22/04/2026
आज माजी आमदार मुजफ्फर हुसेन साहेब यांच्या १५० एकर पसरलेल्या अस्मिता ऑरगॅनिक फॉर्म, बोर्डा मनसर रामटेक येथे डॉ.सुनील भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात ,विजू भाऊ शिंदे यांचे पुढाकारात भेट देण्याचा योग आला.अतिशय प्रायोगिक पद्धतीने त्यांनी काळी मिरी, तेजपान,दालचिनी, काजू,बारमाही आंब्याची बाग नैसर्गिक पद्धतीने फुलवली.त्याकरिता त्यांनी घेतलेले कष्ट अन् धडपड पाहून डोळ्याचे पारणे फिटले. अतिशय विनोदी शैलीत केलेले प्रयोग उदाहरणासह वर्णन करून सांगितले.ते तुम्ही ही नक्की ऐका,बघा.... विदर्भातील १ एकर शेती असलेला शेतकरी आपले उत्पन्न कसे वाढवू शकतो, याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. अन् त्यांनी ,त्यांच्या आई व पत्नीने केलेल्या आदर तिथ्याने सर्व आम्ही मंडळी भाराऊन गेलोत....तुषार वरणगावकरणे त्यांची घेतलेली मुलाखत तर लाजवाबच....
आज खूप छान असे उत्साही मित्र पण मिळाले, संजू भाऊ वाघ, गुप्ताजी,परेश भाई,मनोज देशमुख,अमर भेरडे, राजू लुंगे,प्रदीप भाऊ दंदे इत्यादी सर्वच मंडळीनी सक्रिय सहभाग नोंदविला. नक्कीच जीवनात काहीतरी नाविन्यपूर्ण शेती करायची असेल तर... मुजफ्फरभाई हुसेन यांचे विचार ऐकावेत.... आपणास त्यांच्या प्रयोगशील शेतीची माहिती मिळवण्याची लवकरात लवकर संधी मिळणार,अशी आशा करू या....
सूर्यकांत बाजड...

15/04/2026
13/04/2026
13/04/2026
11/04/2026
11/04/2026
11/04/2026