युवा पर्व फाऊंडेशन

युवा पर्व फाऊंडेशन

Share

*युवा पर्व, नवे सर्व*. Non Government Organization (NGO)

17/02/2026
24/06/2025

"शिक्षा with एक पाऊल AI कडे – Where Learning Meets Intelligence!". या उपक्रमाची सुरुवात मी माझ्या गावातून करत आहे ❤️🌾

:

🧠🌐 "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्रांतीची नवी दिशा!"
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित राहिलेली नाही.
आधुनिक तंत्रज्ञान, Artificial Intelligence (AI), आणि सायबर सिक्युरिटी हे आता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यावश्यक घटक बनले आहेत.

ही गरज ओळखून, युवा पर्व फाउंडेशन आणि एनआयटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे —
"जिल्हा परिषद शाळांमध्ये AI आणि सायबर सिक्युरिटी विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष वर्कशॉप्स आणि प्रशिक्षण सत्रं"

💡 या उपक्रमामागील उद्दिष्ट:
✅ गावातल्या मुलांना आधुनिक जगाशी जोडणं
✅ AI म्हणजे काय, त्याचे भविष्यावर होणारे परिणाम समजावून देणं
✅ सायबर सुरक्षिततेचे मूलभूत ज्ञान मिळवून त्यांना Digital Smart बनवणं
✅ शाळा ही केवळ शिक्षणाची जागा न राहता, भविष्य घडवण्याचं केंद्र बनवणं

🚀 या उपक्रमामुळे काय साध्य होईल?
📌 विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल आत्मविश्वास वाढेल
📌 ग्रामीण भागात डिजिटल शिक्षणाची पायाभरणी होईल
📌 शाळा पातळीवरच भविष्याची तयारी सुरू होईल
📌 समाजात शिक्षणाबाबत नवा दृष्टिकोन तयार होईल

🙌 आम्ही सज्ज आहोत – तुम्ही तयार आहात का?
जर तुम्हालाही वाटत असेल की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही AI आणि Cyber Security सारख्या विषयांमध्ये प्रावीण्य मिळवावं,
तर हा बदल घडवण्याच्या प्रवासात तुमचं सहकार्य अनमोल आहे!

🫱 चला एकत्र येऊया, आणि आपल्या शाळांना Digital India चं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करायला तयार करूया.

📞 ज्यांना आमच्यासोबत काम करायचं आहे, Rural transformation साठी हातभार लावायचा आहे – त्यांनी नक्की संपर्क साधावा.
📩 Contact: 7972083525/9960533889

29/09/2024

युवा पर्व फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चतुर्थ वर्धापदिन सोहळा
आम्ही घेऊन येत आहोत एक "भव्य दिव्य अभूतपूर्व सोहळा" २९ सप्टेंबर २०२४

सशक्त युवा सशक्त राष्ट्र

महाराष्ट्रात सर्व जिल्हानिहाय विवध कार्यक्रमाचे आयोजन

① आरोग्य सुविशा गरजु नागरिकांपर्यंत तसेच प्रत्येक ग्रामीण- दुर्गम भागात पोहोचवण्यासाठी मोहीम...

② संकल्प महावृ‌क्षारोपण या मोहिमेतुन हरित क्रांती घडवण्यासाठी माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर लाखो वृक्षांची लागवड व संवर्धन...

③ विविध ठिकठिकाणी ' चला देऊया आपल्या कला- क्रिडा गुणाणा वाव" या माध्यमातुन विविध क्रिडा व युवक - युवतीच्या कौशल्या ला विकास देण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन..

④ 'कृषी" हा महाराष्ट्राचा महत्वाचा पाया असून तो भक्कम करण्यासाठी आपल्या शेतकरी बंधूसाठी कृषी- कृषी व्यवसाय, आधुनिक शेतीवर शिबिराचे आयोजन...

③ 'शिक्षण हा प्रत्येक भारतातील मुलाचा अधिकार आहे तो दुर्गम भागात देखील गरजू कुटुंबातील मुलाला देखील मिळावा यासाठी मदत..

⑥ ऐतिहासिक आपला महाराष्ट्राचा वारसा" गडकिल्ले, मंदिरे, प्राचीन काळातील नष्ट होत चालेल्या गोष्टी, ऐतहासिक स्थळ अशा विविध प्रकारच्या गोष्टी जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष 'युवा पर्व मोहीम"

(7) युवकांसाठी रोजगाराच्या संधी तसेच व्यावसायिक संधी निर्माण करून देत मदत व प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा निहाय 'मदत केंद्र उभारणी"

⑧ महिलांसाठी 'स्त्री देशाची ताकद" या उपक्रमातून महाराष्ट्रभर महिलांसाठी मदत मार्गदर्शन व स्वावलंबी शिबिरे

⑨ "व्यसन मुक्ती - पुनर्वसन अभियान

10)'Save Food -Save Life" या स्तुत उपक्रमाच्या माध्यमातून अत्यंत गरजू व अनाथालयातील मुलांना अन्न वाया न जाऊ देता त्याचे थेट वाटप..

युवा पर्व फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
(ताकद महाराष्ट्राची सर्वसामान्य युवकांची)

24/09/2024

सर्व युवक बंधूंची साथ, थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आणि शेतकरी-विध्यार्थी-गोर गरिबांची साथ यांच्या मदतीने युवा पर्व फाऊंडेशन लवकरच⚜️ ४ था वर्षांत पर्दापण ⚜️करणार आहे या अनुषंगाने अनेक मोठ्या सामाजिक काऱ्यांचे आयोजन सकल युवा पर्व फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य च्या वतीने करण्यात येणार आहे.... युवा पर्व फाऊंडेशन लवकरच एका नव्या अंदाजात... (सुरुवात नव्या पर्वाची)❤🌱

Ksh*tij Pawar

10/09/2024

दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी युवा पर्व फाऊंडेशन तर्फे गणपती बाप्पा यांच्या अगमनानिमित विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन......

१) गरजू नागरिकांसाठी भव्य महाआरोग्य शिबीर
२)संकल्प महा-वृक्षारोपण या मोहिमेद्वारे मंडळांना मोफत वृक्ष वाटप
३) होतकरु विध्यार्थी यांच्या साठी मोफत शालेय साहित्य वाटप
४) युवाना क्रिडा प्रकारात प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन

गणपती बाप्पा मोरया....मंगल मूर्ती मोरया...!!

आयोजक:- , युवापर्व फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य

23/04/2024

आजच्या काळात मतदानात युवकांचा सहभाग आणि मतदान करत असताना आपली काही कर्तव्ये यांसाठीच युवा पर्व घेऊन येत 'मतदार जनजागृती अभियान" या अभियानाचा प्रसार करण्यासाठी व सहभागी होण्यासाठी इच्छुक युवानी संपर्क करा-7972083525...👆🏻🇮🇳







#2024

09/02/2024

उद्या पासून सुरू होत आहेत युवा पर्व फाऊंडेशन आयोजित आ. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे 'भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन" (YOUTH CUP-2024).हे रंगतदार सामने बघण्यासाठी वरील दिलेल्या संपर्क क्रमांका वर संपर्क करा,किंवा वरील दिलेल्या स्टेडियम ला भेट दया...❤️🏏







20/01/2024

युवा पर्व फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य आयोजित
चला खेळूया, युवकांच्या कलागुणांना वाव देऊया

पुणे जिल्ह्यात भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन

आकर्षक बक्षिसे तसेच भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांस विवध भेटवस्तू,बक्षिसे..

आयोजक:- युवा पर्व फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य
संपर्क - कुलदीप पवार:7887763838

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Aurangabad