महाराष्ट्र नवनिर्माण सेना - दहिसर विधानसभा अधिकृत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - दहिसर विधानसभा अधिकृत

Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - दहिसर विधानसभा अधिकृत

23/05/2026

मनसे नेते मा. श्री. अमित ठाकरे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपल्या नेतृत्वातून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश सदैव लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपले कार्य असेच जनसामान्यांच्या हितासाठी प्रेरणादायी राहो. 🚩

— समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सैनिक
दहिसर विधानसभा.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut

11/05/2026

🚨 *RBI मध्ये नोकरीची मोठी संधी!* 🚨

👉 ही संधी सोडू नका – लगेच अर्ज करा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाMNS AdhikrutDahisar Borivali

06/05/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि धडाडीचे नेतृत्व श्री. नयनजी कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut

05/05/2026

महाराष्ट्रात वारंवार होणाऱ्या अत्याचारांच्या घटना
आपली ‘संस्कृती’ मलीन करत आहेत का…?

आपण ‘विकृती’ पोसण्याच्या वाटेवर आहोत का?

हा प्रश्न आता विचारायलाच हवा—
आणि जबाबदारी नेमकी कोणाची?

कायद्याचा धाक संपला का? की गृहमंत्र्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे?”

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut
CMOMaharashtra
PMO India

03/05/2026

आता नाही बोललो तर कधीच नाही…
आज आग्रह आहे, उद्या गरज बनेल! 🔥
मराठीसाठी उभं राहा, पुढे या! 🚩

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut

Photos from महाराष्ट्र नवनिर्माण सेना - दहिसर विधानसभा अधिकृत's post 02/05/2026

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे मा. राजसाहेबांनी, मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना मानवंदना अर्पण केली.

जय महाराष्ट्र ।

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut

02/05/2026

आज केंद्र सरकारकडून “Cell Broadcast – Indigenous Technology” या आपत्कालीन सूचना प्रणालीची चाचणी घेण्यात आली. ही एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त प्रणाली असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत तात्काळ सूचना पोहोचवण्यासाठी तिचा मोठा उपयोग होणार आहे, याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

मात्र, महाराष्ट्र राज्यात ही सूचना सुरुवातीला इंग्रजी तसेच इतर भाषांमध्ये (तमिळ/तेलुगू) प्राप्त झाली आणि त्यानंतर मराठी भाषेत आली. महाराष्ट्रात मराठी ही प्रमुख व स्थानिक भाषा असताना, अशा आपत्कालीन सूचनांमध्ये सुरुवातीलाच मराठी भाषेला प्राधान्य दिले जाणे अपेक्षित आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना माहिती त्वरित व स्पष्टपणे समजणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे संबंधित राज्यातील स्थानिक भाषेतच प्रथम संदेश पाठवणे अधिक परिणामकारक ठरते.

1. प्रत्येक राज्यात संबंधित स्थानिक भाषेला प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
2. त्यानंतरच इतर भाषा (हिंदी/इंग्रजी) यांचा समावेश करण्यात यावा.
3. प्रणालीच्या अंमलबजावणीत राज्यनिहाय भाषिक प्राधान्यक्रम निश्चित करायला हवा होता.

आपण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut
CMOMaharashtra
PMO India

Photos from महाराष्ट्र नवनिर्माण सेना - दहिसर विधानसभा अधिकृत's post 01/05/2026

उद्यानातील नागरिकांच्या सकाळच्या प्रभातफेरीचे जाचक दर वाढ केल्याबाबत – स्थगिती मिळाल्याबाबत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे प्रभातफेरीसाठी करण्यात आलेल्या अवाजवी दरवाढीविरोधात सादर करण्यात आलेल्या निवेदनाची दखल प्रशासनाने घेतली आहे. नागरिकांवर अन्यायकारक ठरणारी ही दरवाढ तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रभातफेरीसारख्या आरोग्यदायी उपक्रमासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क वाढविणे चुकीचे असल्याचे मनसेने ठामपणे मांडले होते. नागरिकांमध्ये निर्माण झालेली नाराजी, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि वाढती महागाई यांचा विचार करून प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.

ही स्थगिती म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या पाठपुराव्याचे यश आहे. पुढेही अशा प्रकारे जनतेच्या हक्कांसाठी मनसे कटिबद्ध राहील. 🚩

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut

01/05/2026

ही पोस्ट भारतातील जनगणना (Census) आणि विशेषतः महाराष्ट्रात मराठी भाषिकांची नोंद कशी करावी याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे.

महाराष्ट्रात उद्यापासून 'स्व-गणना' मोहिमेला सुरुवात !

तुमची माहिती, आता तुमच्या हातात ! २०२७ च्या जनगणनेसाठी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत 'सेल्फ-इन्युमरेशन' (स्व-गणना) se.Census.gov.in ही पोर्टल सुरू होत आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

आपली नोंदणी वेळेत पूर्ण करा.

थोडक्यात मुद्दे:

* भारताची जनगणना आता पुन्हा सुरू होत आहे (ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे).
* नोंदणी करताना तुम्हाला कोणत्या भाषा येतात हे विचारले जाईल.
* त्या वेळी फक्त “मराठी” असा उल्लेख करावा.
* जर तुम्ही मराठीसोबत इतर भाषा (उदा. हिंदी/इंग्रजी) नमूद केल्या, तर तुमची नोंद “बहुभाषिक” म्हणून होईल.
* त्यामुळे मराठी भाषिकांची एकूण संख्या कमी दिसू शकते.
* भाषिक लोकसंख्येवरूनच काही प्रमाणात सरकारी निधी आणि धोरणे ठरतात, म्हणून ही बाब महत्त्वाची आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut

01/05/2026

🚧 NMDC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!🚧
(भारत सरकारचा उपक्रम)

👷‍♂️ पद: ज्युनियर इंजिनियर (मायनिंग)

📚 पात्रता:
✔️ मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा
✔️ मेटलिफेरस मायनिंग प्रमाणपत्र

🎂 वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
👉 SC/ST: 5 वर्षे सवलत | OBC: 3 वर्षे सवलत

💰 वेतन: ₹40,000 ते ₹1,40,000 + 45% बेनिफिट्स

🎓 प्रशिक्षण: 1 महिन्याचे ऑन-जॉब ट्रेनिंग

🌐 अर्ज करा:
👉 (http://www.nmdc.co.in)

📅 शेवटची तारीख:
⏰ 6 मे 2026 (रात्री 11:59 पर्यंत)

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mumbai
400068