Pradeep Solunke

Call Directions Contact the organization

Pradeep Solunke वक्ता, लेखक, कीर्तनकार, प्रशिक्षक

पडद्यामागच्या नयकांचा सन्मान.साभार - सकाळ
06/10/2026

पडद्यामागच्या नयकांचा सन्मान.
साभार - सकाळ

03/10/2026

05- #छत्रपती संभाजीनगर विभाग #पदवीधर मतदारसंघ
उमेदवारी #अर्ज घेतला

  Corner Pre  #स्कूल - N4,  #सिडको, छत्रपती  #संभाजीनगर महात्मा गांधी जयंती निमित्ताने  #महात्मा गांधीच्या तीन माकडांचा ...
01/10/2026

Corner Pre #स्कूल
- N4, #सिडको, छत्रपती #संभाजीनगर
महात्मा गांधी जयंती निमित्ताने #महात्मा गांधीच्या तीन माकडांचा जिवंत देखावा सादर केला
🚩बुरा मत सुनो,🚩
💐बुरा मत देखो,💐
🎄बुरा मत बोलो 🎄
आजच्या टेन्शनच्या युगात सुखाचा आणि आनंदाचा हा #मूलमंत्र आहे.

आईसाहेब यांचे आज  #आशीर्वाद घेतले..प्रसन्न मनाच्या, आपले आई वडील, पती, दीर, जावा, मुलं, सुना, नात, नातू, पाहुणे, नातलग, ...
29/09/2026

आईसाहेब यांचे आज #आशीर्वाद घेतले..
प्रसन्न मनाच्या, आपले आई वडील, पती, दीर, जावा, मुलं, सुना, नात, नातू, पाहुणे, नातलग, शेजारी पाजारी, घरकाम करणारे, ओळखीचे या सर्वां विषयी भरभरून बोलणाऱ्या, त्यांच्या गुणांच कौतुक करणाऱ्या श्रीम सुषमा मधुकरराव #मुळे ( #आईसाहेब ) यांना आज त्यांचे पुत्र प्रसिद्ध उद्योगपती, #मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा श्री #अजितभैय्या मुळे यांच्या बंगल्यावर माझी आई श्रीम चंद्रकलाताई सोळुंके यांना घेऊन भेटीसाठी गेलो..
गप्पा मारण्यात, चर्चा करण्यात दीड तास कधी गेला हे समजलं पण नाही...
आईसाहेब यांच्या कडून सकारात्मक विचारांची फार मोठी ऊर्जा घेऊन आज आलो आहे..
पुन्हा नव्या जोमाने लेखन, वाचन, समाजकार्य करण्यासाठी.. 🙏.. प्रदीप सोळुंके
9422295152

 #आजोबा झालो...कन्या  #प्राची आणि जावई  #अतुल काटे  #देशमूख ( #बारामती) अभिनंदन 💐 #पुत्ररत्न
28/09/2026

#आजोबा झालो...
कन्या #प्राची आणि जावई #अतुल काटे #देशमूख ( #बारामती) अभिनंदन 💐
#पुत्ररत्न

27/09/2026

काळानुरूप व्यवसाय बदल आणि #ड्रोन 🚁 द्वारे #ऊस फवारणी..
#शेती

जगप्रसिद्ध प्राच्य विद्या विशारद, माझे मार्गदर्शक  #डॉ  ाळुंखे  #सर यांना आज  #छत्रपती संभाजीनगर येथे   विद्यापीठाच्या म...
26/09/2026

जगप्रसिद्ध प्राच्य विद्या विशारद, माझे मार्गदर्शक #डॉ ाळुंखे #सर यांना आज #छत्रपती संभाजीनगर येथे विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेट 👨🏻‍🎓 (डॉक्टर ऑफ लिटरेचर ) पदविने सन्मानित करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाला अपरिहार्य कारणास्तव मला उपस्थित राहता आले नाही म्हणून मी #दौंड येथे प्रवासात सरांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या 💐
आभार -
राकेश साळुंखे, कुलदीप गाढवे, नवनाथ कदम

कन्या सौ प्राची अतुल  #काटे देशमुख ( #बारामती) हिला  #पुत्ररत्न जाहले. #मराठायोद्धा जरांगे  #पाटील यांना पेढे देऊन आनंद ...
26/09/2026

कन्या सौ प्राची अतुल #काटे देशमुख ( #बारामती) हिला #पुत्ररत्न जाहले.
#मराठायोद्धा जरांगे #पाटील यांना पेढे देऊन आनंद साजरा केला...

 #गावकार्यातील_नेता_अण्णा( 25 सप्टेंबर -  #काकासाहेब_सोळुंके यांचा 34 वा  #स्मृतिदिन)*‘ए पोरा...ग्लास डाव्या बाजुला ठेव ...
25/09/2026

#गावकार्यातील_नेता_अण्णा
( 25 सप्टेंबर - #काकासाहेब_सोळुंके यांचा 34 वा #स्मृतिदिन)

*‘ए पोरा...ग्लास डाव्या बाजुला ठेव ना!’* लग्न, धार्मिक कार्यक्रम किंवा तेरवी पंगतीत अशी वरीलप्रमाणे सूचना आली, की समोरचा व्यक्ती गुपचूप अंमलबजावणी करीत असे. गावातील सर्वांनाच याची सवय झाली होती. गावकरी वरील आदेशाचे पालन का करीत? कारण आदेश देणारी व्यक्ती सामाजिक कार्यात रात्री स्वयंपाक करण्यापासून शेवटचा माणूस जेवल्याशिवाय अन्नग्रहण करीत नव्हती. सर्व गाव त्यांना ‘अण्णा’ म्हणत. *हेच माझे #वडील, माझा #बाप काकासाहेब सोळुंके.* गावकऱ्यांप्रमाणेच मीसुद्धा त्यांना ' #अण्णा' म्हणत होतो.

आमच्या अण्णांची उंची सहा फुटापेक्षा जास्त, वजन शंभर किलोच्या आसपास, असे बलदंड शरीर लाभलेले अण्णा पूर्वी मिशा ठेवायचे,पांढरेशुभ्र खादीचे कपडे वापरत. माझ्या लहानपणीचे दिवस मला आठवतात. गावात इस्त्रीची सोय नव्हती. लाईटही आलेली नव्हती. माझ्या वडिलांना एखाद्या गावात जायचे असेल तर माझी आई तिला सर्व गाव ‘ताई’ म्हणते. ती नीळ टाकून वडिलांचे कपडे स्वच्छ धूत असे. वडिल पितळाच्या मोठ्या तांब्यात कोळसे टाकून कपड्यांची इस्त्री करीत. ‘टाईट कपडे’ घालून परगावी जात असत.

माजलगाव तालुक्यातील सादोळा हे माझे गाव. गावात आमदार, जि प अध्यक्ष असे पदे भूषवलेले लोक आहेत. या गावात बहुसंख्येने 'सोळुंके' आडनाव असलेले जास्त लोक आहेत. आमच्या गावात माणूस मेला की सर्व भावकींना सुतक पडत असे. यातून मार्ग काढण्यासाठी गावात सोळुंक्यांचे तीन विभाग केले. त्यास ‘मुंड’ म्हणतात. आमच्या मुंडातील *आमच्या घरास ‘नऊघर’ असे म्हणतात.* मी वडिलांना याचे कारण विचारले असता त्यांनी सविस्तर सांगितले होते. मी थोडक्यात सांगतो, “माझे पणजोबा सुंदरराव सोळुंके यांना 9 मुलं झाली. त्यांचा विस्तार म्हणजे ‘नऊघर’." पणजोबाला 9 मुले. या नऊ मुलांना 36 मुले. म्हणजेच, मला 9 आजोबा, 36 चुलते आणि 36 चुलत्यांच्या मुलांची आणि पुन्हा त्यांच्या मुलांची जनगणना अजून बाकी आहे, तर अशा नऊघरातील मुख्य व्यक्तींपैकी एक म्हणजे माझे वडील.

आमचा परंपरागत व्यवसाय अर्थात शेती. कुटूंब भले मोठे. आई, वडील, दोन मोठे भाऊ, तीन बहिणी. मोठ्या बहिणीचे लग्न आठवत नाही, पण दोन्ही मोठ्या भावांचे लग्न आठवतात. मी सर्वात लहान असल्याने मला शेंडेफळ म्हणत. कोणत्याही वडिलाचे शेंडेफळावर सर्वात जास्त प्रेम असते. तो नियम मलाही लागू झाला होता. सर्व गावात आदरयुक्त दरारा असलेल्या माझ्या वडिलांच्या अंगाखांद्यावर मी खेळत होतो. वाट्टेल तो हट्ट करीत होतो. मुलगा लाडाने वेडा होऊ नये, म्हणून माझ्या आईवडिलांनी मला बालवाडीपासून माझ्या गावापासून दूर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी या मामाच्या गावी शिक्षणासाठी आईच्या आग्रहास्तव नेऊन सोडले. त्यामुळे मी माझे मामा वाशीचे चेडे देशमुख यांच्याकडे नववीपर्यंत शिकलो. कदाचित मी जो काही आज आहे, हा त्याचाच परिणाम असेल. मी सुरुवातीला बरेच दिवस मामाच्या गावी आदळआपट केली; पण माझ्या आईचे वडील देसाई फार ‘खतरनाक’ माणूस. त्यांच्यापुढे मी हतबल झालो; परंतू शेंडेफळास दुसऱ्या गावी सोडून जाताना माझ्या वडिलांना प्रवासात कीती त्रास झाला असेल, कितीदा ते मनातून रडले असतील, याचा अंदाज माझा मुलगा संकेतला परभणीस सोडून येताना मला निश्चितच झाला. मुलाच्या हितासाठी काळजावर दगड ठेऊन मला मामाच्या गावाला सोडणारे अण्णा द ग्रेटच!

एखाद्या पुढाऱ्यासारखे टाईट राहणारे माझे वडील पूर्वी शेतातील सर्व कामं करायचे. पेरणी, कोळपणी, नांगर, बैलगाडीस एठन लावणे, पोते शिवणे-उचलणे आदी कामं ते करायचे. अण्णांच्या गळ्यात तुळशीची माळ असे. ते भजनालाही जात. मृदुंग वाजवत. त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात उन्हं लागू नये, म्हणून छत्री ते वापरत. *उन्हाळ्यात छत्री वापरणारे आमच्या परिसरातील एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे माझे वडील होय.*

अण्णा हे नियोजन, टापटीप या गोष्टींना खूप महत्त्व देत. कोणतीही वस्तू कुठेही ठेवलेली त्यांना चालत नसे. त्यांना टॉवेल, साबण, ग्लास, पाणी घेण्याचे वगराळे जागच्या जागेवरच लागे. त्यांना घर सजविण्याचा खूपच नाद. त्याकाळी कोणत्याही कापडाचे दुकान मालक त्यांची जाहिरात व्हावी, म्हणून कॅलेंडर देत. अण्णा जास्तीचे कॅलेंडर मागत. त्या कॅलेंडरवर देवीदेवतांचे फोटो असत. हे कॅलेंडर्स घरातील भिंतीवर एका रांगेत चारही बाजूने व्यवस्थित लावत. त्या कॅलेंडर्सच्यावर भिंतीवर एका रांगेत घरातील सर्व सदस्यांचे फोटो लावलेले असत. अण्णांना दोन गोष्टीची सवय होती. एक म्हणजे सुपारी खाण्याचे, त्यासाठी बनियनच्या खिशात एक अडकित्ता व छाली सुपारीचे अर्धे अर्धे तुकडे असत. सुपारी खाताना अडकित्त्याने कर्र कर्र सुपारीचे बारिक पापुद्रे करुन ती सुपारी ते तोंडात टाकत. दुसरी सवय म्हणजे मित्रांसोबत पत्ते खेळणे; पण एकदा मी गावात टाईमपास म्हणून मित्रांसोबत पत्ते खेळत असतांना त्यांनी पाहिले. मी घाबरुन गेलो. आता माझी काही खैर नाही, या भीतीपोटी मी रात्री उशीरा घरी गेलो. सकाळी अण्णा बाहेर गेल्यावर उठलो. तेव्हा मला धक्काच बसला. कारण अण्णांनी घरात सारवलेल्या भिंतीवर निळीने मोठ्या अक्षरात लिहिले होते- ‘मी देवाची शपथ घेऊन सांगतो, की आता येथून पुढे आयुष्यात पत्ते खेळणार नाही.’ मला काहीच न रागवता बापाने दिलेला हा शालजोडा होता. असे माझे अण्णा होते.


ते जेवढे रागीट होते तेवढेच हळवे होते. मी तिसरीला एक वर्षभरासाठी गावी शिकायला गेलो होतो. एकदा मी आईकडे हट्ट धरला, की अमुक अमुक पदार्थ बनवून आत्ताच खायला दे; अन्यथा मी शाळेत जाणार नाही. आईला तो पदार्थ इतक्या लवकर बनविता येणे शक्य नव्हते. ‘शाळेतून परत ये तोपर्यंत मी बनवून ठेवते.’ असे आईने वारंवार सांगितले; पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. वडिलांनीही समजूत घातली पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. रागाने वडिलांनी मला धरले व शाळेपर्यंत छडीने मारत नेले. रस्त्यात दोन-तीन छड्या अंगावर मोडल्या. मला अक्षरश: रडता पण येईना, फक्त हुंदके बाहेर येत होते. इतके मारले व त्यानंतर शाळेत सोडले. मी दिवसभर शाळेत हुंदके देत बसलो. अंग काळेनिळे झाले होते. घरी आल्यावर 'एवढे का मारले ?' म्हणून आई कधी नव्हे इतकी वडिलांवर रागावली. रात्री मी हुंदके देत झोपल्यावर वडिलांनी रडत रडत सर्वांगाला हळद लावली. असे माझे अण्णा.

दुसरा प्रसंग. माझे चुलतबंधू शालीवाहन यांचे आईवडिल वारलेले. ते आमच्याकडेच असत. त्यांचे लग्न झाल्यानंतरचा प्रसंग आहे. मला चांगले आठवते. त्यांच्या सुहागरातीसाठी अण्णांनी कॉट, गादी व्यवस्थित लावून त्यावर अत्तर मारले. घरी फॅन नव्हता, तर इतर कोणाचा तरी फॅन आणून पुतण्याच्या सुहागरातीचे नियोजन केले. असे माझे अण्णा.

गावातील कोणाचे लग्न जमविणे असो किंवा कोणाचे घरी मृत्यू झालेला असो अण्णांचा पुढाकार असणारच. लग्न जमविताना पाहुण्यांची ओळख करुन देणे, पंचांग पाहून मुहूर्त सांगणे, मुहूर्तात अडचण आली तर त्यातून मार्ग काढणे, हे सर्व कामं ते करीत. कोणी मृत्यू पडले तर पाहुण्यांना निरोप देण्याची सोय करणे, अंत्यविधीचे सामान आणणे, सरणाची लाकडे कशी रचायची ?, याबाबत सूचना करणे, अशी सर्व कामे अण्णा स्वत:ची जबाबदारी, कर्तव्य समजून घरचे काम असल्याप्रमाणे करत.

मी नववीनंतर मामाच्या गावावरुन स्वत:च्या गावाकडे शिक्षणासाठी आलो. गावी हायस्कुल नसल्याने तालुक्याचे गाव माजलगाव ला मित्रांसोबत हाताने स्वयंपाक करुन रुमवर राहत होतो. वडील अधूनमधून रुमवर अवश्य येत. आम्ही रूमवर नसताना आमची अस्ताव्यस्त अंथरुनं व्यवस्थित ठेवत. केरकचरा साफ करत. भांडी खरकटी असेल तर धुवून स्वच्छ करत. आम्ही समोर असलोत तरी त्यांना हे करण्यापासून थांबवायची आमची हिंमत होत नसे कारण हे काम आम्ही शिल्लक का ठेवले ?, याचे उत्तर आमच्याजवळ नसे. अशाप्रकारे स्वच्छतेची शिकवण प्रत्यक्ष कृतीद्वारे देणारे माझे अण्णा.

आमचे कुटूंब मोठे होते, हे तर मी सांगितलेच आहे. घरी 30 एकर कोरडवाहू शेती. एक भाऊ संस्थाचालकाच्या संघर्षात नोकरी सोडून आला. दुसरा भाऊ शेती करत होता. पाटलांच्या महिलांनी शेतीत जायचे नसते, या खोट्या प्रतिष्ठेपोटी सर्व महिला घरात असत. त्यामुळे ‘आमदनी आठन्नी खर्चा रुपया’ अशी अवस्था होत असे. वडील देखील शेतीचे उत्पन्न येण्यापूर्वी 'या वर्षी एक फॅन घेऊ घरात ट्युब लावू' असे म्हणायचे; परंतू घरातील सर्वांचे कपडे, किराणा, गडी, उधारी यातच उत्पन्न संपून जात असे. वडिलांचे वरील अनेक वर्षांचे स्वप्न माझ्या नोकरीच्या पहिल्या पगारातच मी पूर्ण केले. या गोष्टीचे समाधान आहे, एवढे मात्र निश्चित!! *वडिलांच्या खिशात एक रुपया नसे; पण त्यांचे समाजकार्य, पाहुण्या रावण्यात सतत संपर्क, राहणीमान यामुळे गावात, पाहुण्यांत, समाजात वडीलांस प्रचंड प्रतिष्ठा मान-सन्मान होता.* या संस्कारामुळेच कदाचित मला पैशाचे वेड नाही अन पैशासाठी 'वाट्टेल ते' करत नाही.

एक प्रसंग आठवतो - मी तिसरीला असताना एक वर्ष भावासोबत दावरवाडीला शिक्षणासाठी राहत होतो. माझे बंधू मधुकरराव तेथे शिक्षक होते. दिवाळीच्या सुटीनंतर वडील मला दावरवाडीस सोडण्यास निघाले. आम्ही गेवराईहून औरंगाबाद बसमध्ये बसलो. बसचा औरंगाबाद बोर्ड वाचून पाचोडला उतरतानाच मी हट्ट धरला- ‘मला औरंगाबादला जायचे आहे.’ वडील, कंडक्टर व इतर प्रवाशांनी समाजावून सांगितले, पण बसच्या सीटला मी घट्ट पकडून ठेवले होते. 'मी औरंगाबादला जाणार! मला औरंगाबाद पाहायचे आहे!' असा हट्ट मी धरला. शेवटी, नाईलाजाने वडील मला औरंगाबादला घेऊन आले. आम्ही आमच्या गावचे गणेशराव गुरूजींकडे मुक्कामी राहिलो. मी चित्रपट पाहिला आणि मगच दावरवाडीस गेलो. आज मी औरंगाबादला राहतोय आणि एका चित्रपटातही काम केले आहे. आठवण आली की अंगावर रोमांच उभे राहतात. अजून एक सांगायचे म्हणजे मला सावत्रभाऊ आहेत, हे मला नववीला आल्यावर पाहुण्यांकडून समजले. ही बाब आई, बाप, भाऊ यांच्याकडूनही कधीही कळाली नाही.

'आज मी कीती जेवणार ?' हे स्वयंपाक करण्यापूर्वी घरातील महिलांना सांगणारे अण्णा, घरात येताच मोठ्याने 'खोकरुन' आल्याची सूचना देणारे अण्णा, मुलाच्या लग्नात हुंड्याचा आग्रह न धरणारे अण्णा, बांधकामाचे ज्ञान असणारे अण्णा, एकदा गावचे उपसरपंच झालेले, सर्व गाव त्यांना “सरकार” म्हणत असे अण्णा आम्हाला अचानक सोडून गेले. आज मी समाजकार्यातून माझी ओळख निर्माण केली आहे, थोडेफार “अच्छे दिन” आले आहेत, हे पाहण्यास अण्णा नाहीत, याची फार मोठी खंत मात्र निश्चित आहे. गावकऱ्यांच्या विनंतीवरून आम्ही गावातील आमची जागा सभागृहासाठी दान दिली आहे. त्या सभागृहावर अनेक वर्षे होऊनही नाव टाकणे शिल्लक
होते. लॉक डाऊन च्या काळात गावकऱ्यांना या गोष्टीची आठवण करून देऊन सभागृहावर नाव टाकून घेतले. गावी गेले की *"काकासाहेब सोळुंके सभागृह, सादोळा"* असे नाव वाचले की समाधान वाटते. तेवढीच गावकऱ्यांना व पुढच्या पिढीस त्यांची आठवण...



- प्रदीप सोळुंके
छत्रपती संभाजीनगर
मोबा न 9422295152
[email protected]

( सदरील लेख विनोद बोरे संपादित ' #माझा_बाप' मध्ये प्रसिद्ध झाला आहे)

Address

बंगलो क्र 2, सह्याद्री हेरिटेज, वेदांत नगर, छत्रपती संभाजी नगर
Aurangabad
431005

Telephone

9422295152

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradeep Solunke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pradeep Solunke:

Shortcuts

Share