31/05/2026
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आपल्या कुशल प्रशासनाने, न्यायबुद्धीने आणि दातृत्वाने प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी यांचे कार्य आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा!
30/05/2026
शेतकऱ्यांना, सौर कृषी पंप बिघडल्यास महावितरणच्या मोबाईल ॲपवर तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी महावितरणच्या मोबाईल ॲपमध्ये 'सौर पंप तक्रार' यावर क्लिक करून आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदवताना शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.
30/05/2026
अफवांवर विश्वास ठेवू नका!
स्मार्ट बना, स्मार्ट मीटर बद्दलचे गैरसमज मनातून काढून टाका!
30/05/2026
वेळ वाचवा, धावपळ थांबवा!
महावितरणचे वीजबिल घरबसल्या ऑनलाईन भरा.
30/05/2026
बारामती परिमंडळात पंतप्रधान सूर्यघर योजनेतून ३९ हजार सौरघरे
22/05/2026
मानव संसाधनातील महावितरणच्या कामगिरीचा जागतिक सन्मान!
नवी दिल्ली येथे 'ग्लोबल एनर्जी ॲण्ड एन्व्हायरमेंटच्या (GEEF)' वतीने आयोजित 'जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषद २०२६' मध्ये महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना विद्युत क्षेत्रातील मानाचा 'ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर २०२६' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात विद्युत क्षेत्रातील मनुष्यबळ विकास आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये श्री. राजेंद्र पवार यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा हा सन्मान आहे.
भारतातील रशियन फेडरेशनचे उपायुक्त डॉ. एव्हगेनी ग्रिव्हा, आइसलँडचे राजदूत श्री. बेनेडिक्ट होस्कुल्डसन आणि नीती आयोगाचे माजी सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
18/05/2026
स्मार्ट योजना: अल्प लाभार्थी हिस्सा भरून सौर प्रकल्प उभारा
17/05/2026
सौर ऊर्जा ग्राहकांनो, ग्रीड सपोर्ट चार्जबाबत वस्तुस्थिती जाणून घ्या!
छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांवर 'ग्रीड सपोर्ट चार्ज' (Grid Support Charge) लागू झाल्यामुळे ग्राहकांचे नुकसान होणार, अशी भीती काही स्तरांतून व्यक्त केली जात आहे. मात्र ९९ टक्के ग्राहकांना हा चार्ज लागू होत नसताना गैरसमज पसरवण्यात येत आहे.
या विषयातील तांत्रिक गुंतागुंत आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी, विद्युत क्षेत्राचे तज्ज्ञ आणि एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांचा हा विशेष लेख नक्की वाचा.
17/05/2026
ग्रीड सपोर्ट चार्ज: गैरसमज दूर करा!
राज्यातील ९९% वीज ग्राहकांना 'ग्रीड सपोर्ट चार्ज' लागू नाही. काही गटांकडून पसरवली जाणारी माहिती पूर्णपणे चुकीची आहे.
वस्तुस्थिती काय आहे? जाणून घ्या:
# ज्यांचा मंजूर भार (Sanctioned Load) १० किलोवॅटपेक्षा जास्त आहे, फक्त त्यांनाच हा 'ग्रीड सपोर्ट चार्ज' लागू होईल.
# घरगुती ग्राहक - राज्यातील २ कोटी ३७ लाख घरगुती ग्राहकांपैकी केवळ १६ हजार ४१० (०.०७%) ग्राहकांनाच 'ग्रीड सपोर्ट चार्ज' लागू.
# औद्योगिक ग्राहक: राज्यातील ४.४५ लाख औद्योगिक ग्राहकांपैकी केवळ ८,८९४ (सुमारे २%) ग्राहकांनाच हा चार्ज लागू.
# व्यावसायिक ग्राहक- एकूण २३.३० लाख व्यावसायिक ग्राहकांपैकी फक्त १२,८३२ (०.५५%) ग्राहकांना हा चार्ज लागू.
# गेल्या वर्षभरात सौर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून तब्बल १२९ कोटी ५७ लाखांचा लाभ झाला आहे.