17/03/2025
आज दि. १७ मार्च २०२५ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी मा. विनोद गोंडुराव खिरोळकर साहेब यांची भेट घेऊन मुकुंदवाडी संजयनगर भागातील विविध विकास कामे त्यामध्ये बुद्ध विहारामध्ये विपश्याना केंद्र, सभागृह, वाचनालय, व्यायाम शाळा उभारणी करून सुशोभीकरण करावे व तसेच ड्रेनेज लाईन नवीन टाकून त्यावर सिमेंट काँक्रीट टाकण्यात यावे याकरिता डीपीसी मधून दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत १ कोटींचा रुपयांचा निधी मंजूर करावा. या मागणीचे निवेदन देण्यात आले, साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच डीपीसीची मिटिंग होणार असून तुमच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री यांना देऊन निधी मंजूर केला जाईल, असे सांगितले, त्या बद्दल साहेबा चे मनापासून आभार यावेळी रिपब्लिकन सेना नेते मा. चंद्रकांत भाऊ रुपेकर व अनेक कार्यकर्ते व मी स्वता उपस्थित होतो.
सदैव आपला
मा. संदिप आ. गायकवाड
11/03/2025
आज दि. ११/०३/२०२५ रोजी मुकुंदवाडी मधील लायन्स क्लब कॉलनी येथे गेले अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाईप लाईनला पाणी येत नाही, या विषयावर अनेक वेळेला मा. चंद्रकांत भाऊ रुपेकर यांच्या नेतृत्ववात आंदोलने केली, परंतु महानगरपालिकेला जाग आली नाही, आता ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न प्रामुख्याने उदयास येतो,त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा लायन्स क्लब कॉलनी गल्ली नं. ६ ७ ८ या तीन गळ्याची पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन नवीन टाकून देण्यात यावी, या मागणीसाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. रणजित पाटील साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले,आमची मागणी तात्काळ न सोडवल्यास जल आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे वतीने प्रशासनाला देण्यात आला, यावेळी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र सदस्य मा. चंद्रकांत भाऊ रुपेकर रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष मा. काकासाहेब गायकवाड रिपब्लिकन सेना विध्यार्थी आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. सचिन निकम रिपब्लिकन सेना युवक मराठवाडा अध्यक्ष मा. संदिप आ. गायकवाड रिपब्लिकन सेना कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष मा. धम्मपाल भुजबळ रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष मा. विकास हिवराळे जिल्हा उपाध्यक्ष मा. गणेश रगडे संजय गायकवाड मनोज दाभाडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.