Adv. Seema Shinde सीमा शिंदे

Adv. Seema Shinde सीमा शिंदे

Share

Advocate By Profession
Social Worker By Heart,
Paneled advocate on Maharashtra Pollution Control Board,
Ex CBFC Member, Maharashtra

Photos from Adv. Seema Shinde सीमा शिंदे's post 01/06/2026

भव्य रोजगार मेळावा यशस्वी संपन्न! 🎓📝🖍

​केंद्रीय मंत्री मा. श्री. पीयूष गोयल जी यांच्या पुढाकाराने, आमदार मा. श्री. संजय उपाध्याय जी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 'मेगा जॉब फेअर' उत्साहात पार पडला.

​याप्रसंगी आमचे प्रेरणास्थान व माजी खासदार मा. श्री. गोपाळ शेट्टी साहेब आणि आमदार मा. श्री. संजय उपाध्याय जी यांनी उपस्थित राहून उमेदवारांना मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांचा उत्साह वाढवला. ​या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी मिळाली.

सर्व यशस्वी उमेदवारांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!📚


official

01/06/2026
29/05/2026

निसर्ग संवर्धन हाच खरा वाढदिवसाचा संकल्प! 🌳

बोरिवली विधानसभेचे, आम्हा सर्वांचे लोकप्रिय आमदार मा. संजयजी उपाध्याय यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

'एक पेड़ माँ के नाम' या संकल्पनेला साद घालत सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. ☘️🌴

.satam





28/05/2026

बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि दमदार आमदार आदरणीय श्री. संजय उपाध्याय जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐✨

नगरसेविका अ‍ॅड. सीमा किरण शिंदे. ✨️
वॉर्ड क्रमांक १४.📍



satam


#वाढदिवस

28/05/2026

अनादी मी,
अनंत मी,
अवध्य मी भला...
मारिल रिपु कवण असा जगती जन्मला!"

​प्रखर राष्ट्रभक्त, थोर क्रांतीकारक आणि ओजस्वी विचारवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम! 🙏🔥

नगरसेविका अ‍ॅड. सीमा किरण शिंदे. ✨️
वॉर्ड क्रमांक १४. 📍


satam


25/05/2026

जेष्ठ पदाधिकारी स्व. तमन क्यासारम यांच्या आदरंजलीनिमित्त, बोरीवली पूर्व येथील नागरिकांसाठी 'मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, म्हणूनच या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

​🗓️ दिनांक: गुरुवार, २८ मे २०२६
⏰ वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत
📍 स्थळ: गावकर हॉल, फ्रुट मार्केटच्या बाजूला, बोरीवली (पूर्व).

​शिबिरातील प्रमुख तपासण्या:
​बीएमआय तपासणी (BMI)
​रक्तदाब तपासणी (Blood Pressure)
​रँडम ब्लड शुगर तपासणी (Sugar Test)
​फुफ्फुस कार्यक्षमता तपासणी (Lung Test)
​ईसीजी तपासणी (ECG)
​तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला
​माझ्या प्रभागातील (वॉर्ड क्र. १४) सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की, आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या सुदृढ आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे. 🙌

नगरसेविका : अ‍ॅड. सीमा किरण शिंदे. ✨️
बोरिवली विभाग. वॉर्ड क्रमांक १४. 📍

.satam


#आरोग्यशिबिर

24/05/2026

महा रोजगार मेळावा २०२६

आपल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी!

​केंद्रीय मंत्री मा. श्री. पीयूष गोयल जी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बोरीवली विधानसभा (वॉर्ड क्र. १४) मध्ये 'मेगा जॉब फेअर' (महा रोजगार मेळावा) चे आयोजन करण्यात आले आहे.

​माझे आपल्या मतदारसंघातील तसेच इतर परिसरातील सर्व तरुण-तरुणींना आवाहन आहे की, तुम्ही जर नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्या. देशातील आणि जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये करिअर घडवण्याची हीच ती उत्तम वेळ आहे!

​📅 दिनांक: शुक्रवार, २९ मे २०२६
​⏰ वेळ: सकाळी ९:३० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत
​📍 स्थळ:
वैश्य समाज कल्याण केंद्र,
दत्तपाडा रोड,
मारुती साई सर्व्हिस जवळ,
बोरीवली (पूर्व).

​प्रमुख क्षेत्रे (Sectors):
IT-ITeS | रिटेल | क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स (QSR) | बँकिंग आणि वित्तीय सेवा | कॉमर्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन | टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ट्रेड्स

​सहभागी कंपन्या: Samsung, Amazon, Accenture, Mahindra, Axis Bank, Bajaj Finserv, Zomato, D-Mart आणि इतर अनेक!

​👉 नोंदणी कशी करावी?
या पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा आणि आपल्या करिअरची सुवर्णसंधी मिळवा!
​आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ही पोस्ट नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त तरुणांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांना रोजगार मिळेल.

​📞 अधिक माहितीसाठी संपर्क: ९८३३८३४३२३ / ९८७०४६६७८९

​ #रोजगारमेळावा #युवाशक्ती #नोकरीचीसंधी

22/05/2026

🚩 सौजन्य भेट 🚩

​आज भारतीय जनता पार्टीचे खंबीर नेतृत्व आणि युवा मार्गदर्शक आदरणीय मोहितजी कंबोज 🔱 यांची सस्नेह सौजन्य भेट घेतली. या प्रसंगी त्यांना आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.

​या भेटीदरम्यान विविध सामाजिक आणि स्थानिक विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. लोकसेवेच्या प्रवासात अशा ज्येष्ठ आणि मार्गदर्शक नेतृत्वाची भेट नेहमीच नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरते.

​ॲड. सीमा किरण शिंदे ✨️
नगरसेविका - प्रभाग क्र. १४, 📍
बोरिवली विधानसभा. ✨️

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mumbai