31/05/2026
मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषद ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर केली असून, दिनांक १८ मे २०२६ पासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने, दिनांक ०१ जून २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात आयोजित लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.
नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे.
30/05/2026
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#अहिल्यादेवी_होळकर #जयंती
30/05/2026
आता मालमत्ता कर भरणे झाले आणखी सोपे!
फक्त WhatsApp वर “Hi” मेसेज करा आणि काही मिनिटांत घरबसल्या मालमत्ता कर भरणा पूर्ण करा.
३० जून २०२६ पूर्वी संपूर्ण मालमत्ता कर भरून मिळवा ५% सूट!
वेळ वाचवा, रांगा टाळा आणि डिजिटल सेवांचा लाभ घ्या.
WhatsApp Chatbot : 9967611234
30/05/2026
आज शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता यांनी भाईंदर पश्चिम येथील राधास्वामी सत्संग नाल्यापासून पाहणी दौऱ्याची सुरुवात करून डी. बी. रियल्टी परिसर, मिरा रोड पूर्व येथील रेल्वे समांतर नाला, जाफरी खाडी, पेणकर पाडा, बापा सीताराम परिसर, महामार्गालगतचे लक्ष्मी बाग व मीनाक्षी नगर येथील नाले, साई पॅलेस परिसर, जे. पी. इन्फ्रा, टाटा पॉवर हाऊस नाला तसेच भाईंदर पूर्व येथील एस. एन. कॉलेज परिसर आणि रेल्वे समांतर नाल्यांची पाहणी केली.
पावसाळ्यात नागरिकांना पाणी तुंबण्याचा त्रास होऊ नये यासाठी नालेसफाईची कामे दर्जेदार व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नाल्यांची सखोल स्वच्छता करून काढण्यात आलेला गाळ तातडीने उचलण्याचे निर्देश मा. महापौर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील प्रत्येक भाग पावसाळ्यासाठी सज्ज राहावा, नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि संभाव्य पूरस्थिती टाळता यावी यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.
या पाहणी दौऱ्यात मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, मा. स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गहलोत, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, उपअभियंता, स्वच्छता निरीक्षक आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
30/05/2026
जनगणना २०२७ — विकासाच्या नव्या वाटेचा पाया!
आपल्या शहराचा, आपल्या परिसराचा आणि आपल्या भावी पिढ्यांच्या विकासाचा आराखडा अचूक जनगणनेवर अवलंबून असतो. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि विविध शासकीय योजनांचे नियोजन जनगणनेतील माहितीच्या आधारे केले जाते.
घरभेटीस येणाऱ्या प्रगणकांना योग्य व सत्य माहिती देऊन सहकार्य करा. लक्षात ठेवा, जनगणना अधिकारी कोणतेही सरकारी कागदपत्र, बँक तपशील किंवा QR कोड स्कॅन करण्याची मागणी करत नाहीत.
29/05/2026
🏠 मालमत्ता कर भरण्यासाठी आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही!
📱 घरबसल्या, काही मिनिटांत आणि डिजिटल पद्धतीने करा मालमत्ता कर भरणा!
My MBMC App, वेबसाईट किंवा WhatsApp Chatbot च्या माध्यमातून सहज करा ऑनलाइन पेमेंट आणि ३० जून २०२६ पूर्वी संपूर्ण मालमत्ता कर भरून मिळवा ५% सूट!
⏳ वेळ वाचवा
☀️ उन्हात फिरणं टाळा
📲 मोबाईलवरूनच करा पेमेंट
💰 आणि मिळवा विशेष सवलतीचा लाभ!
मिरा भाईंदर महानगरपालिका — नागरिकांसाठी अधिक सुलभ, जलद आणि डिजिटल सेवा.
29/05/2026
जनगणना म्हणजे केवळ आकडेवारी नाही…
ती उद्याच्या विकासाची दिशा ठरवणारी जबाबदारी आहे.
आपल्या मुलांच्या शिक्षणापासून ते शहरातील सुविधा वाढवण्यापर्यंत, प्रत्येक अचूक माहिती महत्त्वाची आहे. जनगणना अधिकाऱ्यांना योग्य माहिती द्या, पण कोणतीही वैयक्तिक आर्थिक माहिती, बँक तपशील किंवा QR कोड शेअर करू नका.
✔️ जागरूक नागरिक बना
✔️ सुरक्षित माहिती द्या
✔️ विकासात सहभागी व्हा
#जनगणना2027