयदादा धोंडे,सुनील मगरे,चिन्मय गाडे,अमर पाटील,दत्ता भांगे,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,
युवक कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

Ajit Pawar Sunetra Ajit Pawar
Sunil Tatkare
Dhananjay Munde
NCPSpeaks_Official

कर्तृत्ववान लोकनेत्या स्व. केसरबाई (काकू) क्षीरसागर यांना विनम्र अभिवादन! 📍 बीड | बीड जिल्ह्याच्या माजी खासदार, ज्येष्ठ ...
04/10/2026

कर्तृत्ववान लोकनेत्या स्व. केसरबाई (काकू) क्षीरसागर यांना विनम्र अभिवादन!

📍 बीड | बीड जिल्ह्याच्या माजी खासदार, ज्येष्ठ लोकनेत्या स्व. केसरबाई (काकू) क्षीरसागर यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

जनसेवेचा ध्यास, लोकहितासाठी केलेले कार्य आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांमुळे त्यांनी बीड जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला.

त्यांचे कार्य आणि स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील.

स्व. केसरबाई (काकू) क्षीरसागर यांना भावपूर्ण आदरांजली!

Jaidatta Kshirsagar
Sandeep Kshirsagar

बीड जिल्ह्याच्या माजी खासदार, कर्तृत्ववान लोकनेत्या स्व.केसरबाई (काकू) क्षीरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...
04/10/2026

बीड जिल्ह्याच्या माजी खासदार, कर्तृत्ववान लोकनेत्या स्व.केसरबाई (काकू) क्षीरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, वंचित आणि गरजू घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणारे त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. जनसामान्यांशी असलेली त्यांची नाळ, समाजहिताची तळमळ आणि लोकसेवेप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला.

लोकसेवेला जीवनाचे ध्येय मानणाऱ्या या कर्तृत्ववान लोकनेत्येच्या स्मृतीस पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!

Jaidatta Kshirsagar
Sandeep Kshirsagar

📍 आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा | दि.03/10/2026कडा, ता. आष्टी येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महारा...
03/10/2026

📍 आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा | दि.03/10/2026

कडा, ता. आष्टी येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून, आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी द्वारा आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय, कडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बीड जिल्ह्यास्तरीय शेतकरी लेखक साहित्य संमेलनाचे उद्घाटन करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो लेखक, साहित्यिक आणि समाजाचा संवेदनशील घटक आहे. शेतकऱ्यांच्या अनुभवांना, संघर्षांना आणि सर्जनशीलतेला साहित्याच्या माध्यमातून व्यासपीठ मिळणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

यावेळी सौ.दमयंतीताई (माईसाहेब) धोंडे,महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते डॉ.अजय दादा धोंडे,चेअरमन राजेंद्र काका धोंडे,ह.भ.प. आंधळे महाराज,भाजपा बीड जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख,आरपीआयचे आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळवे,श्री.सुनील चव्हाण साहेब ( सेवानिवृत्त सचिव महाराष्ट्र शासन),श्री.सतीश साळुंखे,श्री.श्रीपाल सबनीस,श्री.प्रदीप ढवळ,श्री.श्रीधर नांदेडकर,श्री.डॉ.एम.डी.पाटील,प्रा.अंनतराव हंबर्डे,प्रा.भास्कर बडे, सरपंच दादासाहेब जगताप,सरपंच भीमराव पाटील,श्री.बबनराव औटे,माजी सरपंच संतोष भैय्या चव्हाण,श्री.बाबुसेठ भंडारी,प्रा.डॉ.सय्यद अल्लाउद्दीन सर,पत्रकार उत्तमराव बोडखे, पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,संस्थेचे सर्व प्रशासन अधिकारी,पत्रकार बांधव,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते सर यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व कर्मचारीवृंद,विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar
Sunil Tatkare
Dhananjay Munde

#शेतकरीलेखकसाहित्यसंमेलन #बीड #कडा #आष्टी #मराठीसाहित्य #शेतकरी #साहित्यसंमेलन #आनंदरावधोंडे_बाबाजीमहाविद्यालय

मराठी अभिजात भाषा दिवसाच्या सर्व मराठी भाषिकांना हार्दिक शुभेच्छा!
03/10/2026

मराठी अभिजात भाषा दिवसाच्या सर्व मराठी भाषिकांना हार्दिक शुभेच्छा!

Address

Ashti Bidh

Opening Hours

Monday 9am - 11pm
Tuesday 9am - 11pm
Wednesday 9am - 11pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 9am - 11pm
Sunday 9am - 10pm

Telephone

+919423168000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhimrao Dhonde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhimrao Dhonde:

Shortcuts

Share