MI BADLAPURKAR

MI BADLAPURKAR

Share

Educational , Cultural , Political , Social Events, news updates of Badlapur and nearby locations.

04/06/2026

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका आहे?
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा ई-मेलवर तक्रार नोंदवा…
📞 १८००२२२३६५
✉️ [email protected]

#अन्नसुरक्षा #ग्राहकजागृती #भेसळमुक्तअन्न #अन्नगुणवत्ता #जागरूकग्राहक

04/06/2026

रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. चिपळूण येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोगतज्ञ डॉक्टर कांचन मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्यांचे किट देण्यासाठी त्यांनी तक्रारदार महिलेकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. सुशिक्षित महिलेने याबाबत अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या सहा तासांत अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली.

डॉक्टर कांचन मदार या जिल्ह्यातील परिचित नाव मानल्या जात असल्याने त्यांच्या अटकेची बातमी समोर येताच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Photos from MI BADLAPURKAR's post 03/06/2026

पुणे शहरामध्ये घडलेल्या विषारी दारु दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्राविरुध्द कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्ककडून विशेष पथक स्थापन करून मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान २९ मे ते २ जून २०२६ या कालावधीमध्ये कोकण विभागातील ठाणे, पालघर व रायगड या तीनही जिल्ह्यात एकूण ३१३ गुन्हे नोंद करुन २१३ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवायांमध्ये एक कोटी ५८ लाख १७ हजार ५४६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील हातभट्टी निर्मितीचे हॉटस्पॉट असलेले दिवा गावखाडी भाग, घेसर, अंजूर, अलीमघर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन, खर्डी, सरळांबे, वाशाळा, घोरपे, पालेगांव, सावरणे, वेळू, कोरावले, वसारगाव, हाजीमलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा, कुंभार्ली, केवणी, कालवार, वडुनवघर, मामेखर्डी, कारीवली, मामणोली, जांभुळगाव, नांदपगाव, उत्तन, मुरदागाव, कोपराखाडी, गोराई खाडी याठिकाणी गुन्हे नोंद करुन सदर हातभट्टी निर्मिती केंद्र नष्ट करण्याची कारवाई केली.

तसेच पालघर जिल्ह्यातील मालजीपाडा, वसई, विरार व पालघर याठिकाणी गुन्हे नोंद करुन सदर हातभट्टी निर्मिती केंद्र नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच रायगड जिल्ह्यातील रावेगाव, बेकरेगाव, जावळीगाव याठिकाणी गुन्हे नोंद करुन हातभट्टी नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच अवैध मद्य वाहतुकीविरुद्ध गुन्हे नोंद करुन एकूण आठ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

आपल्या परिसरात कोठेही बनावट मद्य, परराज्यातील मद्य, अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असेल अथवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट यासारख्या पदार्थाची किंवा द्रव्याची निर्मिती, भेसळ, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास 18002339999 या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. तसेच 8422001133 या व्हॉट्सॲप क्रमांकावरही माहिती पाठवता येईल. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क कोकण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

01/06/2026

Tukaram Mundhe sir✌️

ठाणे जिल्ह्यात ३० आणि ३१ मे रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोठी मोहीम राबवत नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह विविध भागांत धाडी टाकल्या. या कारवाईत कृत्रिम पद्धतीने पिकवण्यात आलेल्या आंब्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. एफडीएच्या तपासात काही व्यापारी आंबे पिकवण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने इथिलिनसदृश्य स्प्रेचा थेट वापर करत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी तीन मोठ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. तब्बल ३,४५३ किलो आंबे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये आहे. जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.
या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ३७ जणांना अटक झाली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणारी ३१ आस्थापने सील करण्यात आली आहेत.

नागरिकांना आवाहन

भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित अन्नपदार्थांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने तक्रार करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. तक्रारींसाठी १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रशासनाची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे..

Photos from MI BADLAPURKAR's post 31/05/2026

बदलापूर रिंग रोड (पनवेल हायवे) वरील स्टोन क्रशर आणि डंपर मालकांनो, जरा इकडे लक्ष द्या!

​तुमच्या डंपरमधून रस्त्यावर सांडणारी खडी आणि स्टोन पावडर म्हणजे वाहनधारकांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. रोज कोणाचा तरी हात-पाय तुटतोय, कोणाचा संसार उध्वस्त होतोय, आणि तुम्ही मात्र एसी केबिनमध्ये बसून फक्त पैशांची मोजणी करत आहात!
​"दुसऱ्यांच्या रक्ताने माखलेला पैसा घरात नेताना तुम्हाला शांततेची झोप कशी येते?"

​ तुमच्या निष्काळजीपणामुळे रोज दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. जर उद्या तिथे तुमचा स्वतःचा भाऊ, बहीण किंवा मुलगा असेल, तरीही तुम्ही अशीच खडी सांडत राहणार का?

व्यवसाय तुमचा आहे, नफा तुमचा आहे, मग तुमच्या गाड्यांनी सांडलेला कचरा साफ करायची जबाबदारी पालिका प्रशासनाची का?

ओव्हरलोड गाड्या भरायच्या, ताडपत्री न बांधता सुसाट सुटायचं आणि रस्ता खराब करायचा... ही कसली पद्धत ?

​पुरे झालं आता हा रस्ता सरकारी यंत्रणेने किंवा नागरिकांनी साफ करायचा नाही. तुमच्या डंपरने रस्ता घाण केलाय, त्यामुळे तो स्वतःच्या खर्चाने साफ करण्याची लाज आणि जबाबदारी आता तुम्हालाच घ्यावी लागेल.

#बदलापूर

30/05/2026

बदलापूर शहरात तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या कमेंट स्वरूपात मांडा.

Ruchita Rajendra Ghorpade
Kulgaon Badlapur Municipal Council

#बदलापूर

30/05/2026

मयत व्यक्ती च्या वारसदारांची नावे चढविण्यासाठी फेरफार...
आरोपी लोकसेवक श्री. ईश्वर बद्रीनाथ जाधव (ग्राम महसूल अधिकारी द्वारली सजा )
राहणार . नवरे नगर, अंबरनाथ
याला 20000 ची लाच घेताना रंगेहाथ पकडले .

22/05/2026

उष्मघातापासून बचाव करा. सावध रहा, काळजी घ्या.



#उष्णतेची_लाट


15/05/2026

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचा दावा खोटा आहे. सरकार किंवा तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंप बंद ठेवण्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून सर्व पेट्रोल पंप नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत.





Photos from MI BADLAPURKAR's post 14/05/2026

सदर बॅनर तेथून काढल्याबद्दल कुबनप चे धन्यवाद !

Kulgaon Badlapur Municipal Council

मुख्याधिकारी साहेब,
कुळगांव बदलापूर नगरपरिषद
लक्ष द्या! 🙏

​कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने लावण्यात आलेले पद्मश्री नारायण सुर्वे प्रवेशद्वाराचे फलक सध्या फाटलेल्या अवस्थेत आहेत. साहित्यातील अशा महान व्यक्तीचा हा अनादर त्वरित थांबवावा ही विनंती.

फोटो स्रोत : तात्यासाहेब सोनावणे

Want your business to be the top-listed Government Service in Badlapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Badlapur
421503