02/10/2025
14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन सामाज्याला घेऊन बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आणि पून्हा बौद्ध धम्मचक्र भारतात फिरले म्हणून बौद्ध धम्मामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनास खास महत्व म्हणाले जाते या दिनानिमित्त, दौंड शहरामध्ये, बहुजन समाज पक्षाच्या वतीने आज दि. 02 ऑक्टो. 2025 रोजी, दौंड शहरातील समस्त महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करून, समता रॅली काढण्यात आली व येणाऱ्या काळात बहुजन महापुरुषांच्या विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा संकल्पना देखील या ठिकाणी घेण्यात आला. बहुजन समाज पक्षाच्या वतीने दौंड, शहर तालुका अध्यक्ष मा. श्रीकांत सोनवणे, तालुका उपाध्यक्ष - तुषार सवाणे, महासचिव अमन भाई शेख, अभिजित डेंगळे, सुनील शिंदे, अक्षय शिंदे, प्रकाश जगताप, मंगेश सोनवणे, प्रथमेश सोनवणे, अजिंक्य सोनवणे, संजय कांबळे, वाहिद सय्यद, धनंजय पोळ, राहुल कंकाळे, सागर शिंदे, सक्लीन खान, विनोद शिवभारे, भोसले गुरुजी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून वंदना घेऊन कार्यक्रमांची सांगता केली.