Food Wing FDA Chhatrapati Sambhaji Nagar
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Food Wing FDA Chhatrapati Sambhaji Nagar, Government Organization, Paithan Road, Kanchanwadi, Aurangabad.
01/03/2026
यात्रा व उत्सवादरम्यान तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल लावून अन्न पदार्थ करणाऱ्या विक्रेत्यांनी अन्न प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
* Food Safety connect App द्वारे आता नोंदणी
सहज शक्य आहे .
* कमीत कमी कागदपत्रे (आधार,फोटो व स्टॉलचा फोटो)
* शुल्क फक्त रु.100/- प्रतिवर्ष
* ऑनलाईन अर्ज व तात्काळ मंजूरी.
13/02/2026
11/02/2026
* स्वच्छता,सात्विकता आणि सुरक्षितता या त्रिसूत्री चे पालन केल्यास सेवेचे समाधान* असा मंत्र जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हॉटेल व्यावसायिकांना दिला. अन्न व औषध प्रशासन तर्फे आयोजित हॉटेल चालकांचे सत्कार समारंभात ते बोलत होते.
अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री ना.नरहरी झिरवळ यांचे संकल्पनेनुसार व अन्न सुरक्षा आयुक्त श्रिधर डूबे-पाटील यांचे निर्देशानुसार जिल्ह्यात 24 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत प्रशासनातर्फे नववर्ष प्रण-सुरक्षित अन्न ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रथम.,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त आस्थापनांच्या चालकांचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, हॉटेल चालकांनी व्यवसायात स्वच्छता,सुरक्षितता आणि सात्त्विकता या त्रिसूत्री चे पालन करावे. तरच त्यांना व्यवसायातून समाजाची सेवा केल्याचे समाधान लाभेल.
या मोहीमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 70 रेस्टॉरंट, हॉटेल व क्लब याच्या तपासणी करण्यात आल्या तसेच अन्न व्यावसायिकांना हस्तपत्रके व कार्यशाळा या माध्यमातून कायद्यातील तरतूदींची व सुरक्षित अन्न हाताळणी बाबत माहिती देण्यात आली. या मोहीमेअंतर्गत तपासणी केलेल्या अन्न आस्थापनांमधून सर्वोत्कृष्ट प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकावर अनुक्रमे हर्षश्री फूड कॉर्नर, पैठण, अन्नपुर्णा व्हेज गार्डन रेस्टॉरंट, पैठण व औरंगाबाद जिमखाना क्लब यांची निवड जिल्हास्तरीय छाननी समीतीतर्फे करण्यात आली. या अन्न व्यवसाय चालकांचा आज मा.जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर श्रि.दिलीप स्वामी याचे हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच 80%पेक्षा जास्त गुणप्राप्त सर्व अन्न व्यावसायिकांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी केले. उपस्थितांना निवृत्त सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तीका झाडे यांनी केले.आभार प्रदर्शन योगेश चिभडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सह आयुक्त श्री सचिन केदारे व सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर,प्रज्ञा सुरसे,वर्षा रोडे,ज्योत्स्ना जाधव,प्रशांत अजिंठेकर व फरीद सिद्दीकी यांनी केले. कार्यक्रमाला हॉटेल असोसिएशन चे अध्यक्ष शिवाजी पाटील तसेच जिल्ह्यातील हॉटेल रेस्टॉरंट चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
30/12/2025
आज दि.30/12/2025 रोजी पैठण शहरातील हॉटेल/रेस्टॉरंट चालक यांची बैठक घेण्यात आली. मा. सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी उपस्थित अन्न व्यवसाय चालकांना अन्न सुरक्षा नियमांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शाम पंजवानी,ग्राहक समिती सदस्य नानक वेदी व स्थानिक वार्ताहर उपस्थित होते.
12/08/2025
मा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी अन्न प्रशासनाची बैठक घेऊन येत्या सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न तपासणी विशेष मोहीम राबवून कारवाई घेण्याबाबत आवश्यक निर्देश दिले.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Paithan Road, Kanchanwadi
Aurangabad
431132
