12/08/2026
बहुजन समाज पार्टी नागपूर शहरात युवकांची दमदार एन्ट्री; २० हून अधिक युवकांचा पक्षप्रवेश
नागपूर : बहुजन समाज पार्टी, नागपूर शहर कार्यालय रामेश्वरी येथे आज २० हून अधिक युवकांनी बहुजन समाज पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. काही युवकांनी भारतीय जनता पार्टीमधून थेट बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला, तर काही युवक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक कार्याच्या माध्यमातून पक्षाच्या विचारांशी जोडले गेले.
हा पक्षप्रवेश सोहळा बहुजन समाज पार्टी नागपूर शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार होते.
यावेळी प्रदेश सचिव विवेक हाडके, प्रफुल्ल मानके, नागपूर शहर प्रभारी अजय उके, नागपूर शहर महासचिव मंगेश नागदेवे , नागपूर शहर सचिव अमित बंसोड़ , नागपूर शहर सचिव अजय कुमार, दक्षिण-पश्चिम विधानसभा अध्यक्ष सौरभ जामगडे, पूर्व विधानसभा प्रभारी रामटेके साहेब तसेच प्रदेश मीडिया प्रभारी धम्मा दहिवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
जितेंद्र हिवरकर यांच्या नेतृत्वात युवकांचा पक्षप्रवेश
या पक्षप्रवेश सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ओबीसी समाजातील युवक नेते जितेंद्र हिवरकर यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश करत आपल्या सोबत २० हून अधिक युवकांना पक्षात आणले. त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांची बहुजन समाज पार्टी नागपूर शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जितेश पेंदाम यांची नागपूर शहर सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच स्वप्निल मेश्राम यांच्यासह अनेक युवकांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला.
जितेंद्र हिवरकर यांच्या नेतृत्वात दिलीप रामटेके, अजय नाडे, ओम पांडे, हिमांशू मून, सुमित तोमर, वैभव सोनवणे, अंकुश शिवरकर, हर्ष दुपारी, सिद्धार्थ दाभाडे, अक्षय बद्री, अभिषेक चव्हाण यांच्यासह २० हून अधिक युवकांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला.
महापुरुषांच्या विचारांचा जागर
पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व युवकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी बहुजन समाज पार्टीची संघटनात्मक शिस्त, पक्षाचे नियम व ध्येयधोरणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच परम आदरणीय बहन मायावतीजी यांचे नेतृत्व व आदेश, मान्यवर कांशीराम साहेबांचे सामाजिक परिवर्तनाचे विचार आणि महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि ऐतिहासिक परिवर्तनाच्या वाटचालीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि बहुजन महापुरुषांच्या संघर्षाचा आदर्श समोर ठेवून समाजातील वंचित, शोषित, पीडित आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
युवकांच्या वाढत्या सहभागामुळे BSP चे संघटनअधिक मजबूत होन्यास मदत होइल.
नागपूर शहरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या विचारांशी मोठ्या प्रमाणात युवक जोडले जात असून आजचा पक्षप्रवेश हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
“बहुजन समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेसाठी युवकांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. नागपूर शहरातील प्रत्येक वंचित घटकाचा आवाज बुलंद करण्यासाठी बहुजन समाज पार्टी अधिक ताकदीने मैदानात उतरेल,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
युवकांच्या या वाढत्या सहभागामुळे बहुजन समाज पार्टी नागपूर शहराची संघटनात्मक ताकद निश्चितच आणखी वाढणार असून आगामी काळात नागपूर शहरात पक्षाचा जनाधार अधिक व्यापक करण्यासाठी नव्या जोमाने काम केले जाणार आहे.
जय भीम! जय भारत!
बहुजन समाज पार्टी जिंदाबाद!
अनिकेत कुत्तरमारे
नागपूर शहराध्यक्ष
बहुजन समाज पार्टी