Harshvarrdhan Patil

Call Directions Website Contact the organization

Harshvarrdhan Patil • President, National Federation of Cooperative Sugar Factories Ltd
• Former Cabinet Minister, Maharashtra
• Chancellor, Pimpri Chinchwad University and 2009.

Harshvardhan Shahaji Patil (Marathi: हर्षवर्धन शहाजी पाटील ) (born August 21, 1963), is a Maharashtra politician from Bharatiya Janata Party.[1]

He was one of the few ministers who was presiding as a minister for four consecutive terms in Government of Maharashtra. He has shouldered responsibilities of Cooperative Ministry and currently Legislative Affairs. He is known for cordial relations with all party members. He is Minister since 1995. He was elected MLA in 1995, 1999, 2004. He was appointed as co-operation and parliamentary affairs minister in Chief minister Prithviraj Chavan's ministry. Patil has a soft image in among the ministers. He is the nephew of Shankarrao Bajirao Patil, the former MP.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने, प्रभावी संवादफेकीने आणि अजरामर भूमिकांनी लाखो रसिकांच्या मनावर अ...
08/10/2026

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने, प्रभावी संवादफेकीने आणि अजरामर भूमिकांनी लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.

त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, प्रतिभावान आणि अष्टपैलू कलाकार गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!

#नानापाटेकर #भावपूर्णश्रद्धांजली

📍 अकोले ता. इंदापूरअकोले येथे सोमनाथ दराडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘चेअरमन चषक २०२६’ या क्रिकेट स्पर्धेस उपस्थित ...
05/10/2026

📍 अकोले ता. इंदापूर

अकोले येथे सोमनाथ दराडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘चेअरमन चषक २०२६’ या क्रिकेट स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूंच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले.

यावेळी मैदानावर रंगलेल्या चुरशीच्या सामन्याचा मनमुराद आनंद घेतला. खेळाडूंची जिद्द, मेहनत, खिलाडूवृत्ती आणि विजयासाठीची धडपड प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्या व उपविजेत्या संघांसह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

खेळ केवळ मैदानावर विजय मिळवण्याचे माध्यम नाही, तर शिस्त, संघभावना, संघर्ष आणि नेतृत्व शिकवणारी एक उत्तम शाळा आहे. युवकांनी क्रीडा क्षेत्रातही मोठी भरारी घ्यावी, यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन निश्चितच प्रेरणादायी आहे. सोमनाथ दराडे मित्र परिवाराचे या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

04/10/2026

📍 इंदापूर

लोकशाही बळकट करण्यासाठी निर्भीड पत्रकारिता, जनतेचा आवाज आणि सत्याची बाजू सातत्याने मांडणाऱ्या जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनेलच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना ‘आदर्श पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणे हीच एका सशक्त आणि जागरूक समाजाची ओळख आहे.

पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची जबाबदारी नसून अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि लोकशाहीची मूल्ये जपण्याचे प्रभावी माध्यम आहे. जनता एक्सप्रेसचे संपादक श्रीयशजी नलावडे व त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा.

सत्तेच्या जवळ नव्हे, तर सत्याच्या बाजूने उभी राहणारी पत्रकारिता अधिक सामर्थ्यवान असते.
जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ देत जनता ए�

🔱 हर हर महादेव..! 🚩📍 श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरदक्षिण कैलास म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवित्र श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर...
03/10/2026

🔱 हर हर महादेव..! 🚩

📍 श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर

दक्षिण कैलास म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवित्र श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे आज भगवान महादेवांचे मनोभावे अभिषेक पूजन करून दर्शन घेतले.
महादेवांच्या चरणी माथा टेकवत मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

शंभूमहादेवांची कृपादृष्टी सदैव सर्वांवर राहो, प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच मनोभावे प्रार्थना.

03/10/2026

संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावणारा हा क्षण!

टीम इंडिया, तुम्ही खराखरा इतिहास रचला आहे! जय हिंद!

📍 कोल्हापूरआज कोल्हापूर करवीर येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) चे दर्शन घेतले व प्रार्थ...
03/10/2026

📍 कोल्हापूर

आज कोल्हापूर करवीर येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) चे दर्शन घेतले व प्रार्थना केली.

📍 बावडा | इंदापूरसंपूर्ण राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आ...
03/10/2026

📍 बावडा | इंदापूर

संपूर्ण राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इंदापूर तालुक्यातही परिस्थिती गंभीर असून नीरा नदी, भीमा नदी तसेच शेटफळ तलाव परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. याच पार्श्वभूमीवर नीरा नदी, भीमा नदी व शेटफळ तलाव परिसरातील शेतकरी बांधवांनी बावडा येथील निवासस्थानी भेट घेऊन पाणी नियोजनाबाबत निवेदन दिले.
यावेळी सर्व शेतकरी बांधवांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडचणी, पाण्याची सद्यस्थिती आणि आगामी काळातील गरजा जाणून घेतल्या. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन, सिंचनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

02/10/2026

📍 इंदापूर

आज इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या, अपेक्षा आणि विविध प्रश्न जाणून घेतले.

सध्या निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिक व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याबाबत सूचना दिल्या.
नागरिकांच्या अडचणी केवळ ऐकून घेणे नाही, तर त्यावर ठोस कार्यवाही होणे हीच माझी भूमिका आहे.

प्रसंगी सहकाऱ्याने नुकतीच घेतलेल्या नवीन चारचाकी वाहनाचे पूजन करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

तसेच श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड, पंढरपूर-आळंदी यांच्या वतीने आयोजित हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उपस्थित राहून किर्तनसेवेचा आध्यात्मिक लाभ घेतला.

जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
02/10/2026

जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

01/10/2026

📍 निरा भिमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर

आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती आज निरा भिमा सहकारी साखर कारखान्यास भेट देऊन कारखाना व परिसराची पाहणी केली. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा बैठक घेत आगामी हंगामाचे नियोजन केले.
यंदाची दुष्काळी परिस्थिती आणि ऊसाची उपलब्धता लक्षात घेता कारखाना लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व तयारी तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यंत्रसामग्री, देखभाल-दुरुस्ती, तांत्रिक व्यवस्था आणि इतर सर्व कामांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.
शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप झाला पाहिजे, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये आणि कारखाना पूर्ण क्षमतेने सज्ज असला पाहिजे याबाबत माझी भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे. आगामी हंगामात नियोजन, शिस्त आणि कार्यक्षमतेच्या जोरावर निरा भिमा कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.

प्रसंगी कारखान्याच्या चेअरमन सौ.भाग्यश्री पाटील, व्हा. चेअरमन श्री.दादासाहेब घोगरे, कार्यकारी संचालक श्री.नवनाथ सपकाळ व इतर अधिकारी उपस्थित होते.

Address

Indapur
Indapur
413103

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harshvarrdhan Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Harshvarrdhan Patil:

Shortcuts

Share