राज ठाकरेंनी २०१७ साली सुचवलेला पुण्यातील एक उत्तम नदी सुधार प्रकल्प पण त्याच्या बदल्यात भाजपने बि’घडवलेला पुण्यातील नदी सुधार प्रकल्प. फरक स्पष्ट आहे .
पुण्याचा विकास व्हावा पण तो एक उत्तम दर्जाचा विकास व्हावा नुसता दाखवण्यापुरता विकास पुणेकरांना नको.
MNS - Maharashtra Pune
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MNS - Maharashtra Pune, Political Party, Mumbai, Mumbai.
Wait for last reaction..🔥
31/01/2026
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
29/01/2026
After all it’s family
🕯️ Balasaheb Thackeray यांना जन्मशताब्दी अभिवादन
मराठी अस्मितेचा बुलंद आवाज, निर्भय विचारांचा दीपस्तंभ आणि कोट्यवधी मराठी मनांचा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेच्या रूपाने एक चळवळ उभी केली. स्पष्ट, आक्रमक आणि प्रामाणिक भूमिका हेच त्यांचे खरे भांडवल होते. सत्ता नव्हे, तर स्वाभिमान हा त्यांचा केंद्रबिंदू होता. मराठी भाषा, संस्कृती, महाराष्ट्राचा अभिमान आणि हिंदुत्व यांचा त्यांनी निर्भीडपणे पुरस्कार केला. त्यांच्या विचारांनी पिढ्यान्पिढ्या प्रेरणा घेतली. जन्मशताब्दी वर्षानिमित्त या महान नेत्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन—विचार अमर आहेत, बाळासाहेब सदैव स्मरणात राहतील. 🙏🧡
अहमदाबाद विमानतळ (अदानी), गुजरात.
या व्हिडिओमध्ये बोलणाऱ्या महिलेचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका म्हणजे राज ठाकरे सध्या नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यावर जे गंभीर आरोप करत आहेत, त्यामागचा खरा आणि भयावह अर्थ स्पष्टपणे समजेल.
अहमदाबाद (अदानी) विमानतळावर वाहन नेल्यास पहिल्या ८ मिनिटांपर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पण ८ मिनिटे पूर्ण झाल्यानंतर अवघा एक सेकंद जरी उशीर झाला, तरी थेट ₹१५० पावती कापली जाते.
इतकंच नाही त्यांनी आणखी एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन पेमेंट केले तर ठीक, पण नकद (Cash) पैसे दिल्यास तब्बल ₹१०० जास्त आकारले जातात.
हाच तो वास्तवाचा आरसा आहे, जो राज ठाकरे जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज जर देशात अशा पद्धतीने अदानींची एकाधिकारशाही (Monopoly) वाढत गेली, तर सामान्य नागरिक पूर्णपणे पिळला जाणार आणि देशाचा प्रवास हळूहळू पण निश्चितपणे रसातळाकडे जाईल, यात शंका नाही.
म्हणूनच, आताच जागं होणं गरजेचं आहे.
आज प्रश्न विचारला नाही, तर उद्या उत्तर देण्याची संधीही उरणार नाही.
वेळ हातातून निसटतेय… निर्णय आजच घ्यावा लागेल.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Mumbai
Mumbai
4000039
