महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर

Share

स्वाभिमानी , निःस्वार्थ आणि निडर नाभिक बांधवांचे मजबूत संघटन...

11/07/2026
16/04/2026

आपण जर #आठवड्याची_सुटी आणि #योग्य_दरपत्रक पाळले तर काय फायदा🤔.......

पोस्ट मोठी आहे पण एकदा वाचाच....🙏
🫵 इथे एकट्याच्या नव्हे तर समाजाच्या #सामूहिक_एकतेची_मजबुतीची जाणीव समोरच्याला होत असते. त्यावरून तो तुमचा आदर देखील बाळगतो.
🫵 कोणत्याही व्यवसायाचे #प्रीप्लानिंग करून व्यवसाय केला तर तो यशस्वी होतो आणि दुकान भाडे , कौटुंबिक गरजा , आकस्मात खर्च आदींची चिंता सतावत नाही.
🫵 आठवड्याचे दोन वार असे आहेत की , त्यादिवशी मुळातच ग्राहकी कमी असते. कारण हिंदू ग्राहक धार्मिक प्रवृत्तीचा असल्यामुळे #शनिवार किंवा #सोमवारी आपल्याकडे येण्याचे प्रमाण खुपच कमी असते . तेव्हा कमावून कमावून आपण किती कमावणार..?
🫵 आपली #सामूहिक_सुटी ही कुटुंबातील शासकीय कामे , योजना , कुटुंबासाठी वेळ , जवळच्या नात्यागोत्याला भेटी , मुलांचा अभ्यास किंवा समाज मंदिरात एकत्र जमून एखाद्या विधायक गोष्टीवर चर्चा यावर जर घालवली तर मिळणारा आनंद अत्यानंद असतो.
कारण
#पैसा_हा_सर्वश्रेष्ठ_मुळीच_नाही
🫵 आपण जन्माला येताना #नाभिक_कुटुंबातच सन्मानाने आलो आणि अंतिम समयी देखील #नाभिक_बांधवांच्या खांद्यावर जातो म्हणून आपल्याला #जातीचेच म्हटल्या जाते. आणि ज्यांना हे सुख मिळत नाही त्यांना #बेवारस...
मग समाजाच्या सामूहिक निर्णयापासून दूर राहण्याचा अट्टहास का?🤔
🫵 #अनावश्यक_खर्च कमी करून पतसंस्था , अर्बन , को ऑपरेटिव्ह बँकांमध्ये प्रतिदिन गुंतवणूक केल्यापेक्षा दररोज घरच्या लक्ष्मीकडे जमा करा. आठवड्याला त्यांनाच #राष्ट्रीयकृत_बँकेत जमा करायचे प्रशिक्षण द्या. त्या बँकेंचा CR चांगला ठेवा . कधीही कामा येतो.
🫵 #लाचाराप्रमाणे कमी भाव घेऊन दिवसभर हजामती करणारे लवकर थकतात , त्यांचे भविष्यात दवाखान्याचे आणि इतर अनावश्यक खर्च देखील वाढतात.
मात्र
#स्वाभिमानाने जास्त किंवा ठरल्याप्रमाणे दर घेऊन दिवसभरात कमी ग्राहकात/ कमी वेळात उलट आराम करून #समाधानाने जास्त पैसे कमावतात. एकदा सवय तर लाऊन बघा.
#कामाची_क्वालिटी चांगली असेल तर #ग्राहकांची_क्वांटिटी नक्कीच वाढते
🫵 जोडव्यवसाय , ग्रहऊद्योग करण्याचा प्रयत्न करा.
🫵 व्यवसाय करतांना चांगले मित्र , चांगल्या व्यक्ती यांच्या संपर्कात नक्कीच रहा... आणि दररोज वेळ मिळाला की एक चांगले वर्तमानपत्र / पुस्तक स्वतः वाचा आणि वाचनाची सवय कुटुंबात देखील लावा.
कारण
"पैसा तुमच्या दोन वेळेसच्या गरजा पूर्ण करतील पण चांगली वर्तमानपत्रे/पुस्तके हे #संस्कारशिल आणि #अभ्यासू जीवन घडवतील"

"🙏पटलं तर घ्या , आणि नक्कीच शेअर करा🙏"

#आपला_हितैशी.....
*श्री संतोष माणिकराव बोराडे*
जिल्हाध्यक्ष - महाराष्ट्र नाभिक
महामंडळ , छत्रपती संभाजीनगर

27/03/2026

लासूर स्टेशन (गंगापूर) येथील वीर जिवाजी महाले पुतळा स्थापना निमित्त सर्वाँना मनःपूर्वक शुभेच्छा
🙏💐🙏
सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा

09/01/2026

*🙏विनम्र आवाहन🙏*

छत्रपती संभाजीनगर शहरातील मतदार असलेल्या /नसलेल्या नाभिक बंधू भगिनींना कळकळीची विनंती करण्यात येते की , वरील फोटो मध्ये दिलेले सहा उमेदवार आपल्या नाभिक समाजाचे आहेत. त्यांचा समाज कार्यात / सुख - दुःखात नियमित आणि सक्रिय सहभाग असतो.

आज ते स्वतः जरी उभे असेल तरी आपल्या समाजाची राजकीय शक्ती / एकी दाखविण्याची किंवा त्याद्वारे राजकीय प्रतिनिधित्व मिळविण्याची संधी आपल्यासमोर आज आहे.

म्हणून समाज संघटनेचा एक प्रतिनिधी म्हणून हात जोडून जिल्ह्यातील सर्व "जातीवंत , स्वाभिमानी" नाभिक बंधू भगिनींना विनंती करतोय...
🙏🫵🤝🫵🙏
प्रत्येक उमेदवाराच्या समोर त्यांच्या प्रभागात येणाऱ्या / मतदारांच्या कॉलनी , नगर , सोसायट्यांची नावे दिलेली आहे. त्या वार्डात जर तुम्ही असाल तर इतरांना हो म्हणा पण मतदान मात्र "सतत सक्रिय नाभिक उमेदवारालाच करा" ,
तुम्ही जर त्या वार्डात नसाल / बाहेर गावाचे असाल तरीही तुम्ही त्या वार्डात असलेले तुमचे पाव्हने , मित्र , ग्राहक आदींना आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची विनंती करू शकता.

🙏🫵🤝🫵🙏
फक्त आपल्याला काय करायचे ⁉️ असा निगेटिव्ह विचार मनात न आणता आपला उमेदवार "तुमच्या पक्षाचा उमेदवार" नसला तरीही प्रत्येकाने सक्रिय होऊन अन् जातीचा अभिमान दाखवत स्वतः च्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती.
🙏🫵🤝🫵🙏
श्री संतोष माणिकराव बोराडे
जिल्हाध्यक्ष - महाराष्ट्र नाभिक
महामंडळ छत्रपती संभाजीनगर

23/11/2025

💯✔️बरोबर का❓❓❓

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Shree Sant Sena Bhavan
Aurangabad