Health IEC- Buldana

Directions Website

Health IEC- Buldana officially face book page of health information, education & communication, Buldana

09/10/2026

दृष्टी चांगली असेल, तर प्रत्येक दिवस अधिक स्पष्ट दिसतो. 👁️
डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता, नियमित तपासणीची सवय लावूया.

[ Vision Health, Eye Care, Regular Eye Checkup, Eye Health, Preventive Care, World Sight Day, Jagtik Drushti Din, Prakash Abitkar ]

08/10/2026

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर साहेब यांच्या पुढाकाराने 'वय वंदना योजना' अमलात येत असून, राज्यातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी रु. ५ लाखांपर्यंतचे अतिरिक्त आरोग्य संरक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.

वाढत्या वयात आजारपणाच्या खर्चाची चिंता दूर करत, राज्यातील प्रत्येक ज्येष्ठाला वेळेत व दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.


🩺 बुलढाणा | दि. ५ व ६ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान...
07/10/2026

🩺 बुलढाणा | दि. ५ व ६ ऑक्टोबर २०२६ रोजी
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, वरवंड येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, ANM, MPW, आशा समन्वयक, गटप्रवर्तक व आशा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यशाळेदरम्यान माता व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, मानसिक आरोग्य, वृद्धांची आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आयुष उपचार पद्धती, आरोग्य शिक्षण व जनजागृती तसेच समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
‘अधिक उपचार, कमी रेफरल’ या संकल्पनेनुसार नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तांत्रिक सत्रे, गटचर्चा व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण अधिक परिणामकारक करण्यात आले.
🌿 ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ — निरोगी कुटुंब, निरोगी समाज आणि निरोगी गावासाठी आरोग्य विभागाची कटिबद्ध वाटचाल!
#माझेगावआरोग्यसंपन्नगाव #कसकाय #समग्रप्राथमिकआरोग्यसेवा #आरोग्यविभाग #बुलढाणा #वरवंड #आरोग्यसेवा #आरोग्यकर्मचारी #अधिकउपचारकमीरेफरल

07/10/2026
07/10/2026

Address

Health IEC/Buldana
Buldana
443001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Health IEC- Buldana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share