Supdt. of Police Ch. Sambhajinagar Railway

Supdt. of Police Ch. Sambhajinagar Railway

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Supdt. of Police Ch. Sambhajinagar Railway, Government Organization, Aurangabad.

30/10/2025

This , join us for the as we celebrate Sardar Vallabhbhai Patel’s 150th birth anniversary, strengthening the unity, integrity, and togetherness of our nation.

& share your moments at runforunity.nic.in

07/08/2024

A simple choice, a Lifesaving Habit! Wear a Helmet.

Photos from Supdt. of Police Ch. Sambhajinagar Railway's post 24/02/2024

नवप्रविष्ठ पोलीस शिपाई राहुल कसारे नेमणूक छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग याने 34 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 मध्ये कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनी गटांत सुवर्ण पदक पटकावले आहे. सदर अभिमानास्पद कामगिरी बाबत राहुल कसारे यांचे संपूर्ण लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर घटकाच्या वतीने हार्दीक अभिनंदन 💐💐

Photos from Supdt. of Police Ch. Sambhajinagar Railway's post 01/02/2024

"सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे वाक्य वास्तवात आणण्यासाठी झटणाऱ्या पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी दिव्य मराठी पोलिस सन्मान २०२४ हा अवॉर्ड लोहमाग॔ पोलीस छत्रपती संभाजीनगर घटकातील काही अधिकारी व अमंलदार यांना पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम साहेब यांच्या हस्ते देण्यात आला....

लोकशाहीचा चौथा स्तंभ वर्तमानपत्र हा पोलिसाच्या कामावर सतत लक्ष ठेवून असतो पोलिसाने केलेल्या चांगल्या कामाच्या बातम्या प्रसारित करणे तसेच केलेल्या चुकीचा देखील उघड करणे हे वर्तमानपत्राचे काम असते मागील वर्षभरात आम्ही पोलीस स्टेशन येथे केलेल्या चांगल्या कामाचा गुणगौरव भारतातील व जगातील नामांकित असलेल्या दैनिक भास्कर समूहाच्या दिव्य मराठी तर्फे छत्रपती संभाजी नगर शहर /छत्रपती संभाजी नगर ग्रामीण/ छत्रपती संभाजी नगर लोहमार्ग व छत्रपती संभाजी नगर एक्साईज डिपार्टमेंट या खात्यातील चांगले काम केलेल्या अधिकाऱ्यांचा व अमलदारांचा छत्रपती संभाजी नगर येथील नामांकित हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे काल गुणगौरव करून मा. उज्वल निकम यांच्या हस्ते मा. मनोज लोहिया सर पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर, मा. मोक्षदा पाटील मॅडम पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर यांच्या व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार पोनि/शरद जोगदंड, पोनि/विजय घेरडे, सपोनि/अमोल देशमुख, सपोनि/प्रेमलता जगताप, सपोनि/वर्षा व्हगाडे, सपोनि/जयश्री कुलकर्णी, मपोहवा/मुंडे, मपोशी/ठक्कर, पोशी/पराते, पोशी/पाटील यांना देण्यात आले. सामाजिक क्षेत्रात वर्तमान पत्राकडून मिळालेला हा पुरस्कार पुढील कामासाठी ऊर्जादायी ठरेल.

24/01/2024

लोहमार्ग छत्रपती संभाजीनागर पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी ...

रेल्वे पोलीस ठाणे चाळीसगाव
--------------------
प्रवाशी नामे विक्रमसिंग बिशनदास वय 38 वर्षे धंदा -प्लंबिंग काम, राह -भडयाल काजीया जम्मु, जम्मु काश्मीर
हे दि.23/01/2024 रोजी अप ट्रेन नं.12321 हावडा मुंबई मेलचे M/1 कोचचे बर्थ नं.19, 22 वरुन त्यांच्या मित्रासह धनबाद ते जळगांव असा प्रवास करीत असतांना सदरची गाडी दि.24/01/2024 रोजी सकाळी 09.15 वा. चे सुमारास जळगांव येथे आल्यावर सदर प्रवाशी हे त्यांचा चार्जिंगला लावलेला मोबाईल फोन तसाच विसरुन घाईगडबडीत स्टेशनवर उतरुन गेले .गाडी स्टेशनवरुन रवाना झालेनंतर त्यांचे लक्षात आल्यावर त्यांनी जीआरपी चौकी जळगांव येथे जावुन माहीती दिल्यावर सदरची माहीती रे पो स्टे प्रभारी अधिकारी सपोनि/राख यांनी जळगांव येथे नोटीस तामिल करणेकामी गेलेले व सदर ट्रेनमधुन चाळीसगांव येथे येत असलेले पो.ना.605 तडवी यांना दिल्यावर पो.ना.605 तडवी यांनी सदर बर्थवर जावुन सदरचा मोबाईल फोन ताब्यात घेवुन मोबाईल धारक यांना त्यांचे मित्राचे मोबाइल वर माहीती देवुन मोबाईल धारक हे पो.स्टे. ला आल्याने त्यांनी त्यांचा मोबाईल फोन ओळखुन तो त्यांचाच असल्याची खात्री झाल्यावर सदरचा मोबाईल फोन त्यांना सुस्थितीत ताब्यात देण्यात आला .लोहमार्ग पोलीस यांनी तात्काळ कार्यवाही करून मोबाइल धारक यांना त्यांचा मोबाइल मिळवून दिल्याबद्दल लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.

Photos from Supdt. of Police Ch. Sambhajinagar Railway's post 10/01/2024

Mission Trusted Policing उपक्रमाच्या प्रतिक्रीया QR Code आधारित Feedback Form च्या आधारे सर्वसामान्य प्रवाशी/तक्रारदार यांना नोंदविणे शक्य होईल. सदरचा QR Code हा तक्रारदाराने Scan केल्यानंतर तक्रारदारांना त्यांचे अभिप्राय थेट नोंदविता येतील..

Photos from Supdt. of Police Ch. Sambhajinagar Railway's post 17/09/2023

पहिली घटक क्रीडा स्पर्धा लोहमार्ग औरंगाबाद_ 2023
लोहमार्ग औरंगाबाद घटकामध्ये माननीय श्रीमती डॉ. प्रज्ञा सरवदे , पोलीस महासंचालक, लोहमार्ग महाराष्ट्र राज्य , मुंबई यांच्या संकल्पनेतून व मा. श्रीमती मोक्षदा पाटील ,पोलीस अधीक्षक , लोहमार्ग औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 14/ 9/ 2023 व दिनांक 15 /9/ 2023 रोजी लोहमार्ग औरंगाबाद प्रथम घटक क्रीडा स्पर्धा पार पडल्या यामध्ये एकूण तीन संघ 1) मुख्यालय 2) उपविभाग जालना 3) उपविभाग मनमाड असे सहभागी झाले होते व एकूण 50 स्पर्धक खेळाडू यांनी सहभाग नोंदविला व पोलीस अधीक्षक लोहमार्ग औरंगाबाद घटकातील सर्व वरिष्ठ अधिकारी; अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते. लोहमार्ग औरंगाबाद घटक क्रीडा स्पर्धेची पहिली जनरल चॅम्पियनशिप उपविभाग जालना या संघास मिळाली असून सर्व खेळाडूंनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केले आहे.विजेत्या खेळाडूंना पुढील परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लोहमार्ग मुंबई येथे पाठविणे कामी नामनिर्देशित केले आहे.

15/08/2023

७६व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#स्वातंत्र्य_दिन
#१५ऑगस्ट

Photos from Supdt. of Police Ch. Sambhajinagar Railway's post 08/07/2023

दिनांक 07 जुलै 2023 रोजी जिल्हा नियोजन निधीमधून मंजूर झालेल्या आठ चारचाकी वाहनांचे लोहमार्ग औरंगाबाद आस्थापनेला वाहन वितरण कार्यक्रमाचे आयोजन

23/03/2023

भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हसतहसत प्राणाची आहुती देणारे शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू !
भारतमातेच्या वीरपुत्रांना विनम्र अभिवादन..💐🙏🏻


#शहीददिन

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Aurangabad
431003