19/02/2026
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, क्षत्रियकुलावतंस, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा...!
सर्वांना शिवजयंती निमित्त शिवमय शुभेच्छा !!
#शिवजयंती
29/01/2026
परवापर्यंतच्या हसऱ्या सहवासाला आज पूर्णविराम मिळाला. अजितदादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना त्यांच्यासोबतच्या असंख्य आठवणींच्या कल्लोळात मन भरून गेले. दादांना, आदरांजली वाहताना त्यांच्यासोबत घालवलेल्या असंख्य आठवणींचा पट डोळ्यासमोरून सरकून गेला.
दादा, तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आजवर तुमच्यासोबत काम करत आलो. यापुढे तुमची कमतरता भरून काढण्यासाठी काम करत राहू.
29/01/2026
आज शिवसेना छत्रपती संभाजीनगरच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ते सदैव झटणारे, निर्णयक्षम, स्पष्टवक्ते आणि कणखर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
शेती, पाणीपुरवठा, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांत महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आजही लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरले आहेत. जनतेशी असलेले त्यांचे नाते, कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी आणि प्रशासनावर असलेली त्यांची मजबूत पकड हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते.
राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सतत अधोरेखित केले. त्यांच्या प्रत्येक कृतीत महाराष्ट्राविषयी असलेली तळमळ, विकासाची जिद्द आणि लोककल्याणाची भावना स्पष्टपणे दिसून येत होती. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पिढ्यांनी राजकारण, समाजसेवा आणि प्रशासनातील कार्याची दिशा ठरवली.
आज महाराष्ट्राने केवळ एक नेता नाही, तर एक दूरदृष्टी असलेले मार्गदर्शक, लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आणि सामान्य माणसाचा आवाज गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. मात्र त्यांनी घालून दिलेले विचार, मूल्ये आणि विकासाचा मार्ग हे सदैव मार्गदर्शक ठरत राहतील.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.
28/01/2026
अतिशय दुर्दैवी घटना 🥲
रोखठोक भुमिका ठेवणारे ,उत्तम प्रशासक महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचे अपघाती निधन..!!
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐💐
23/01/2026
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त विनम्र अभिवादन.
16/01/2026
शिवसेना युवा नेते,आमचे आधारस्तंभ ऋषीकेश प्रदीप जैस्वाल यांची प्रभाग क्रमांक 15 मधुन नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
Rushikesh Jaiswal ❤️🚩
14/01/2026
आपल्या हक्काचा, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा माणूस — ऋषीकेश भैय्या जैस्वाल.
विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक प्रगतीचा ठाम निर्धार असलेले नेतृत्व.
चला, एकजुटीने पुढे जाऊया आणि ऋषीकेश भैय्या जैस्वाल यांना प्रचंड मतांनी विजयी करूया.
आपलं मत — आपल्या भविष्यासाठी! 🗳️
आपले निशाण धनुष्यबाण 🏹🚩