20/04/2026
लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने आता “Annasaheb Patil Mahamandal App” लॉन्च केले आहे, ज्यामुळे सर्व सेवा आता थेट आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत.
📱 या अॅपच्या माध्यमातून:
• योजनांची संपूर्ण प्रक्रिया मोबाईलवर
• LOI, Sanction आणि Claim ची स्थिती तपासण्याची सुविधा
• आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सोय
• जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा
पूर्वीप्रमाणे कार्यालयीन फेऱ्या किंवा एजंटवर अवलंबून राहण्याची गरज नाही. आता सर्व माहिती आणि सेवा डिजिटल व सोप्या पद्धतीने उपलब्ध आहेत.
👉 Android वापरकर्त्यांनी Google Play Store वरून “Annasaheb Patil Mahamandal App” डाउनलोड करून आजच वापर सुरू करा.
अधिक माहितीसाठी भेट द्या:
www.udyog.mahaswayam.gov.in
15/04/2026
📢 लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे.
✅ आता लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे अपूर्ण कागदपत्रे पाहता येतील व ऑनलाइन अपलोड करून पूर्ण करता येतील.
✅ त्यामुळे कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार आहे.
✅ “Hold” किंवा “Reject” झालेल्या प्रकरणांचे कारणही लॉगिनमध्ये दिसेल.
✅ आवश्यक कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर प्रकरण पुढील तपासणीसाठी पाठविले जाईल.
⚠️ ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे Hold किंवा Block झाली आहेत त्यांनी लॉगिन करून कारण तपासावे व १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
📌 कोणतीही अडचण असल्यास संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे.
📌 कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत वेब प्रणालीद्वारेच प्रक्रिया पूर्ण करावी.
👉 सर्व लाभार्थ्यांनी या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
13/04/2026
*अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम वेगात*
*लघुउद्योजकांना ‘लोकल ते ग्लोबल’ची दिशा*
मुंबई, दि. — अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या उद्देशाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम, मार्केटिंग टॅब (Marketing Tab) सारख्या आधुनिक सुविधा आणि कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक सुधारणा राबवून व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ दिले जात आहे. या उपक्रमांद्वारे लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर ज्ञान, कौशल्ये आणि बाजारपेठेची जोड देऊन त्यांना सक्षम उद्योजक बनविण्याचा प्रयत्न महामंडळाद्वारे करण्यात येत आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंह देशमुख यांनी केले आहे.
*डिजिटल बाजारपेठेची दारे उघडली*
महामंडळाने आपल्या अधिकृत पोर्टलवर ‘व्यवसाय वर्धन (Business Promotion) Marketing Tab’ विकसित केला असून तो Flipkart, Amazon आणि IndiaMART यांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, छायाचित्रे, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता अपलोड करता येतो. लहान व्यवसायांनाही महामंडळाच्या पोर्टलमार्फत व्यवसायाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. व्यवसाय वर्धन (Business Promotion) बावत आवश्यकतेनुसार अधिक सहकार्यासाठी महामंडळाच्या जिल्हा समन्वयक यांना संपर्क करावा.
*२७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंद*
सध्या या प्लॅटफॉर्मवर २७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंद झाली आहे. व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका अशा विविध निकषांवर शोध सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांना नजिकच्या लाभार्थ्यांची माहिती सहज मिळते आणि त्यांच्या उत्पादनांचा थेट लाभ घेता येतो. या उपक्रमातून ‘लोकल ते ग्लोबल’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न होत असून लघुउद्योजकांना मोठ्या बाजारपेठेत प्रवेशाची संधी मिळत आहे. भविष्यात लाभार्थ्यांच्या मागणीनुसार Payment Gateway सुरू करण्याचेही नियोजन आहे.
*डिजिटल प्रशिक्षणातून कौशल्यवृद्धी*
महामंडळाने वेबिनार, युट्युब, आणि पॉडकास्टच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. व्यवसाय सुरू करण्यापासून ते वाढविण्यापर्यंतची प्रक्रिया, उत्पादनाची गुणवत्ता व ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, ग्राहक संवाद, विक्री कौशल्ये आणि आर्थिक नियोजन यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. तज्ञ व्यक्तींमार्फत तांत्रिक माहिती उपलब्ध करून दिली जाते. तसेच प्रशिक्षणांचे व्हिडिओ महामंडळाच्या अधिकृत युट्युबर चॅनेलवर व फेसबुक वर उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेता येते. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरत आहे.
*कागदपत्र पडताळणी सुलभ; डिजीलॉकर सेवा*
महामंडळाने डिजीलॉकर सेवा आपल्या प्रणालीमध्ये समाविष्ट (integrate) केल्यामुळे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान व विश्वासार्ह झाली आहे. पुढील टप्प्यात MAHA-ID आणि आधार UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) यांचे एकत्रीकरण करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.
व्यवसाय वर्धन सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी करून आपल्या उत्पादनांची माहिती अपलोड करावी, तसेच आवश्यकतेनुसार जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
10/04/2026
मराठा समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे महत्त्वपूर्ण पाऊल
राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळामार्फत व्याज परतावा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांमुळे हजारो तरुणांना स्वयरोजगाराची संधी मिळत असून उद्योजकतेला नवी दिशा मिळत आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा यावर भर देत महामंडळाने लाभार्थ्यांसाठी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
यामध्ये AI आधारित Smart Bot, WhatsApp सेवा आणि अधिकृत WhatsApp Channel यांचा समावेश असून लाभार्थ्यांना योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, प्रकरणांची स्थिती आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट मोबाईलवर मिळत आहेत.
आजपर्यंत महामंडळामार्फत ₹1,670 कोटींहून अधिक आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले असून 1 लाख 70 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना स्वयरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या:
www.udyog.mahaswayam.gov.in
महामंडळाच्या अधिकृत WhatsApp Channel ला Subscribe करा:
https://whatsapp.com/channel/0029VbBvVEo0VycIgdFnSu2H
23/03/2026
कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुंबई
30/01/2026
महत्त्वाची सूचना – व्यवसायिकांसाठी
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुंबई यांच्या अधिकृत पोर्टल
www.udyog.mahaswayam.gov.in
वर Business Promotion / व्यवसाय वर्णन हा नवीन tab उपलब्ध आहे.
महामंडळाच्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या व्यवसायाची माहिती, फोटो व आवश्यक तपशील Business Promotion विभागात अपलोड करावेत. यामुळे व्यवसायाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल.
सर्व संबंधित लाभार्थ्यांनी तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी.
05/01/2026
📢 महत्त्वाची सूचना
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना 1 जानेवारी 2025 पूर्वी LOI प्राप्त झाले आहे किंवा ज्यांना बँक कर्ज मंजुरी मिळाली आहे, अशा लाभार्थ्यांना 15 जानेवारी 2026 पर्यंत पोर्टलवर बँक मंजुरीपत्र अपलोड करण्यासाठी विशेष मुदतवाढ देण्यात येत आहे.
18/12/2025
📢 अधिकृत सूचना | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
महामंडळाबाबत सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या अफवांच्या माहितीस पूर्णविराम देण्यासाठी ही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार, मा. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) देण्याची प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित आहे. उर्वरित राज्यात ही प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे.
तसेच योजनेअंतर्गत इष्टांकाबाबतची देखील वस्तुस्थिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मराठा बांधवानी व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महामंडळाच्या अधिकृत माध्यमांवरील माहितीलाच प्राधान्य द्यावे.
महामंडळ मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
18/11/2025
📢 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची महत्त्वपूर्ण माहिती
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा नियमित व सुरळीत सुरू आहेत. लाभार्थ्यांना दिला जाणारा व्याज परतावा कोणत्याही अडथळ्याविना त्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत होल्ड/ब्लॉक केलेल्या प्रकरणांव्यतिरिक्त, सर्व पात्र लाभार्थ्यांना व्याज परतावा वितरीत करण्यात आला आहे.
काही माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या “महामंडळाचे कामकाज बंद” असल्याच्या बातम्या अफवा असून, महामंडळाचे नियमित कामकाज सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.
तांत्रिक कारणांमुळे LOI (पात्रता प्रमाणपत्र) प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली होती; परंतु व्याज परतावा व बँक मंजुरीचे कामकाज अविरत सुरू आहे. LOI प्रक्रियेमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण होताच नवीन LOI जारी करण्यास लवकरच सुरुवात करण्यात येईल.
07/11/2025
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचे कामकाज सुरळीत…
अलीकडे काही ठिकाणी “महामंडळाचे काम बंद झाले आहे, व्याज परतावा थांबवला आहे” अशा निराधार अफवा पसरवल्या जात आहेत.
या अफवांना कोणतेही तथ्य नाही.
महामंडळाचे सर्व कामकाज नियमित आणि सुरळीत सुरू आहे. ✅
💻 वेब प्रणालीचे Upgradation का चालू आहे?
1️⃣ प्रलंबित असलेले Security Audit पूर्ण करण्यासाठी
2️⃣ यापुढे लाभार्थ्यांना कागदपत्र मंजुरी 15 दिवसांत मिळावी म्हणून
3️⃣ एजंटमार्फत होणाऱ्या आर्थिक फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी
4️⃣ राष्ट्रीयकृत बँकांसोबत Bank API Integration →
लाभार्थ्यांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता व्याज परतावा थेट खात्यावर
5️⃣ CSC केंद्रांतून फक्त ₹70 मध्ये सेवा उपलब्ध
6️⃣ मोबाईल App → अर्ज आणि व्याज परतावा मोबाईलवरूनच
7️⃣ माहिती व मार्गदर्शनासाठी Smart Bot
✳️ सर्वांना विनंती
👉 कोणत्याही अफवेवर किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका
👉 नेहमी महामंडळाच्या अधिकृत माध्यमांतूनच माहिती घ्या
महामंडळ समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध आहे.
आपला विश्वास आणि सहकार्य महत्त्वाचे आहे. 🙏💐
20/10/2025
✨🎇 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎇✨
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून
आपण सर्व उद्योजक, लाभार्थी
आनंद, समृद्धी आणि प्रगतीने उजळलेली दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟
ही प्रकाशमय पर्वणी
आपल्या आयुष्यात नवे यश, नवीन संधी आणि उज्ज्वल भविष्य घेऊन येवो.
आपल्या प्रत्येक स्वप्नाला नवा प्रकाश मिळो हीच शुभेच्छा! 🪔