Team Varsha Chaudhari

Directions

Team Varsha Chaudhari Team Varsha Chaudhari

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या मनःपूर्वक शुभेच्...
18/09/2026

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल मी आपली मनापासून ऋणी आहे.
​आपले हे अथांग प्रेम, विश्वास आणि पाठबळ मला प्रभागाच्या विकासासाठी व समाजहितासाठी आणखी जोमाने, प्रामाणिकपणे आणि अखंडपणे काम करण्याची नवीन ऊर्जा व प्रेरणा देते.
​आपले हेच स्नेह आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
​मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🏻

दक्षिण पश्चिम नागपूरच्या माझ्या प्रभाग क्र 16 येथील श्री विवेकानंद नगर गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणपती बाप्पाचे दर्शन काल...
18/09/2026

दक्षिण पश्चिम नागपूरच्या माझ्या प्रभाग क्र 16 येथील श्री विवेकानंद नगर गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणपती बाप्पाचे दर्शन काल आपले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतले. यावेळी जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली.

काल माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहपरिवार विवेकानंद नगर गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेतले, तसेच महाआरती व पूजना...
17/09/2026

काल माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहपरिवार विवेकानंद नगर गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेतले, तसेच महाआरती व पूजनाचा लाभ घडला. 'डिस्नी वर्ल्ड' च्या धर्तीवर साकारण्यात आलेली विलोभनीय सजावट पाहून मन अत्यंत प्रसन्न झाले.

मंडळाच्या सर्व उत्साही तरुण सहकाऱ्यांची मेहनत आणि ऊर्जा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. वाढदिवशी मिळालेली ही आपुलकी कायम स्मरणात राहील. भिंगारे परिवार आणि मंडळाच्या सर्व युवा कार्यकर्त्यांचे मनापासून आभार!

काल प्रभाग क्र 16 मधील अजनी चौक येथे ज्येष्ठ भाजपा नेते श्री मुन्नाभैया यादव आणि माझ्या सहयोगी नगरसेविका सौ लक्ष्मीताई य...
17/09/2026

काल प्रभाग क्र 16 मधील अजनी चौक येथे ज्येष्ठ भाजपा नेते श्री मुन्नाभैया यादव आणि माझ्या सहयोगी नगरसेविका सौ लक्ष्मीताई यादव यांनी आयोजित केलेल्या दही हंडी उत्सवात बजरंगी भाईजान या सिनेमा मधील मुन्नी चा रोल साकारणारी बाल अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा हिची भेट!

पेण येथील सुप्रसिद्ध मातीच्या श्री गणेश मूर्तींचे भव्य वार्षिक प्रदर्शन 'गणनायका'चे उद्घाटन करण्याचा सुवर्णयोग आज लाभला....
09/09/2026

पेण येथील सुप्रसिद्ध मातीच्या श्री गणेश मूर्तींचे भव्य वार्षिक प्रदर्शन 'गणनायका'चे उद्घाटन करण्याचा सुवर्णयोग आज लाभला. सलग ३२ व्या वर्षात पदार्पण करणारा हा उपक्रम म्हणजे भक्तिभाव आणि कारागिरीचा अप्रतिम संगम आहे. श्री प्रशांत अत्रे जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला या परंपरेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. याप्रसंगी माझ्यासोबत माझे सहयोगी नगरसेवक श्री लखन येरवार जी देखील उपस्थित होते.

​

सर्व नागपूर वासियांचे मनःपूर्वक अभिनंदन!
08/09/2026

सर्व नागपूर वासियांचे मनःपूर्वक अभिनंदन!

प्रभागातील रामकृष्ण नगर, नासा ग्राउंड येथे गणेशोत्सवानिमित्त निर्मित होणाऱ्या गणपती मंडपाचे पूजन करण्याचा आनंद प्राप्त क...
02/09/2026

प्रभागातील रामकृष्ण नगर, नासा ग्राउंड येथे गणेशोत्सवानिमित्त निर्मित होणाऱ्या गणपती मंडपाचे पूजन करण्याचा आनंद प्राप्त केला.

छत्रपती नगरात १०० वृक्ष लागवडीचा संकल्प!काल छत्रपती चौक, प्रगती हॉलजवळ पर्यावरण संवर्धन व परिसर हिरवागार करण्याच्या उद्द...
02/09/2026

छत्रपती नगरात १०० वृक्ष लागवडीचा संकल्प!

काल छत्रपती चौक, प्रगती हॉलजवळ पर्यावरण संवर्धन व परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी लक्ष्मीनगर झोन सभापती सौ. लक्ष्मीताई यादव व इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रभागातील देव नगर येथे संजीवनी आर्ट्स तर्फे संचालित होणाऱ्या शाडू मातीच्या 'गणेश मूर्ती आणि मखर' विक्री दुकानाला भेट दे...
02/09/2026

प्रभागातील देव नगर येथे संजीवनी आर्ट्स तर्फे संचालित होणाऱ्या शाडू मातीच्या 'गणेश मूर्ती आणि मखर' विक्री दुकानाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सोबतच दंतेश्वरी मधील रहिवासी नारायणी हिला पहिली मूर्ती देऊन या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

Address

Bisrampur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Varsha Chaudhari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share