05/06/2026
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष, साकोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व जनसामान्यांचे नेतृत्व करणारे मा. नानाभाऊ पटोले जी यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व समाजसेवेच्या कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच सदिच्छा!
Nana Patole
02/06/2026
आज गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री सचिनजी शेंडे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
30/05/2026
📍 ग्रीनलँड लॉन, गोंदिया
श्री जितेंद्रजी पारधी यांची कन्या काश्वी हिचा पहिला वाढदिवस समारंभ काल उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या मंगलमय सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून चिमुकली काश्वीस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच पारधी परिवाराचे अभिनंदन करून त्यांच्या आनंदात सहभागी झालो.
काश्वीस निरोगी, सुखी, समृद्ध आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
30/05/2026
तिरोड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी नव्या नियुक्त्या..
तिरोडा, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी तिरोडा तालुक्यात विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारधारा व पक्षाची भूमिका गावागावांत पोहोचविण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.
यामध्ये श्री चरणदास भाजीपाले यांची ठाणेगाव जिल्हा परिषद प्रमुख, श्री धर्मेंद्र बोरकर यांची ठाणेगाव जिल्हा परिषद सहप्रमुख, श्री मुरलीधर कटरे यांची कवलेवाडा पंचायत समिती प्रमुख, श्री अनिल रहांगडाले यांची कोयलारी पंचायत समिती प्रमुख तसेच श्री निरज गजभिये यांची मुंडिकोटा पंचायत समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
युवक संघटनेतही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून श्री अश्विन बोबडे यांची सरचिटणीस व कवलेवाडा जिल्हा परिषद प्रमुख, श्री अनिल रहांगडाले यांची उपाध्यक्ष व सरांडी जिल्हा परिषद प्रमुख तसेच श्री गुणराज भैरम यांची सरचिटणीस व सरांडी पंचायत समिती प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण जिल्हाध्यक्ष श्री रविकांत बोपचे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यात पक्षसंघटना अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी युवक, महिला तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यावर पक्षाने विशेष भर दिला आहे. नव्या पदाधिकाऱ्यांवर संघटन वाढविणे, जनसंपर्क मजबूत करणे, नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविणे तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे तिरोडा तालुक्यात पक्षाला अधिक बळ मिळणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये पक्षाची ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री रविकांत बोपचे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. मेघाताई बिसेन, जिल्हा सरचिटणीस श्री नासिर घाणीवाला, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. भाग्यश्रीताई केळवतकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. मंदाताई टेंभरे, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष श्री युवराज शहारे, युवक तालुका अध्यक्ष श्री प्रकाश पटले, शहराध्यक्ष श्री विजय बुद्धे, सरपंच श्री रविंद्र भगत, श्री डीलेश बिसेन, श्री राहुल हेडाऊ आदी उपस्थित होते.
29/05/2026
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या गोंदिया जिल्हा महिला संघटनेच्या सरचिटणीस पदी सौ. भाग्यश्रीताई केळवतकर यांची निवड
महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने गोंदिया जिल्ह्या सरचिटणीस पदी सौ. भाग्यश्री केळवतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष मा. सौ. रोहिणीताई खडसे व जिल्हाध्यक्ष श्री रविकांत खुशाल बोपचे यांच्या मान्यतेने महिला जिल्हाध्यक्ष सौ. मेघाताई बिसेन यांनी नियुक्तीपत्र देत जिल्ह्याच्या महिला सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या विचारसरणीनुसार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री रविकांत खुशाल बोपचे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. मेघाताई बिसेन, महिला तालुका अध्यक्ष सौ. मंदाताई टेंभरे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष श्री युवराज शहारे, शहर अध्यक्ष श्री विजय बुद्धे, ठाणेगाव जिल्हा परिषद प्रमुख श्री चरणदास भाजीपाले, कवलेवाडा पंचायत समिती प्रमुख मुरलीधर कटरे, कोयलारी पंचायत समिती प्रमुख श्री अनिल रहांगडाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
28/05/2026
🕋 ईद-उल-अजहा मुबारक!
त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण
आपल्या जीवनात आनंद, आरोग्य आणि यश घेऊन येवो.
सर्वांना बकरी ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
23/05/2026
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आमगाव व अर्जुनी मोरगाव तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील दोन तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. शशिकांतजी शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष श्री. रविकांत खुशाल बोपचे यांनी नियुक्तीपत्र जारी केले आहे.
यानुसार आमगाव तालुकाध्यक्ष पदावर श्री. घनश्याम रहांगडाले यांची नियुक्ती करण्यात आली असून, अर्जुनी मोरगाव तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी श्री. महेंद्र घनश्यामदास पालीवाल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या विचारसरणीनुसार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
23/05/2026
दूरदृष्टी, नेतृत्व आणि शिक्षणाप्रती असलेली बांधिलकी यांची दखल घेत रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल आमदार रोहितदादा पवार यांचे हार्दिक अभिनंदन!
आपल्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्र अधिक समृद्ध होवो, हीच शुभेच्छा.
Rohit Rajendra Pawar