01/06/2026
मुंबईच्या महिलांचा बुलंद आवाज, समाजकारण आणि राजकारणाचा सुंदर समतोल साधत शासनाच्या विविध योजनांचे ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या, स्वकर्तृत्वाने अनेक महिलांना प्रेरणा देणाऱ्या यशस्वी उद्योजिका व मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा Yojana Thokale ताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🌹
आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, आपणास उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि घवघवीत यश लाभो, तसेच समाजसेवेचे आपले कार्य अधिकाधिक उंचीवर पोहोचो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. 🙏✨
सौ. आरती निजापकर
महिला मोर्चा मंत्री – मुंबई प्रदेश
20/05/2026
आज मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा Yojana Thokale ताई यांच्या अध्यक्षतेखाली मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांची भेट घेण्यात आली.
यावेळी मुंबई शहरातील वाढते महिलांवरील अत्याचार, बलात्काराच्या घटना, अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण, सोशल मीडियावरील गैरवर्तन तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजनांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
महिला मोर्चाच्या वतीने संवेदनशील भागांमध्ये विशेष पोलीस पथक, ड्रग्सविरोधी विशेष मोहीम, “पोलीस ताई माझी आई” उपक्रम, डिलिव्हरी अॅप कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन तसेच सोशल मीडियावरील अश्लील भाषा व धमक्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मुंबई अध्यक्षा योजना ठोकळे यांच्यासह महामंत्री अंकिता चौधरी सावे, महामंत्री राजवी नाईक, महामंत्री सारिका पवार तसेच उपाध्यक्षा ज्योती दुराफे, मंत्री पायल शहा, कार्यालय प्रमुख श्रद्धा सुर्वे उपस्थित होत्या.
मुंबई शहर महिलांसाठी अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुसंस्कृत बनविण्यासाठी पोलीस प्रशासन सकारात्मक पावले उचलेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Devendra Fadnavis
Mangal Prabhat Lodha
Ameet Satam
BJP Mumbai
20/05/2026
माननीय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या जागतिक दौऱ्यांमुळे भारताच्या भविष्यातील विकासाला चालना मिळत आहे....
12/05/2026
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या “भीम स्वरांजली” या विशेष कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी लाभली.
सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. ना. आशिष शेलार सर यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुरांची अविस्मरणीय मैफिल रंगली होती.
यावेळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे
मुंबई महानगरपालिकेचे गटनेते गणेश खणकर, शिक्षण समिती अध्यक्षा, राजश्री ताई शिरवाडकर
मुंबई भाजपाचे महामंत्री राजेश शिरवडकर सर, महिला मोर्चा अध्यक्षा योजना ताई ठोकळे सर तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
Devendra Fadnavis Ameet Satam Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Rajesh Shirwadkar Yojana Thokale BJP Maharashtra BJP Mumbai
11/05/2026
युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधान मोदींचे 9 महत्त्वाचे संकल्प
जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेल, गॅस, खत आणि इतर आयात वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशहितासाठी प्रत्येक नागरिकाने बचत, संयम आणि स्वदेशीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे, अनावश्यक परदेश प्रवास टाळणे, खाद्यतेल बचत करणे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे आणि पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळणे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे.
“प्रत्येक बचत म्हणजे देशाची शक्ती!” 🇮🇳
#मोदी #आत्मनिर्भरभारत #भारतीयअर्थव्यवस्था #देशहित #स्वदेशी #बचत #भारत 🇮🇳
04/05/2026
🚩🚩🚩
टाटा 👋👋
बाय बाय 👋👋
खतम
धन्यवाद 🙏
Narendra Modi
Amit Shah
21/12/2025
कार्यकर्त्यांना बळ देणारे….
त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारे, तसेच महाराष्ट्र भाजपा नंबर १ चा पक्ष करणारे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.देवाभाऊंचे मनःपूर्वक अभिनंदन!
Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam Captain Tamil Selvan BJP Mumbai Aarti Nijapkar BJP Maharashtra Atul Bhatkhalkar