07/01/2026
दुसऱ्यांची पोरं पळवून पक्ष वाढवण्यात काहींना धन्यता वाटते. पण राजसाहेबांनी सामान्य घरातील पोरं घडवली, त्यांना मोठं केलं. म्हणूनच कोणतीही सत्ता नसतानाही आजही तरुण त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत.
दुर्दैवाने तीच पोरं दुसऱ्या पक्षात गेल्यावर आपली भाषा आणि ओळख विसरतात. सोयीनुसार पक्ष बदलणारा नेता असू शकतो; पण कार्यकर्ता मात्र ठाम उभा असतो—आपल्या राजासोबत. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच पक्ष मोठा होतो.
जय महाराष्ट्र
जय मनसे
06/01/2026
सन्माननीय राजसाहेब यांचे आगमन
आज सायंकाळी ०४.३० वा
प्रभाग क्र. १०, एक्सर गाव, बोरिवली
23/12/2025
*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना*
*दहिसर विधानसभा*
*जय महाराष्ट्र!*
दिनांक *१४ डिसेंबर* रोजी दहिसर विधानसभा येथे पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यानंतर,
दहिसर विधानसभा सभेअंतर्गत *शाखा क्रमांक ७ व १०* येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सदिच्छा भेट देण्यात आली.
या प्रसंगी उपशहर अध्यक्ष आदरणीय *कुणाल माईणकर सर* तसेच
दहिसर विभाग अध्यक्ष आदरणीय *पांडुरंग दादा राणे* यांच्या उपस्थितीत
दोन्ही शाखांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष
आदरणीय अमित साहेब ठाकरे यांची फोटो फ्रेम सप्रेम भेट देण्यात आली.
हा क्षण विद्यार्थी सेनेसाठी प्रेरणादायी व अभिमानाचा ठरला.
संकल्पना :
*सोहम परुळेकर*
*सागर शं. मोरे*
06/12/2025
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानयोगी, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी भावपूर्ण आदरांजली!
#महापरिनिर्वाण_दिन #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर