23/09/2026
प्रसिद्धीपत्रक
विषय : महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमधील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याबाबत.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमधील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूक औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांसाठी घेण्यात येणार आहे.
या मतदारसंघांमधील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर, २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे. सदर जागांवरील विद्यमान सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ - श्री. सतीश चव्हाण
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ - श्री. अरुण लाड
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ - श्री. अभिजित वंजारी
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ- श्री. किरण सरनाईक
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ - श्री. जयंत आसगावकर
सदर निवडणुकीसाठीचा कार्यक्रम .
अधिसूचना प्रसिद्धी - दि. २९ सप्टेंबर, २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - दि. ६ ऑक्टोबर, २०२६
उमेदवारी अर्जांची छाननी - ७ ऑक्टोबर, २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - दि. ९ ऑक्टोबर, २०२६.
मतदान - दि. २३ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ०८:०० ते सायंकाळी ०४:०० या वेळेत.
मतमोजणी - दि. २७ ऑक्टोबर, २०२६
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर, २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येईल.
भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा केल्यापासून संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
(मुख्य निवडणूक अधिकारी)
महाराष्ट्र राज्य