28/07/2024
मित्रानो,
पुण्यातच नाही तर पूर्ण भारतात जॉब ला लाऊन देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन मुलांना आयटी इन्स्टिट्यूट फसवत आहेत. यात मोठमोठ्या कंपन्या व इन्स्टिट्यूट समाविष्ट आहेत. पुण्यात त्या पद्धतीचे एक जाळेच कार्यरत आहे, गावाकडील गरीब पालकांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांना फसविले जात आहे. नोकरीला लावण्याचे फसवे वादे व शास्वती देऊन मुलांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. परंतु यामुळे सर्वच इन्स्टिट्यूट याच पद्धतीने काम करीत असतील असे नाही. इन्स्टिट्यूटचा मनसुबा काय आहे किवा ते कोणत्या हेतूने तुम्हाला प्रवेश घ्यायला लावत असतील ते आपण नाही सांगू शकत परंतु जेवढे इन्स्टिट्यूट या फसवेगिरी ला कारणीभूत असतात तेवढेच पालक व विद्यार्थी सुद्धा या गोष्टीला कारणीभूत असतात.
कोणतेही इन्स्टिट्यूट हे समाजसेवा करावी म्हणून किवा स्वतः चे नुकसान करून चालू शकत नाही.
मुलांना जॉब न लागणे वा मुलाखतीमध्ये निवडून न येणे याचे काही कारण आम्हाला असे वाटतात
कारण –
१. कमी फीस पाहून प्रवेश घेणे
२. इन्स्टिट्यूट चे फर्निचर पाहून प्रवेश घेणे
३. इन्स्टिट्यूट मधील गर्दी पाहून प्रवेश घेणे
४. खूप मोठी बिल्डिंग आहे म्हणून प्रवेश घेणे
५. इन्स्टिट्यूट मधील स्टाफ पाहून प्रवेश घेणे
६. कोर्स कमी वेळाचा आहे म्हणून प्रवेश घेणे
७. कोर्से चा अभ्यासक्रम न बघता प्रवेश घेणे
८. ट्रेनर ची पार्श्वभूमी चेक न करता प्रवेश घेणे
९. फक्त कुणीतरी जॉब ला लागले म्हणून प्रवेश घेणे
१०. स्वतः ची कॅपेसिटी न बघता प्रवेश घेणे
११. मार्केट मधील नोकरीचा कल न बघता कोर्स निवडणे
१२. फक्त कुणीतरी सांगितले म्हणून कोर्स निवडणे
१३. कोर्स मध्ये प्रात्यक्षिकांवर लक्ष न देणे
१४. कोर्स कालावधीत प्रोजेक्ट न बनविणे
१५. लाईव्ह प्रोजेक्ट वर काम न करणे
१६. ट्रेनर ला प्रश्न न विचारणे
१७. ट्रेनिंग च्या काळात स्वतः च्या चुकांवर काम न करणे
१८. इन्स्टिट्यूट च्या उपक्रमामध्ये भाग न घेणे
१९. अभ्यास न करणे
२०. मुलाखत देण्याची हिम्मत न होणे
२१. वेळोवेळी स्वतः ला अपग्रेड न करणे
हे व असे बरेच कारण असतात जे विद्यार्थीच चांगल्याप्रकारे समजू शकतात.
परंतु एक इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे व सर्व गोष्टींवर तोड काढून आम्ही या क्षेत्रात उतरलो आहोत.
सध्या मार्केट मध्ये चालू असलेले फसवणुकीचे प्रकार, मुलांकडून पैसे घेऊन त्यांना नोकरीला न लावणे, Full stack चा कोर्स म्हणून फक्त ४-५ विषय शिकविणे, कमी फीस चे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना लुबाडणे असल्या सर्व बाबींवर आम्ही अभ्यास करून स्वतः ची प्रतिष्ठा व ब्रांड बनविण्याच्या उद्देशाने आमची टीम मार्केट मध्ये उतरलेली आहे.
आमच्या इन्स्टिट्यूट चे वैशिष्टे :
१. सर्व ट्रेनर १०+ वर्ष अनुभव असणारे
२. सर्व ट्रेनर सध्या MNC कंपनीत प्रतिष्टीत पदावर कार्यरत आहेत
३. फक्त मुलांना जॉब ला लाऊन देण्याच्या व जॉब टिकण्याच्या उद्देशाने सर्व कोर्सेस डिझाईन
४. मुलांचा जॉब हा कमीत कमी १० वर्ष टिकला पाहिजे या उद्देशाने तयारी
५. मुलाखतीची पूर्ण तयारी व जास्तीत जास्त लाईव्ह प्रोजेक्ट वर काम करून घेतले जाते.
६. मुलांना कंपनीत प्रोजेक्ट वर काम करता आले पाहिजे म्हणून ५० पेक्षा जास्त प्रोजेक्ट प्रत्येकी बनवून घेतले जातात.
७. कंपनीतल्या वातावरणात सर्व शिक्षण
८. प्रत्येक तुकडीत फक्त ५-१० मुलांना प्रवेश
९. मुलांना पर्सनली लक्ष देऊन अभ्यास घेतला जातो.
१०. प्रत्येक मुलांचे प्रात्यक्षिक तपासूनच नवीन विषय शिकवला जातो
११. हे सर्व करून सुद्धा मुलांना जॉब न लागल्यास १००% फीस परत केली जाते.
१२. फीस परत करण्यासंदर्भात तसा करार केला जातो
१३. जॉब न लागल्यास कुठलाही प्रश्न न विचारता पैसे परत केले जातात
१४. आतापार्येत एकाही विद्यार्थ्याला फीस परत करण्याची वेळ आलेली नाही.
१५. आमचे विद्यार्थी हे परदेशात कार्यरत असून मोठ्या पदावर आहेत
१६. आमचे कोणत्याही कंपनीसोबत करार नसून संपूर्णतः आम्ही विद्यार्थ्यांच्या स्कील वर अवलंबून आहोत
१७. विद्यार्थ्यांच्या स्कील च्या जोरावर आमची जॉब ची ग्यारंटी आहे.
१८. आमचे कोर्सेस हे १ ते दीड वर्षाचे आहेत
१९. आम्ही कोणतेही शॉर्टकट वापरीत नाहीत.
२०. आमच्याकडे कोणीही पगार बेस वर ट्रेनर काम करीत नाही.
२१. झिरो ते हिरो तत्वाने विद्यार्थ्यांना घडविले जाते.
२२. आम्ही नॉन आयटी च्या विद्यार्थ्यांनाही प्रवाहात आणून त्यांना एक वेगळे करीयर देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
२३. नुकतेच आम्ही एका नॉन आयटी विद्यार्थ्याला १४ लाखाचे Package मिळवून देण्यात यशस्वी ठरलो आहोत.
२४. आमच्या ट्रेनिंग चे लाईव्ह व्हिडिओ युट्यूब वरती उपलब्ध आहेत.
२५. आपण ते व्हिडीओ पाहूनच आमच्याकडे माहितीसाठी येऊ शकता.
आम्ही आपल्या सेवेत पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध आहोत.
अधिक माहितीसाठी आमच्या खालील नंबर वरती संपर्क साधू शकता.
पुणे : 8625978092
छत्रपती संभाजीनगर : 9699139573
धन्यवाद

05/04/2024
25/02/2024
18/02/2024
04/02/2024
27/01/2024
17/01/2024
17/12/2023
10/12/2023
06/12/2023