Ashutosh Kale for Kopargaon

Directions Contact the organization

Ashutosh Kale for Kopargaon Office of Ashutosh Kale आमदार आशुतोषदादा काळे unofficial

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कोपरगाव तालुक्यात करण्यात येणाऱ्या पशुधन सर्वेक्षण समितीची गावानुसार यादी! #द...
09/10/2026

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कोपरगाव तालुक्यात करण्यात येणाऱ्या पशुधन सर्वेक्षण समितीची गावानुसार यादी!
#दुष्काळ #पशुधन_सर्वेक्षण

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रयत्नांतून मंजूर निधीतून कोपरगाव शहरात हायमॅक्स दिवे बसवण्यात येत असुन आज समतान...
09/10/2026

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रयत्नांतून मंजूर निधीतून कोपरगाव शहरात हायमॅक्स दिवे बसवण्यात येत असुन आज समतानगर येथे बसवण्यात आलेल्या हायमॅक्स दिव्याचे स्थानिक नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक राहुलजी शिरसाठ, शैलेशजी साबळे, बाळासाहेबजी दहे, राजेंद्रजी खैरनार, तन्मयजी साबळे, आकाशजी नाईकवाडे, गणेशजी सोनवणे, अमजदभाई शेख, दिपकजी नाईकवाडे, मयूरजी राऊत, जतीनजी निरभवणे, उमेशजी पोटे, राहुलजी कळमकर, तुषारजी साठे, रेखाताई जगताप, ताराबाई गोरे, वनिताताई निरभवणे, दिपालीताई कोळसे, वत्सलाताई भोकरे, यास्मिनताई सय्यद, सुनिताताई मोरे, प्रमिलाताई मैड, शोभाताई नाईकवाडे, पूनमताई भोसले, उषाताई लांडगे, योगिताताई भांगे, सुनिताताई घोडेराव, मंगलताई घुले आदींसह नागरिक उपस्थित होते.

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सूचनेनुसार आज पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मल्हारवाडी - काकडी - डांगेवाडी ये...
08/10/2026

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सूचनेनुसार आज पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मल्हारवाडी - काकडी - डांगेवाडी येथील निळवंडे चाऱ्यांच्या रेड झोन (उंच ठिकाणी) क्षेत्रात चारीचे पाणी पोहोचवण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत पाहणी केली.

निळवंडे चारीच्या रेड झोन क्षेत्रात गुरुत्वाकर्षणाने पाणी जात नसल्यामुळे ह्या ठिकाणी पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली.

यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री शेख, श्री पवार, निवृत्त पाटबंधारे अधिकारी तात्यासाहेबजी थोरात आदींसह काकडी, मल्हारवाडी व डांगेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

स्थानिक विकास निधीतून कोपरगाव मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे य...
07/10/2026

स्थानिक विकास निधीतून कोपरगाव मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचे मन:पुर्वक आभार!

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सद...
06/10/2026

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मन:पुर्वक अभिनंदन!

जिल्हा वार्षिक योजना, इतर मागास व बहुजन विकास विभागाअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील करंजी बु., कान्हेगाव, कोळपेवाडी बक्तरपू...
06/10/2026

जिल्हा वार्षिक योजना, इतर मागास व बहुजन विकास विभागाअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील करंजी बु., कान्हेगाव, कोळपेवाडी बक्तरपूर, वारी, वेस व संवत्सर येथे रस्ते करण्यासाठी 1 कोटी रुपये निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचे मन:पुर्वक आभार!

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर ...
06/10/2026

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे विविध कागदपत्र काढण्यासाठी जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था!

बुधवार दि. 7 ऑक्टोबर 2026, स. 6.00 वा.
ठिकाण - श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोपरगाव
#दिव्यांग_बांधव #मोफत_वाहन_व्यवस्था

कोपरगाव शहराच्या विकासाला नवी गती!आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रयत्नांतून कोपरगाव शहरासाठी मंजूर असलेल्या रस...
05/10/2026

कोपरगाव शहराच्या विकासाला नवी गती!

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रयत्नांतून कोपरगाव शहरासाठी मंजूर असलेल्या रस्ते, गटार, पेव्हिंग ब्लॉक बसवणे आदी विविध विकासकामांची आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली.

शहरातील नागरिकांना आवश्यक असणारी ही विकासकामे लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार असून, या कामांमुळे कोपरगाव शहराच्या विकासाला चालना मिळून शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजयजी सोनवणे, नगरसेवक मंदारजी पहाडे, नितेशजी बोरुडे, सिद्धार्थजी शेळके, हर्षलजी जैस्वाल, दिनेशजी संत, शुभमजी दुशिंग, सचिनजी बोर्डे, बबनजी आलवणे आदी उपस्थित होते.

कोपरगाव तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न!कोपरगाव तालुक्याची दुष्काळ आढावा बैठक आज कृष्णाई मंगल क...
03/10/2026

कोपरगाव तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न!

कोपरगाव तालुक्याची दुष्काळ आढावा बैठक आज कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकरी, नागरिक व पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्न मंत्री महोदयांसमोर मांडले. यामध्ये —

🔹 थोड्या निधीअभावी अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी,
🔹 गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये किमान ५०% पाणीसाठा ठेवावा,
🔹 नांदूर मध्यमेश्वर कालव्यातून एप्रिल-मे महिन्यात चारा पिकांसाठी अतिरिक्त आवर्तन देण्यात यावे,
🔹 पुढील आवर्तनांची ७ नंबर फॉर्मची पट्टी माफ करावी,
🔹 कोपरगाव नगरपरिषदेची थकीत पाणीपट्टी माफ करावी,
🔹 विजेच्या भारनियमनासह ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा,

या मागण्यांवर मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी, नागरिकांसाठी पाणीपुरवठा आणि विजेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना व्हाव्यात, यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

यावेळी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, विधानपरिषद सदस्य विवेकजी कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेशआबा परजणे, माजी नगराध्यक्ष पद्मकांतजी कुदळे, समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिनारजी कुदळे आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच शेतकरी उपस्थित होते.
Radhakrishna Vikhe Patil Ashutosh Kale
#दुष्काळ_आढावा_बैठक

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सूचनेनुसार खोकड विहीर येथे व्हाल्व्ह काढण्याच्या दृष्टीने निळवंडे कालव्याचे उपअभि...
03/10/2026

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सूचनेनुसार खोकड विहीर येथे व्हाल्व्ह काढण्याच्या दृष्टीने निळवंडे कालव्याचे उपअभियंता श्री. चोपडे यांनी शेतकऱ्यांसह जागेची पाहणी केली.

खोकड विहीर येथे व्हाल्व्ह काढण्यासंदर्भात आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या मिटिंगमध्ये अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. सदर सूचनेनुसार अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी करण्यात आली असुन पाहणी अहवाल वरिष्ठांना सादर करुन लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले तसेच आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन माहिती दिली.

यावेळी रांजणगाव देशमुखचे सरपंच गजाननजी मते, बहादरपूरचे सरपंच गोपीनाथजी रहाणे, अंजनापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वरजी गव्हाणे, रंगनाथजी गव्हाणे, ज्ञानेश्वरजी गव्हाणे (बडे भाई), सितारामजी वर्पे, प्रतीकजी गव्हाणे, अण्णासाहेबजी वर्पे आदी उपस्थित होते.
#निळवंडे_कालवे

Address

Kopargaon
423601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashutosh Kale for Kopargaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ashutosh Kale for Kopargaon:

Shortcuts

Share