23/08/2025
*🌿 *हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वृक्षारोपण मोहीम* 🌿**
दिनांक 22/06/2025 रोजी, हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार नगर परिषद धर्माबाद च्या वतीने मा. स्वाती दाभाडे, प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी नगरपरिषद धर्माबाद व मा. मुख्याधिकारी श्री. कौस्तुभ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली शहरातील बाळापूर शिवराम तलाव, साई नगर ओपन स्पेस, सहारा कॉलनी, शहाणे ले-आऊट ओपन स्पेस, चिंतावार ले आऊट व मालू ले आउट ओपन स्पेस, एल. बी. पांडे ले आऊट ओपन स्पेस, पहाडे ले आऊट ओपन स्पेस अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या वृक्षारोपणात शहरातील नागरिक, कॉलनीतील महिला सदस्य, लहान मुले, विविध शाळेतील विध्यार्थी, शिक्षक, नगरपरिषदेतील कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांच्या हस्ते उत्साहाने करण्यात आले.
या कार्यक्रमास नगर परिषदेचे मा. मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता प्रमोद घाटेकर, नगर अभियंता प्रकाश नागरगोजे, लेखापाल लतीफ शेख, कर निर्धारक आकाश पांडुळे, कर निर्धारक संगमेश्वर राम शेट्टी, वरिष्ठ लिपिक सविता जुन्नेवार, वरिष्ठ लिपिक सूर्यकांत मोकले,शहर समन्वयक सरवर शेख, लक्ष्मण झुंजारे, नागेश अप्पूलोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी कुदाळे, रमेश घाटे, राम मुळे, राजेश खटाके, सुरेश कोठारे, कार्यालयीन कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि महिलांच्या सहभागातून हरित चळवळीला बळकटी देणे हा होता.
🌱 *"वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा!"* 🌱
या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठी महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.