03/11/2022
ह्या महाराष्ट्रात रेल्वे स्थानकांची नावे राम मंदिर-मस्जिद-चर्चगेट आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस सुद्धा आहेत पण ह्याच महाराष्ट्रात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस का नाही?
कारण एकच आजही ह्या महाराष्ट्राला महामानव कळालेला नाही. आज काय करत आहोत आपण? वर्षातील एक दिवस ६ डिसेंबरला नामांतराची मागणी होते आणि बाकीचे ३६४ दिवस सर्व शांत... गेली कित्येक वर्ष आपला समाज फक्त मागणी करत आहे. आता वेळ आली आहे लढा उभारण्याची! परिवर्तन घडविण्याची!
आता मागायचे नाही तर हिसकावून घ्यायचे कारण ही फक्त एक मागणी नसून आपला हक्क आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते:
"हक्क हे भीक मागून मिळत नसतात तर ते संघर्ष करून मिळवावे लागतात"
#दादर_नाही_चैत्यभूमी_बोला #विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_टर्मिनस_चैत्यभूमी
(टीप: सदर लेख हा कोणत्याही समाज विरोधात नसून उदाहरणार्थ स्थानकांची नावे घेतलेली आहेत.)

22/02/2022