Mi Eknath Shinde - समर्थक मुंबई

Mi Eknath Shinde -  समर्थक  मुंबई

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mi Eknath Shinde - समर्थक मुंबई, Political organisation, Mumbai.

08/10/2022

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाच्या काळात १० हजारपेक्षा अधिक कर्मचारी बडतर्फ झाले होते, त्यानंतर न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करण्याची कार्यवाही प्रलंबित होती. त्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या आहेत.

08/10/2022

मुंबईतील विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहिले आणि जमलेल्या नागरिकांशी त्यांनी यावेळी संवाद साधला.

#मुंबई

20/09/2022

'मला तुमचं ऐकायचंय' या कार्यक्रमाप्रसंगी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी मराठी नाट्य, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच कलाकारांना पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा, ज्येष्ठ कलाकारांना मानधन मिळावे यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन हे प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

20/09/2022

राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी, नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्यात येणार आहे
सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्यशासन प्रयत्नशील राहील. त्यासाठी नीती आयोगाने राज्याला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केले.
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

20/09/2022

शिवसेनेच्या विविध १२ राज्यातील प्रदेश प्रमुखांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आपला पाठिंबा दिला. या सर्व राज्यात शिवसेना पक्ष संघटना वाढवण्यासाठी राज्य प्रमुखांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

20/09/2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जागतिक ओझोन दिनानिमित्त मुंबई येथे कार्यक्रमात उपस्थित होते. फ्रीज, एसीसारख्या उपकरणांचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे अशा विविध पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण रक्षणासाठी स्वत:पासून सुरूवात करून हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केले.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

20/09/2022

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष व मराठा समाजाचे नेते छत्रपती संभाजी राजे भोसले यांची आज सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली. मराठा समाजाशी संबंधित सर्व विषयावर यावेळी विस्तृत चर्चा झाली.त्यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून शासनाकडून समाधानकारक तोडगा काढण्याबाबत त्यांना आश्वस्त केले.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

20/09/2022

सामान्य मुंबईकरांसाठी आरोग्यसेवा मिळवणे झाले सुखकर !

मुंबईत २२७ आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्रांचा शुभारंभ होणार आहे.या आरोग्य केंद्रांद्वारे सुमारे १३९ वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. या आरोग्य केंद्राद्वारे मुंबईकरांना आरोग्य सेवा मिळणे सोपे आणि सुखकर होणार आहे.
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

20/09/2022

सामान्य मुंबईकरांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून २ ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय अनेक मुंबईकरांना होणार याचा लाभ!
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

20/09/2022

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ वे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने सातारा शहर समृद्ध झाले. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

20/09/2022

लम्पी रोगामुळे ज्या पशु पालकांची पशुहानी झाली अश्या पालकांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. लम्पी रोगाला आटोक्यात आणण्यासाठी सर्वसमावेशक प्रतिबंधक योजना राबविण्यासाठी तातडीने १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mumbai
400001