My Mumbai My Pune

My Mumbai My Pune

Share

My #Mumbai My #Pune #Thane #Nashik

20/08/2022

My Mumbai My Pune

25/12/2021

सपने

पार्ल्याची बिल्डिंग रिडेव्हलमेन्ट ला निघाली.
मुलीच्या आग्रहाखातर मालाड ला पॉश कॉम्लेक्स मध्ये भाड्याने जागा घेतली. 36 मजल्याचे तीन टॉवर .नवीनच होती .
त्यामुळे कमी लोक शिफ्ट झाली होती.
सकाळी फिरून येताना एक मुलगा गाडी पुसत होता .सुरेश
बहुतेक यूपीचा असावा. त्याला म्हटले माझी गाडी पुसशील का ? तो हो म्हणाला .
पैसे किती घेशील ?
तो ....तुह्मी द्याल ते .
अश्या वेळेस आपण नेहमी जास्तच देतो.
आता खूप लोक शिफ्ट होऊ लागली .गाड्याही वाढल्या .गाडी पुसणारी खूप मुले दिसू लागली .
सुरेश ला म्हणालो...तुला कॉम्पिटिशन वाढली .
तो म्हणाला नाहीं, हि मुले मीच आणली ,मीच कॉट्रॅक्ट घेतो आणि ह्यांना पगार देतो .
त्या भागात कबुतरे जास्त होती .एक दिवस एक कबुतर गॅलरीत मरून पडले . काय करावे कळेना .शेवटी सुरेशला बोलावले. त्याने ते उचलून नेले. दुसऱ्या दिवशी तो जाळी लावणाऱ्याला माणसाला घेऊन आला. जाळी लावून घेतली
US ला जाताना वरून मध्य बॅग्स काढणे ,आल्यावर परत वर ठेवणे, सर्व सुरेश करत होता ,पंखे पुसणे, काचा पुसणे हि कामे त्याचीच झाली .
मला फ्रोझन शोल्डरचा त्रास सुरु झाला .ड्रायविंग जमेना. एक दिवस सुरेशला म्हणालो ..ड्राइवर शोध ..त्याने खिश्यातुन ड्रायविंग licance दाखवले ,मग तो वेळ असेल तेव्हा माझा ड्राइवर झाला. सकाळी एका माणसाला घेऊन आला .
साहेब ...हा चांगला मसाज करतो .आपल्या बिल्डिंग मध्ये बऱ्याच जणांकडे कडे करतो ,चांगला आहे .

एक दिवस फिरून येताना गेट समोर भाजीची गाडी दिसली. घरी आलो तर घरात भाजीची पिशवी.
बायको म्हणाली सुरेश ने आणून दिली .त्याचा भावाने च ती गाडी लावली आहे .
पार्ल्याची जागा तयार झाली सुरेश ला म्हटले घर साफ करायला चल .गाडी तोच चालवत होता .
मी ...सुरेश काय नवीन ?
सुरेश .....चायनीस फूड ची गाडी टाकतोय .
रात्री 11 ते 2 muncipalti पोलीस सर्वांची सोय केली आहे. आपल्या बिडिंग मध्ये एक पोलिटिकल लीडर राहतो त्याने मदत केलीये.
साहेब एक सांगू ..
ये बम्बई शहरमे कुछ सपने लेके आया हुं ,वो पुरे करके हि
रहुंगा....
माझे प्रिंसिपल एकच ... कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही ...
मध्ये 1 -2 वर्ष गेली. मुलगी US हुन येणार होती.
बायको म्हणाली घर साफ करून घ्या .चांगल्या प्रोफेशनल लोकांकरून
गूगल सर्च करून एक प्रोफेशनल क्लीनर्स ला फोन केला. काम आणि रेट ठरला .
दुसऱ्या दिवशी बेल वाजली दोन मुले मस्त युनिफॉर्म मध्ये आली .
मला धक्काच बसला .त्यातला एक सुरेश होता.
सुरेश...साहेब हि माझीच कंपनी .मीच फॉर्म केली आहे .काम वाटताना तुमचा पत्ता बघितला म्हणून मीच स्वतः च आलो . कामाची सवय हि मोडायची नाही ...
मला त्याचे शब्द आठवले .
सपने पुरे करके हि रहुंगा ....
मला त्याचे स्वप्न पुरे होताना दिसू लागले....
नाहीतर आह्मी मुंबईकर... भूमिपुत्र ...आमची स्वप्न तर काय
10. ते 5 नोकरी....
ट्रेन मध्ये बसायला चवथी सीट फार फार तर विंडो सीट नाहीतर
एखादी वडा पाव ची गाडी
_

लेखक : unknown

22/12/2021

● हेल्मेट घाला नाहीतर ₹५०० दंड.
●नोपार्किंग मध्ये गाडी ₹३०० दंड.
●नोएन्ट्री मध्ये गाडी ₹ ५०० दंड
●पियूसी नाही ₹१००० दंड.
●नंबरप्लेटचा रंग उडाला ₹२००दंड.
●ट्रिपल सीट ₹२००० दंड.
● प्लास्टिक वापर ₹५०००दंड

◆रस्त्याला खड्डे - कुणालाच शिक्षा नाही.
◆चुकीचे स्पीड ब्रेकर - कुणालाच शिक्षा नाही
◆सिग्नल नादुरुस्त - कुणालाच शिक्षा नाही.
◆रस्त्यावर पाणी साठते - कुणालाच शिक्षा नाही.
◆रस्ते खोदून पुन्हा रिपेअर नाही - कुणालाच शिक्षा नाही.
◆अस्वच्छ रस्ते - कुणालाच शिक्षा नाही.
◆फूटपाथवर पक्षांची कार्यालये - कुणालाच शिक्षा नाही.
◆रस्त्यावर अनधिकृत फ्लेक्स - कुणालाच शिक्षा नाही.

तात्पर्य :- भारतातील सर्व नागरिक गुन्हेगार व दंडास पात्र आहेत!
प्रशासनाची व राजकरण्याची कुठलीही नैतिक अथवा व्यावसायिक जबाबदारी नाही, त्यांची कुठेही मोजदाद नाही। त्यांना सर्व माफ आहे!!
नागरिकांनी फक्त मेहनत करा, कष्ट करा, प्रामाणिकपणे टॅक्स भरा व प्रशासनाची तिजोरी भरा.
*हाक तुमची साथ आमची*
टिप : लेख आवडल्यास आपल्या मित्रमंडळींमध्ये व इतर ग्रुपवर जरुर शेअर करा.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumabi Thane Pune Nashik Jalgaon
Mumbai
400021