JalnaSkill

Call Directions Website Contact the organization

JalnaSkill This is district level field office of the Department of Skill Development, Employment and Entrepreneurship,Model Career Center Government Of Maharashtra.

Mainly serving to the unemployed youth and Employers.

जालना येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहकार्याने, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी ...
13/08/2026

जालना येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहकार्याने, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी १७ ते २० ऑगस्ट या कालावधीत विशेष भरती मेळावा आयोजित केला जाणार आहे.

यामध्ये ६०० जागांसाठी निवड केली जाईल आणि हे मेळावे पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केले जातील.राष्ट्रीय कौशल्य विकास योजना' आणि भारत सरकारच्या 'पीएसएआरए (PSARA) कायदा, २००५' अंतर्गत सुरक्षा कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी जालना जिल्ह्यात 'कॅपस्टोन सर्व्हिसेस लिमिटेड'तर्फे विशेष भरती मेळावे आयोजित केले जात आहेत. या भरती प्रक्रियेत पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारचे उमेदवार सहभागी होऊ शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण ६०० पदे—ज्यामध्ये ५०० सुरक्षा रक्षक आणि १०० सुरक्षा पर्यवेक्षकांचा समावेश आहे—भरली जाणार आहेत.
सुरक्षा रक्षक (Security Guard) या पदासाठी शैक्षणिक पात्रता ८ वी, १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण अशी आहे. उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान आणि त्यांची किमान उंची १६५ सेमी असणे आवश्यक आहे. सुरक्षा पर्यवेक्षक (Security Supervisor) या पदासाठी पदवी, वय २५ ते ३० वर्षे आणि किमान उंची १७२ सेमी असणे आवश्यक आहे । सुरक्षा रक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणानुसार १८,५०० ते २२,५०० रुपये इतका मासिक पगार मिळेल, तर सुरक्षा पर्यवेक्षकांना २५,५०० ते २७,५०० रुपयांदरम्यान पगार दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना पीएफ (PF), ईएसआय (ESI), अपघात विमा, निवास व भोजनाची सोय, एक महिन्याचे प्रशिक्षण, वार्षिक वेतनवाढ, ग्रॅच्युइटी, पदोन्नतीची संधी आणि वयाच्या ६० वर्षांपर्यंत रोजगार यांसारखे लाभही दिले जातील. सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षकांसाठी भरती शिबिरे १७ ऑगस्ट रोजी मंठा पंचायत समिती, १८ ऑगस्ट रोजी परतूर पंचायत समिती, १९ ऑगस्ट रोजी घनसावंगी पंचायत समिती आणि २० ऑगस्ट रोजी अंबड पंचायत समिती येथे आयोजित केली जातील. ही भरती शिबिरे दररोज सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० या वेळेत होतील.इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड (छायाप्रत), पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि ३५० रुपये नोंदणी शुल्क घेऊन भरतीस्थळी उपस्थित राहावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवार ८३०५९७६८१६ किंवा ९१५४९६८९६६ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.

11/08/2026
१२ ऑगस्त, २०२६ बुधवार रोजी जालना येथे “जागेवर निवड संधी” प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन.                                   ...
10/08/2026

१२ ऑगस्त, २०२६ बुधवार रोजी जालना येथे “जागेवर निवड संधी” प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन.
नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे मार्फत दिनांक १२ ऑगस्त, २०२६ बुधवार रोजी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा मजला, जालना येथे प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन सकाळी ११ ते ०२ दरम्यान करण्यात आले आहे.
या करिता आयोनेक्स व्हेचर्स प्रा. लि.जालना यांचे बी.कॉम पदवी उत्तीर्ण करिता टेली कॉलर चे १० पदे, तसेच बी.बी.ए. / एम. बी. ए मार्केटिंग उत्तीर्ण करिता विक्री समन्वयक चे ०२ पदे, एम. बी. ए. उत्तीर्ण करिता विक्री अधिकारी चे ०३ पदे, आणि बी.कॉम पदवी उत्तीर्ण करिता अकाउंटंट चे ०१ पद त्याच प्रमाणे भारत फायन्ससियल इन्क्लुजन प्रा. लि. जालना यांची दहावी उत्तीर्ण करिता फिल्ड असिस्टंट ट्रेनी ची २० पदे, तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण करिता ब्रांच व्यवस्थापक आणि युनिट व्यवस्थापक ची ०५ पदे अशी एकूण ३३ रिक्तपदे प्राप्त झाली असून या करीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे. मुलाखती साठी बायोडाटा किमान दोन प्रती सोबत ठेवून दिनांक १२ ऑगस्त, २०२६ बुधवार रोजी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा मजला, जालना येथे उपस्थित रहावे

18/07/2026

Address

Administrative Building, 2nd Floor, Collector Office
Jalna
431203

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+912482299033

Alerts

Be the first to know and let us send you an email when JalnaSkill posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to JalnaSkill:

Shortcuts

Share