05/10/2026
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आज श्री शाहजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर येथे 'नवमतदार नाव नोंदणी शिबिराचे' अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. लोकशाहीमध्ये तरुणांचे महत्त्व आणि मतदानाचा अधिकार याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
२७४ दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा करवीर उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी मा. मौसमी चौगुले मॅडम, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मा. परितोष कंकाळ साहेब आणि निवडणूक नायब तहसीलदार करवीर श्री. बी. बी. बोडके यांनी नवमतदार नोंदणीचे महत्त्व व प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. प्रास्ताविक व स्वागत डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एच. कांबळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय देठे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. यावेळी विविध महाविद्यालयांचे NSS व NCC चे विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यक्रम अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी आणि नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रशासनाकडून राबविण्यात आलेला हा उप अत्यंत प्रेरणादायी आहे!