19/07/2026
*साक्ष इतिहासाची...*
17 व्या शतकाचा उत्तरार्धास नी 18 व्या शतकाच्या पूर्वार्धास नावारूपाला आलेली ही इमारत म्हणजेच लातूर नगरीतील सर्वात पहिलं *सराफी दुकान* होय... ह्या इमारती सोबतच आणखी तीन इमारती ही बांधण्यात आल्या आणि एथे उदयास आली ती लातूरातील पहिली सराफा बाजार पेठ ह्या वास्तूच्या रचनेवरून त्या काळातील आर्किटेक्चर्स हे किती तज्ञ होते याचा अंदाज येतो. सोबतच सोन्या - चांदीचा आणि हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या *नाईक* *प्रयाग* घराण्याच्या कार्य कर्तुत्वाचा ठसा येथे दिसून येतो.. स्वातंत्र्यपूर्व काळ असो वा रजाकारांच्या काळात अनेक संकटे झेलली..
अनेक उन्हाळे पावसाळे झेलत
ह्या इमारती अगदी आजपर्यंत इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. नाईकांच्या आठ पिढ्यांची साथ देणार्या ह्या इमारतींचा उर्जित काळ आता जवळ आलेला आहे... म्हणूनच हा लिखाणाचा प्रपंच... *साक्ष* *इतिहासाची* ..