Harshwardhan Shantaram Kadam

Call Directions Contact the organization

Harshwardhan Shantaram Kadam Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Harshwardhan Shantaram Kadam, Social service, Kadegaon.

📍कडेगाव शहर…आज कडेगाव येथील मतदान केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मा...
01/11/2026

📍कडेगाव शहर…

आज कडेगाव येथील मतदान केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माझ्या मतदानाचा हक्क बजावला…

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मताला अनन्यसाधारण महत्त्व असते.सहकार क्षेत्राची परंपरा,विश्वास आणि प्रगती अधिक बळकट करण्यासाठी आपले मत नोंदविणे हे प्रत्येक मतदाराचे केवळ कर्तव्यच नव्हे,तर आपली जबाबदारीदेखील आहे…

📍 प्रथम वर्धापनदिन…आज शिवणी फाटा येथे येवलेवाडी,ता.कडेगाव येथील कदम कुटुंबीयांचे निष्ठावंत श्री.प्रकाश गोरख जगताप आणि पै...
31/10/2026

📍 प्रथम वर्धापनदिन…

आज शिवणी फाटा येथे येवलेवाडी,ता.कडेगाव येथील कदम कुटुंबीयांचे निष्ठावंत श्री.प्रकाश गोरख जगताप आणि पै.सुनील गोरख जगताप या जगताप बंधूंनी वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या“बालाजी लॉन्स”मंगल कार्यालयाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.आपल्या कष्टातून आणि जिद्दीतून उभ्या केलेल्या या व्यवसायाची अशीच उत्तरोत्तर भरभराट होवो,नवनवीन यशाची शिखरे गाठत त्यांच्या व्यावसायिक वाटचालीचा विस्तार होत राहो,हीच सदिच्छा.पुढील यशस्वी वाटचालीसाठी जगताप बंधूंना मनःपूर्वक शुभेच्छा…

📍 खेराडे विटा,ता.कडेगाव…संकटाच्या काळात आधाराचा हात…🤝काल शॉर्टसर्किटमुळे खेराडे विटा येथील ७ ते ८ शेतकरी कुटुंबाच्या तब्...
29/10/2026

📍 खेराडे विटा,ता.कडेगाव…

संकटाच्या काळात आधाराचा हात…🤝

काल शॉर्टसर्किटमुळे खेराडे विटा येथील ७ ते ८ शेतकरी कुटुंबाच्या तब्बल ३१ एकर ऊस पिकाचे जळून मोठे नुकसान झाले.या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच त्यांच्या शेतात भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी शेतकरी बांधवयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.या संकटातून सावरण्यासाठी आवश्यक ती मदत मिळवून देण्याबरोबरच शासकीय स्तरावर तसेच डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याकडे पाठपुरावा करण्याबाबत आश्वस्त केले.शेतकऱ्याच्या घामातून,कष्टातून आणि अनेक स्वप्नांतून उभं राहिलेलं पीक डोळ्यांसमोर जळून खाक होणं,ही केवळ आर्थिक हानी नसते;तर त्याच्या संपूर्ण कष्टांवर झालेला मोठा आघात असतो.अशा प्रसंगी त्याचं दुःख समजून घेणं,त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्यासाठी आधार देणं,हेच आपलं कर्तव्य आहे.शेतकऱ्याचं दुःख हे आपलं दुःख समजून,संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी मदतीचा हात मिळवून देणं,हीच खरी माणुसकीया कठीण प्रसंगातून शेतकरी बांधव व त्यांच्या कुटुंबीयांना लवकर सावरण्याचे बळ मिळो आणि झालेल्या नुकसानीतून त्यांना पुन्हा नव्या उमेदीने उभं राहता येवो,हीच मनापासून प्रार्थनाशेतकऱ्याच्या दुःखात सहभागी होणं,संकटात त्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी आधार मिळवून देण्याची ग्वाही दिली…

📍 विटा शहर…कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बु.येथील युवा उद्योजक इंजि. श्री.अथर्व महेश कदम आणि इंजि.श्री.श्रीकांत मधुकर निकम...
28/10/2026

📍 विटा शहर…
कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बु.येथील युवा उद्योजक इंजि. श्री.अथर्व महेश कदम आणि इंजि.श्री.श्रीकांत मधुकर निकम यांनी विटा शहरात नव्याने सुरू केलेल्या“Square Feet” आर्किटेक्ट ऑफिसला सदिच्छा भेट देऊन त्यांच्या नव्या व्यवसायाच्या सुरुवातीबद्दल अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या…

▶️ खेराडे वांगी,ता.कडेगाव…
खेराडे वांगी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री.परशुराम शिवाजी हजारे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनपर सत्कार करून पुढील सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या…

▶️ तडसर,ता.कडेगाव…
तडसर येथील श्री.संभाजी शेळके बापू यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील बैलगाडा शौकिनांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीस तरुण सहकाऱ्यांसमवेत उपस्थित राहून या पारंपरिक शर्यतींचा आनंद घेतला.ग्रामीण संस्कृतीचा अभिमान आणि बैलगाडा शर्यतींची परंपरा जपणाऱ्या या उत्साहपूर्ण सोहळ्यात सहभागी होता आले…

📍 लोकशाहीचा उत्सव | कर्तव्यपूर्ती… 🗳️🇮🇳मी बजावला माझा मतदानाचा हक्क…!आज सकाळी वांगी येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून ...
23/10/2026

📍 लोकशाहीचा उत्सव | कर्तव्यपूर्ती… 🗳️🇮🇳

मी बजावला माझा मतदानाचा हक्क…!

आज सकाळी वांगी येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला.पदवीधर आणि शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे…

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुणे विभागातील सर्व पदवीधर व शिक्षक बंधू-भगिनींना मनापासून आवाहन आहे की,मतदानाचा अमूल्य अधिकार अवश्य बजावावा आणि लोकशाहीच्या या पवित्र प्रक्रियेत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा..

आपले एक मत..लोकशाहीची ताकद..आपला सहभाग… लोकशाहीचा सन्मान..🇮🇳🗳️

22/10/2026

📍 हिंगणगाव बु.ता.कडेगाव…

शारदीय नवरात्रोत्सवाच्या या मंगलमय पर्वानिमित्त हिंगणगाव बु. येथील सार्वजनिक शारदीय नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने आयोजित दुर्गामाता आरतीस उपस्थित राहून श्री दुर्गामातेचे मनोभावे दर्शन घेतले.याप्रसंगी मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या माझ्या स्वागताबद्दल मंडळाचे सर्व आयोजक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार…

18/10/2026

📍नवरात्र उत्सव…२०२६

सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या या मंगलमय पर्वानिमित्त आज कडेगाव तालुक्यातील विविध गावांमधील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या आग्रहास्तव सदिच्छा भेटी देऊन श्री दुर्गादेवीचे मनोभावे दर्शन घेतले.तसेच,देवीची आरती करण्याचे भाग्य लाभले.या भक्तिमय वातावरणात भाविकांशी मनमोकळा संवाद साधताना त्यांच्या मनातील श्रद्धा,भक्तिभाव आणि उत्साह अनुभवता आला.आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होताना मनाला एक वेगळेच समाधान आणि सकारात्मक ऊर्जा लाभली.आई जगदंबेची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो,प्रत्येकाच्या जीवनात सुख,समृद्धी,उत्तम आरोग्य आणि यश नांदो.प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याचे बळ मातेने सर्वांना द्यावे,हीच श्री दुर्गादेवीच्या चरणी मनापासून प्रार्थना केली…

Address

Kadegaon
415303

Telephone

+919595950002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harshwardhan Shantaram Kadam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Harshwardhan Shantaram Kadam:

Shortcuts

Share

Category