Dr Hedgewar Hospital
Welcome to the official Dr. Hedgewar Hospital page. Dr. Hedgewar Hospital is a
public charitable hospital located in Aurangabad, Maharashtra.
19/03/2026
नववर्षाच्या या मंगलदिनी, गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात समृद्धी, सुख आणि उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा. 🌼
जागतिक किडनी दिनानिमित्त डॉ. हेडगेवार रुग्णालयात अवयवदात्यांचा सन्मान करण्यासाठी आणि अवयवदानाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्थपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
एक छोटा निर्णय अनेकांना आयुष्यात दुसरी संधी देऊ शकतो.
अवयवदान करा. जीवनदान द्या.
Dr. Hedgewar Rugnalaya Hospital, Chhatrapati Sambhajinagar wishes all the strong, caring, beloved women out there a very happy International Women's Day.
आजचा दिवस *"ति"*च्या निःस्वार्थ सेवेच्या सन्मानाचा
ती म्हणजे शक्ती,
ती म्हणजे कर्तृत्व,
ती म्हणजे प्रेरणा,
ती म्हणजे धैर्य.
*“Give to Gain”* चा खरा अर्थ
फक्त ती जगाला काय देते यापुरताच मर्यादित नाही— तर जग तिच्या योगदानाला काय परत देण्याची निवड करते, यातही तो दडलेला आहे.
सन्मान.
संधी.
समानता.
आणि
जगण्याच स्वातंत्र्य. ✨
05/03/2026
अजंठा गावचे श्री संजय जाधव — रक्तदान चळवळीतील एक प्रेरणादायी नाव. 🙏
मागील तब्बल १५ वर्षांपासून ते स्वेच्छेने, स्वप्रेरणेने आणि स्वतःच्या खर्चाने जवळपास १०० किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी ५ मार्च रोजी आपल्या पत्नीच्या स्मृतिदिनानिमित्त दत्ताजी भाले रक्तकेंद्रात येऊन रक्तदान करतात.
एक-दोन वेळा नव्हे, तर अविरतपणे चालू असलेली ही सेवा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा असंख्य रक्तदाते, संयोजक आणि सेवाभावी व्यक्तींमुळे रक्तदान चळवळ आज ग्रामस्तरापर्यंत पोहोचली आहे आणि अनेक रुग्णांना जीवनदान मिळत आहे.
श्री संजय जाधव यांच्या या निस्वार्थ आणि अविरत रुग्णसेवेला शतशः नमन. 🙏
दत्ताजी भाले रक्तकेंद्र
छत्रपती संभाजीनगर
#रक्तदान #स्वेच्छारक्तदान #रक्तदानचळवळ #प्रेरणादायी #रुग्णसेवा
03/03/2026
Dr. Hedgewar Rugnalaya and RKDMC wishes you and your family a very happy, prosperous and joyful Holi 🎨🍪
03/03/2026
📍*सूचना* 📍
🌿 बाल मोतीबिंदू व तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिर 🌿
लहान मुलांमधील मोतीबिंदू (Pediatric Cataract) तसेच तिरळेपणा (Squint) या दृष्टीदोषांचे लवकर निदान व उपचारासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तपासणीनंतर निदान झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.
(नोंद - रुग्णाने तपासण्या व औषधोपचाराचा खर्च स्वतः करावा )
दृष्टीदोषामुळे मुलांच्या शिक्षणावर व सर्वांगीण विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची वेळेत तपासणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
हे शिबीर दिनांक 15 मार्च पर्यंत असेल. रुग्णांनी डॉ हेडगेवार रुग्णालयात येऊन तपासणी करून घेणे आवश्यक.
मर्यादित रुग्णसंख्या – प्रथम नोंदणीस प्राधान्य दिले जाईल.
कालावधी :15 मार्च 2026 पर्यंत
स्थळ : नेत्ररोग विभाग
डॉ हेडगवार रुग्णालय, Chatrapati Sambhajinagar
25/02/2026
मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी
🌿 मोफत मार्गदर्शन शिबिर 🌿
🩺 तज्ञ मार्गदर्शन
✔️ मधुमेहात डोळ्यांची काळजी
✔️ दृष्टी कमी होण्याची लक्षणे
✔️ Low Vision Aid बाबत माहिती
✔️ गरजूंना सवलतीच्या दरात व्हिजन किट्स
🗓 २८ फेब्रुवारी २०२६ | ⏰ सकाळी ९ ते ११
📍 डॉ. हेडगेवार रुग्णालय
👨👩👧👦 रुग्ण व कुटुंबीयांनी अवश्य उपस्थित राहावे.
लवकर निदान = दृष्टी सुरक्षित.
ही माहिती नक्की शेअर करा — कोणाचीतरी दृष्टी वाचू शकते. ❤️
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Telephone
Website
Address
Dr. Hedgewar Rugnalaya Near Gajanand Maharaj Mandir, Jawahar Colony Road, Garkheda
Aurangabad
431005
