06/10/2019
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे आज सकाळी आरेच्या जंगल तोडीविरोधात सरकारला प्रश्न विचारायला गेले होते. पण, सरकारने घाबरुन त्यांना अटक केली आहे.
फडणवीस सरकारचा जाहीर निषेध..... 😡😡😡
सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है...
20/05/2019
"एक्झिट पोल काहीही दाखवत असले तरी २३ तारखेचा निकाल आपल्याच बाजूने असेल, अकोला सोलापुरात मी उमेद्वार म्हणून फार वेळ देउ शकलो नाही तरी कार्यकर्ते - पदाधिकारी ह्यांनी ज्या जिददीने लढत दिली त्यासाठी सर्वांचे अभिनदंन"
:- #ऍड.बाळासाहेब आंबेडकर
20/05/2019
30/12/2018
#भीमा_कोरेगाव ह्या ठिकाणी #विजय_स्तंभास अभिवादन करण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2019 या रोजी भारतातून व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनतेचा महासागर लोटणार आहे, व त्यायोगे खासगी वाहनाची कमतरता व मिळण्यास अडचणी ही बाब लक्षात घेऊन,
#माननीय_अमित_भाऊ_भुईगळ महाराष्ट्र प्रदेश महासचिव
यांनी #उपाध्यक्ष_तथा_महाव्यवस्थापक_महाराष्ट्र_राज्य_परिवहन_महामंडळ_मुंबई यांना निवेदनाद्वारे विनंती केली की परिवहन महामंडळाच्या जादा बसेस व मागील त्यास व समूहास बस भीमा कोरेगाव पर्यंत व परतीच्या ठिकाणापर्यंत बसेस सोडाव्यात व त्याचबरोबर खबरदारीची उपाययोजना म्हणून जागोजागी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे,
#शिष्टमंडळामध्ये प्रामुख्याने #उद्धव भाऊ बनसोडे जिल्हा शहराध्यक्ष, #रेखाताई उजगरे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सहसचिव #प्रवीण हिवाळे, जिल्हा शहर महासचिव #प्रभू भाऊ बकले, पश्चिम शहर उपाध्यक्ष #राजू भाऊ उजगरे, #माधवराव काळे तात्या ज्येष्ठ नेते, #पुरुषोत्तम वंजारी काका ज्येष्ठ नेते व #कार्यकर्ते उपस्थित होते व निवेदनावर यांनी स्वाक्ष-या केल्या.
04/09/2018
#भारिप बहूजन महासंघ औरंगाबाद जिल्हा शहर कार्यकरणी आज प्रदेश अध्यक्ष अशोकभाऊ सोनवणे प्रदेश महासचिव अमितभाऊ भुईगळ यांनी जाहिर केली औरंगाबाद #जिल्हाअध्यक्ष जितेंद्रभाऊ सिरसाट.शहर अध्यक्ष उध्दवभाऊबनसोडे.मराठा समाजाचे फुले, शाहु.आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे युवा नेते शिवाजीभाऊ चव्हाण यांची जिल्हा संघटक तर धनगर समाजाचे आक्रमक नेते प्रभुभाऊ बकले यांची जिल्हा शहर महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली तुम्हा सर्वांना पूढील राजकिय सामाजिक कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा......!!
#शूभेच्छूक-आशिष इंगळे,
जिल्हा कार्याध्यक्ष,
भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विध्यार्थी आंदोलन, औरंगाबाद
02/01/2018
प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
सौज्यन्य श्री दिपक भातुसे, झी २४तासं
- संभाजी ब्रिगेडच्या विनंतीवरून मी ही पत्रकार परिषद घेत आहे
- अखिल भारतीय ब्राह्मण सभा, समस्त हिंदु आघाडी आणि पेशव्यांच्या वारसांनी याला विरोध दर्शविला भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमाला विरोध केला होता
- अखिल भारतीय हिंदु महासभेबरोबर आम्ही कार्यक्रमापूर्वी चर्चा केली, त्यांचा विरोध मावळला होता
- गोविंद गायकवाड यांची समाधी उध्वस्त करणार्यांम़ध्ये ४९ आरोपी असून ९ जणांना अटक झाली आहे
- १ तारखेला वडगाव बुद्रुक येथे १५०० लोक एकत्र करण्यात आली होती
- याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र नंतर काळा दिवस साजरा करण्यास पोलीसांनी परवानगी दिली होती
- याला गावातील लोकांचा विरोध झाला, मग याच लोकांनी कोरेगाव स्तंभाकडे येणा-यांवर दगडफेक केली
- अशी परिस्थिती हाताळेल असे कोणीही अधिकारी नव्हते
- मी २ वाजता मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना फोन केला, त्यांना यै घटनेची कल्पनाच नव्हती
- पोलीसांनी यात हलगर्जीपणा केला
- स्तंभाकडे येताना लागणार्या गावातील घरांच्या गच्चीवर दगड ठेवलेले होते
- तिथून दगडफेक करण्यात आली
- शिवराज प्रतिष्ठान आणि हिंदु एकता आघाडी यांनी स्वतच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला लावली आणि गाड्या जाळल्या
- कोरेगाव पासून शिरुर आणि कोरेगाव आणि चाकणपर्यंच्या गावाचे अनुदान बंद करण्यात यावे
- आजही चाकण शिक्रापूर रस्त्यावर अनेक गावातील लोकांनी यांना आश्रय दिला आहे
- याचे सूत्रधार आहेत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे आणि तिसरे सूत्रधार आहेत मांजरीतील घुगे
- यांचा सरकारने बंदोबस्त करावा
- शांतता नांदली पाहिजे
- राग आहे पण सामान्य लोकांना त्रास होऊ नये
- लोकांनी आंदोलन करत असतील तर ते थांबवावे
- मुख्यमंत्र्यांनी शोध मोहीम थांबवावी अन्यथा स्थिती हाताबाहेर जाईल
- शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद करण्याचे मी जाहीर करतो
- ही बंदची हाक महाराष्ट्र लोकशाही आघाडी, महाराष्ट्र डावी आघाडी आणि २५० संघटना मिळून जे फ्रंट तयार झाले होते त्यांनी दिली आहे
- हे आव्हान आम्ही कोणाला देत नाही, त्यामुळे प्रतिआव्हान कुणी देऊ नये
- मला मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या न्यायालयीन चौकशी करू नये
- जर करायची असेल तर यात दलित न्यायाधीश देऊ नये
- भूषण गवई हे मोठे नाव आहे, पण दलितांची घटना म्हणून दलित न्यायाधीश देऊ नये
- गवई यांची सर्वोच्च न्यायालयात बढती होणार आहे, ही चौकशी त्यांच्याकडे गेली तर त्यांची संधी जाईल
- संभाजी ब्रिगेडने स्तंभांला वंदन करण्याच्या कार्यक्रम आयोजित केला होता त्यामुळे याला दोन समाजातील दंगलीचा रंग देऊ नये.
उद्याचा बंद शांततेत पार पाडावा
01/01/2018
कृपया शांतता राखा. आणि संयमाने वाचा.
वढू गावात दगडफेक सुरू होती. सध्या मिळालेल्या माहितीनुसार थांबली आहे. पुण्याच्या डीवायएसपी तेजस्वी सातपुते यांच्याशी बोलणे झाल्यावर पोलिसांची जादाची कुमक पाठवली असल्याचे सांगितले आहे. पोलिसांवरही गावकऱ्यांनी दगडफेक केली आहे. ज्या ५४ जणांच्या नावाने शिक्रापूर पोलीस स्टेशनला एट्रोसिटी झाली आहे त्यातले बहुसंख्य ग्रामसभेचे सदस्य आहेत. अजून कुणालाही अटक झालेली नाही. पण एफआयआर झाल्यापासून दगडफेक सुरू झाली होती.
नाशिकच्या दंगलींप्रमाणेच पुढचा घटनाक्रम आहे. सर्व मोबाईल टॉवर बंद केलेले आहेत. टीव्ही केबल्स बंद आहेत. दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. उद्या सकाळी ११ वाजता गोविंद महार यांच्या समाधीपासून शिक्रापूर पोलीस स्टेशनला मोर्चा निघणार आहे.
पुण्यातील परिसरातील आणि जवळच्या जिल्ह्यातील बांधवांनी उद्या घटनास्थळी पोहोचावे. संचारबंदी अजून लागू झालेली नाहीये.
कुणीही विनाकारण उथळ पोस्ट वगैरे टाकू नका. आगीत तेल ओतू नका. दंगल होऊ न देणं महत्वाचे आहे. त्या गावात मागासवर्गीयांची घरं कमी आहेत. कायदेशीर कारवाई काय करता येईल हे पाहणे जास्त गरजेचे आहे.
01/01/2018
भिमा कोरेगाव इथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या भीमसैनिकांवर सरकारच्या व पोलीस प्रशासनाच्या संमतीने समाजकंटक, दवंशद्रोही गटाकडून झालेल्या दगडफेकीचा जाहीर निषेध .
भीमसैनिकांवर झालेल्या भ्याड दगडफेकिसाठी मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत .
मुख्यमंत्र्यांचाही जाहीर निषेध.
26/12/2017
25 डिसेंबर 1927 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करून खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना धर्मांधतेच्या गुलामीतून मुक्त केले. त्यामुळे 25 डिसेंबर स्त्री मुक्ती दिन पाळला जातो.
स्त्री मुक्ती दिनानिमित्त औरंगाबाद भा.रि.प.- बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष, भिमयोद्धा मा.नगरसेवक अमित भाऊ भुईगळ यांच्या मार्गदर्शनाने स्त्री मुक्ती परिषद घेण्यात आली.
या वेळी प्रमुख वक्ते :-वैशाली मोरे , निरीक्षक समाज कल्याण, कार्यालय,औरंगाबाद
अध्यक्ष :- रेखाताई उजगरे, शहर उपाध्यक्ष , औरंगाबाद
प्रमुख पाहुणे :-अर्चना मगरे , सुनीता डोंगरदिवे, वैशाली भोकरे व पदाधिकारी उपस्थित होते.
22/12/2017
सन १९८९ ला व्ही पी सिंगाचे सरकार केंद्रात आले त्या पक्षाशी अॅड. बाळासाहेब आंबेडकरांची युती होती. अॅड. बाळासाहेब आंबेडकर युती किंवा आघाडी करतांना तात्वीक मुद्यांवर भर देतात. व्ही. पी. सिंगाचे सरकार ११ महीने सत्तेवर होते परंतु आंबेडकर चळवळीचे ४० वर्षापासूनचे भिजत पडलेले प्रश्न चूटकी सरशी सोडवले.
१) बौध्दांना केंद्रात सवलती
२) बाबासाहबांचे संसदेच्या सेंट्रल हॉलमधे तैलचित्र लावने
३)डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी शासनाने धुमधडाक्यात साजरी करणे
४)डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार देने
५)मंडल आयोगाची अंमलबजावणी करणे
६)sc st वरिल अन्याय अत्याचाराचे परिमार्जन करण्यासाठी कमीशन नेमणे.
७)वित्तीय महामंडळाना आर्थिक तरतूद करणे.
या अटी अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी युती करतांना जनता दलासमोर मांडल्या व्ही पी सिंगांनी त्या मान्य केल्या आणि सत्तेत येता बरोबर पूर्ण ही केल्या.
सरकारी गायराण जमिनी, महार वतनी,इनाम वर्ग ६ब च्या जमिनी, शेती महामंडळाच्या जमिनीबद्दल अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी चळवळी उभ्या केल्या त्याचा परिनाम असा झाला की शासनाला अतिक्रमीत जमीनीचे पट्टे देने भाग पडले.
03/12/2017
Dr. BABASAHEB AMBEDKAR MARATHWADA UNIVERSITY, Aurangabad - SENATE Election-2017.
Please caste your votes, and on ballet list of OPEN category.Election date 4th DECEMBER 2017.
SUPPORT US WITH 1st PREFERENCE. ( ).
Give a chance to serve and solve the STUDENTS academic problems.
#प्रिय_पदवीधर_मतदार_बंधु_आणि_भगिनींना..
मी #इंगळे_मनिष_मदनकुमार आणि #बनसोडे_उद्धव_गोवर्धन
आमचे वचन आपणांस आहे की, सतत विद्यार्थी प्रश्ण सोडवत असतांना जाणवले.. विद्यार्थ्यांच्या समस्येकडे प्रशासन कसा दृष्टिकोन ठेवते.. आणि विद्यार्थी प्रश्ण बाजुला रहातात अणि राजकारण नावारूपाला येते.. अश्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे काही हुजोऱ्यांनी राजकारणाचा अड्डा बनवू पाहत आहे.. तरी, आपणांस आम्ही शब्द देतो की, विद्यापीठातील राजकारण नष्ट करून विद्यार्थ्यांना न्याय मिळून देण्याचे अणि विद्यार्थी प्रश्ण निस्वार्थ पणे सोडवण्याचे वचन आपणांस देतो.. तरी हुजोऱ्यांना आळा घालण्यासाठी आणि सातत्याने विद्यार्थी प्रश्ण सोडवण्यासाठी येत्या िसेंबर_२०१७ रोजी आपले #प्रथम_पसंतीचे_१_चे मत आम्हाला देऊन विद्यार्थी हितार्थ सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती!
निवडणूक दिनांक : ४_डिसेंबर_२०१७
वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत
#उमेदवार_यादी_क्रमांक____१०
#इंगळे_मनिष_मदनकुमार
#उमेदवार_यादी_क्रमांक____3
#बनसोडे_उद्धव_गोवर्धन
यांना ( ुल्या ) प्रवर्गातून.. #प्रथम_पसंती__१___देऊन_मोठ्या_संख्येने_विजयी_करा..!