Latur Police Department

Directions Website Contact the organization

Latur Police Department This is Latur District Official Page

🚨 निलंगा पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई!मोटारसायकलच्या डिक्कीतून २.१३५ किलो गांजा जप्त; एकास अटक!अमली पदार्था...
27/10/2026

🚨 निलंगा पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई!

मोटारसायकलच्या डिक्कीतून २.१३५ किलो गांजा जप्त; एकास अटक!

अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात लातूर पोलिसांची कठोर कारवाई. 🚔

👮‍♂️ लातूर पोलीस — सदैव आपल्या सेवेत!

🚔 ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमाला गती!लातूर पोलिसांनी एका दिवसात २२ गावांना भेटी देऊन १,०७५ नागरिकांशी संवाद साधला. द...
25/10/2026

🚔 ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमाला गती!

लातूर पोलिसांनी एका दिवसात २२ गावांना भेटी देऊन १,०७५ नागरिकांशी संवाद साधला. दुष्काळसदृश परिस्थितीतील संभाव्य समस्यांबाबत मार्गदर्शन करत नागरिकांना सुरक्षिततेचा व विश्वासाचा दिलासा दिला.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडून उपक्रमाचा दैनंदिन आढावा.

👮‍♂️ लातूर पोलीस — सदैव आपल्या सेवेत!

🚨 थोड्या पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, तुमचे बँक खाते गुन्हेगारांच्या हाती देऊ नका!सायबर जनजागृती महिन्यानिमित्त लातूर ...
25/10/2026

🚨 थोड्या पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, तुमचे बँक खाते गुन्हेगारांच्या हाती देऊ नका!

सायबर जनजागृती महिन्यानिमित्त लातूर पोलिसांची ‘मनी म्युल’ खात्यांविरोधात जनजागृती मोहीम! बँक खाते भाड्याने देणे किंवा अनोळखी व्यक्तींना आर्थिक व्यवहारांसाठी वापरू देणे गंभीर गुन्ह्यात अडकवू शकते.

⚠️ सावध राहा, सुरक्षित राहा! सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० वर संपर्क साधा.

👮‍♂️ लातूर पोलीस — सदैव आपल्या सेवेत!

🌕✨ कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!चंद्रप्रकाशाच्या या शुभ रात्री आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आ...
25/10/2026

🌕✨ कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

चंद्रप्रकाशाच्या या शुभ रात्री आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो! 🙏🌸

🚔 लातूर पोलीस — सदैव आपल्या सेवेत!

🚔 मुरुड पोलिसांची तत्पर कामगिरी!हरवलेल्या अल्पवयीन मुलाचा अवघ्या १८ तासांत शोध! तांत्रिक तपासाच्या मदतीने पुण्यातून मुला...
25/10/2026

🚔 मुरुड पोलिसांची तत्पर कामगिरी!

हरवलेल्या अल्पवयीन मुलाचा अवघ्या १८ तासांत शोध! तांत्रिक तपासाच्या मदतीने पुण्यातून मुलाला ताब्यात घेण्यात मुरुड पोलिसांना यश.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी मुरुड पोलिसांचे कौतुक केले.

👮‍♂️ लातूर पोलीस — सदैव आपल्या सेवेत!

🚔 ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमांतर्गत हासुरी येथे नागरिकांशी संवाद!अप्पर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांनी दुष्क...
24/10/2026

🚔 ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमांतर्गत हासुरी येथे नागरिकांशी संवाद!

अप्पर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांनी दुष्काळी परिस्थितीतील संभाव्य समस्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मार्गदर्शन केले. तसेच पशुधन, शेती अवजारे व विद्युत मोटारींच्या चोरीपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले.

👮‍♂️ लातूर पोलीस — सदैव आपल्या सेवेत!

🚨 लातूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!⚖️ महा विधी सेवा शिबिरात चोरीच्या गुन्ह्यातील ४ किलो ६१६ ग्रॅम चांदीचा मुद्द...
24/10/2026

🚨 लातूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!

⚖️ महा विधी सेवा शिबिरात चोरीच्या गुन्ह्यातील ४ किलो ६१६ ग्रॅम चांदीचा मुद्देमाल मूळ मालकास परत!

न्याय मिळवून देण्याच्या दिशेने लातूर ग्रामीण पोलिसांचे महत्त्वपूर्ण पाऊल. 👮‍♂️

नागरिकांचा विश्वास, आमची जबाबदारी!

🚔 लातूर पोलीस — सदैव आपल्या सेवेत!

⚖️ महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये लातूर पोलिसांची प्रभावी कामगिरी!लातूर जिल्ह्यात अवघ्या एका महिन्यात लैंगिक अ...
24/10/2026

⚖️ महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये लातूर पोलिसांची प्रभावी कामगिरी!

लातूर जिल्ह्यात अवघ्या एका महिन्यात लैंगिक अत्याचाराच्या ५ गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा, तर ३ आरोपींना प्रत्येकी २० वर्षांचा सश्रम कारावास!

प्रभावी तपास, न्यायालयीन कामकाजावर विशेष लक्ष आणि सरकारी अभियोक्त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नांना यश.

👮‍♂️ महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी लातूर पोलीस सदैव तत्पर!

💧 दोन थेंब निरोगी भविष्यासाठी, दोन थेंब सुरक्षित आयुष्यासाठी!२४ ऑक्टोबर | जागतिक पोलिओ दिवस 🌍पोलिओमुक्त भारताचा संकल्प क...
24/10/2026

💧 दोन थेंब निरोगी भविष्यासाठी, दोन थेंब सुरक्षित आयुष्यासाठी!

२४ ऑक्टोबर | जागतिक पोलिओ दिवस 🌍

पोलिओमुक्त भारताचा संकल्प कायम ठेवूया! प्रत्येक बालकाचे पोलिओपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरणाबाबत जनजागृती करूया.

👮‍♂️ लातूर पोलीस — सदैव आपल्या सेवेत!

🚔 ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमाला गती!लातूर पोलिसांनी २७९ गावांना भेटी देत १४ हजार २२ नागरिकांशी थेट संवाद साधला.💧 पा...
24/10/2026

🚔 ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमाला गती!

लातूर पोलिसांनी २७९ गावांना भेटी देत १४ हजार २२ नागरिकांशी थेट संवाद साधला.

💧 पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संभाव्य समस्यांबाबत जनजागृती, तर ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून गावोगावी रात्रीची गस्त!

👮‍♂️ नागरिकांशी संवाद, गावागावात विश्वास आणि सुरक्षिततेचा ध्यास!

लातूर पोलीस — सदैव आपल्या सेवेत! 🚨

Address

S P Office Ambajogai Road
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Latur Police Department posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Latur Police Department:

Shortcuts

Share