लिंगायत समाजाची महिला कै.पार्वती गुरुलिंग धवनगिरे या महिलेचा अंत्यविधीला गावातील एका नामांकित व्यक्तीने अडवला.
======================================
मागील पाटेवाडी घटनेला आज ५ दिवस होत नाही तर लगेच कोरेगाव येथे दुसरी घटना घडली महिलेला अंत्यविधीसाठी जागा देत नाही. कोरेगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर अंत्यविधीसाठी जागा देत नाही
#वंचितबहुजनआघाडी #वंचितांचा_हक्क_आहे
#प्रत्येकवंचिताच्या_पाठीशी #वंचितबहुजनसमाज
#वंचितएकवटले_तर_सत्ता_ढवळेल #बहुजनएकजूट
#जैतरेजबहुजन #प्रबुद्धभारत #आंबेडकरीराजकारण
#बाळासाहेबआंबेडकर #भीमआर्मी
#कर्जत
#अहिल्यानगर
Republicnama-रिपब्लिकनामा
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Republicnama-रिपब्लिकनामा, Mumbai.
30/09/2025
सारनाथ स्कूल ऑफ आर्टमधील बुद्ध मूर्तींची वैशिष्ट्ये अत्यंत सूक्ष्म, सौंदर्यपूर्ण आणि आध्यात्मिक भावनेने भरलेली असतात. खाली थोडक्यात वैशिष्ट्ये दिली आहेत:
🌸 मूर्तीचे वैशिष्ट्ये (Sarnath Style Features)
- चेहरा: अत्यंत कोमल, शांत आणि सौम्य हास्य असलेला चेहरा. डोळे अर्धवट मिटलेले, ध्यानस्थ स्थितीत.
- मुद्रा: धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा—बुद्ध दोन्ही हातांनी उपदेश देत आहेत असे दर्शवले जाते.
- वस्त्र: शरीराला चिकटून बसलेले, पारदर्शक वाटणारे वस्त्र. कोणतेही अलंकार नसलेले.
- प्रभामंडल: जटिल पुष्प आणि भौमितिक आकृत्यांनी सजलेले मोठे प्रभामंडल.
- कमलासन: बुद्ध कमलाच्या आसनावर बसलेले असतात, जे आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे.
- शिल्पशैली: उच्चतम शिल्पकलेचे उदाहरण. मूर्ती बलुआ पत्थरात कोरलेली असते.
ही शैली बुद्धाच्या पहिल्या उपदेशाच्या स्मरणार्थ विकसित झाली असून, ती शांती, ज्ञान आणि करुणा यांचे प्रतीक मानली जाते .
29/09/2025
मातंग, चर्मकार, होलार, बौद्ध अनुसूचित जातीची एकजुट तुटणार नाही यासाठी आम्ही लढतो आहोत. कुठेही या घटकांवर अन्याय झाला की आम्ही धावून जातो.
पण टीव्हीवर बसून भांडण करणारे कुठेच नसतात. ते फक्त सत्तेचा मलिदा कसा मिळेल आणि आरएसएसचा अजेंडा कसा राबवता येईल हेच पाहतात.
आम्ही शेकडो मातंग समाजाच्या घटनांना वाचा फोडली, चर्मकार, होलार, वाल्मिकी समाजासाठी धावून गेलो. पण लक्ष्मण ढोबळे आम्हाला कुठेच दिसले नाहीत.
अमर साबळे जनसुरक्षा विधेयकाच्या बाजूने आंदोलन करतात आणि आंबेडकरवादी आंदोलकांना "अर्बन नक्षल" म्हणतात.
आज चिकित्सक, बुद्धिजीवी तरुण आणि विचारवंतांनी भूमिका घेणं गरजेचं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सुनियोजित दंगलीचा अजेंडा सुरु केला आहे. अनुसूचित जातीतील 59 जातीत भांडण लावून त्यांनी हिंदुत्वाचा विषमतेचा अजेंडा राबवायचा आहे. संघातील ढोबळेसारखे हाताशी धरलेले प्यादे त्यांनी पुढे केले आहेत.
एका जातीपुरती मर्यादित लीडरशिप करणारे त्यांनी हाताशी धरले आहेत. मीडियाच्या माध्यमातून ठिणगी टाकण्यास सुरुवात केली आहे.
आपण ढोबळेला कुठेही गाठू, पण आरक्षण संपवणारी भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्याला मोठा विरोध करावा लागेल.
अनुसूचित जाती दलितांनो, जर वेगवेगळे झालात तर पुन्हा विषमतेचे गुलाम व्हाल. त्यामुळे एकजुटीने राहा, अन्यथा तुमचं अस्तित्व धोक्यात येईल.
सत्तेत बसून समाजरक्षण करायला निघालेल्या सगळ्यांपासून सावध राहा. सामाजिक दरी निर्माण झाली तर ती पुन्हा जोडता येणार नाही.
सामाजिक भांडण लावणाऱ्या फडणवीस यांना मोठा विरोध सुरु करा.
"ढोबळे आणि साबळे" यांना जात नाही, धर्म नाही, विचार नाही. ते फक्त संघाचे पायदळ आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की, देशात कुठेही सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय लागू करणार नाही. मग देवेंद्र फडणवीस हे का उतावीळ झालेत? त्यांना त्यांच्या नेत्याचा आदेशसुद्धा मान्य नाही का?
जातीवर एकमेकांवर बोलू नका आणि संघाच्या षडयंत्राला बळी पडू नका!
आपली टार्गेट "जात" नाही, ही जातीत फूट पाडणारी "सत्ता" टार्गेट आहे. सत्तेत बसलेला प्रत्येकजण त्यांचा अजेंडा राबवतो, हे कायम लक्षात ठेवा!
Deepak Kedar
OBC संघटनाना जाहीर पाठिंबा
भिमराज सेना
#
Raju Thate
या 90 वर्षीय आजी निळा झेंडा प्रशासनाने काढला म्हणून हिंगोली लॉंग मार्च मध्ये सामील झाल्यात
सॅल्यूट आजी
08/09/2025
एकदा भगवान बुद्ध भिक्षूंना घेऊन एखाद्या गावातून जात होते. गावातील एक व्यक्ती बुद्धांवर रागावलेला होता. तो आला आणि बुद्धांना शिव्या देऊ लागला. त्याने अनेक अपमानास्पद शब्द वापरले, पण बुद्ध मात्र शांत उभे राहिले.
थोडा वेळ झाल्यावर तो मनुष्य थकला आणि म्हणाला:
"तू इतक्या शिव्या खाल्ल्यास, राग का नाही आला? काही उत्तर का नाही दिलेस?"
तेव्हा बुद्ध म्हणाले:
"भाऊ, जर कुणी एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देतो आणि ती व्यक्ती ती स्वीकारत नाही, तर ती भेटवस्तू कुणाकडे राहते?"
तो मनुष्य म्हणाला:
"ज्याने दिली त्याच्याकडेच राहते."
बुद्ध हसून म्हणाले:
"तसंच आहे. तू मला शिव्या दिल्यास, पण मी त्या स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे त्या शिव्या तुझ्याचकडे राहिल्या. माझ्या मनात त्यांचा काही परिणाम झाला नाही."
धडा:
शिव्या, राग, अपमान जर आपण स्वीकारला नाही तर त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही.
शांतता आणि संयम हेच खरे सामर्थ्य आहेत.
संदर्भ (Sources):
संयुक्त निकाय (Saṃyutta Nikāya), सल्लेय्यवग्ग, अक्कोसेय्य सुत्त (SN 7.2)
विद्यार्थी वसतिगृहात मारहाणीचा हा क्रूर व्हिडिओ कुठल्या ठिकाणचा व कोणत्या वस्तीगृहातला प्रकार आहे यांचा शोध घेवून आम्हाला कळवा..
शिकणाऱ्या मुलाच्या पालकांसाठी ही एक अतिशय धोक्याची बाब आहे. कृपया ही घटना मुलाच्या पालकांना आणि नातेवाईकांना कळवून आम्हाला कळवा. विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात अशा घटना वारंवार घडताय. यामागचा शोध घेणे गरजेचे आहे.
06/09/2025
UNESCO World Heritage Site “Mahabodhi Mahavihara” , Bodhgaya , India .
महाबोधी महाविहार हे बिहार राज्यातील बोधगया येथील एक विहार आहे. यास जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे. शाक्य वंशाचे राजकुमार सुकीती (सिद्धार्थ गौतमांना) या ठिकाणी ज्ञान प्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्ध’ बनले, व ‘बुद्ध’ म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले.
फडणवीस आणि जरांगे यांनी पोरखेळ लावला
Raju Thate
01/08/2025
Didn't volunteers Naresh Rajkondwar and Himanshu Panshe die in 2006 from a string firecracker Deepak Kedar
केंद्रात राज्यात आरोपींच्या विचारसरणीचे सरकार असल्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आलेला निकाल अपेक्षित होता. या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाने खासदार म्हणून बसवले, त्याच दिवशी हे प्रकरण संपलेलं आहे.
शहीद हेमंत करकरे यांच्या धाडसाला सलाम आहे!
मालेगाव बॉम्ब स्फोट कुणी केला हा प्रश्न मात्र प्रलंबित राहिला!
धार्मिक उन्मादी प्रवृत्तीचे मनोबल वाढणार आणि हा देशासाठी धोका आहे!
- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना
Deepak Kedar
✅ पुन्हा खामगाव हादरलं... "पाळा खडकी" येथील घटना!
तु जेवा भेटशील तेव्हा तुझं कांड करू.. "तुझा गर्व"कशा काय जात नाही?
म्हणत दलित बौद्ध अजय सोनटक्के तरुणावर जीवघेणा हल्ला केला. शेतात ट्रॅक्टरने नागरणी केल्याचे 5000 रुपये मागितले म्हणून गावगुंडानी हा हल्ला केला आहे.
रोहन पैठणकर यांच्यावरील हल्ल्याच प्रकरण ताज असताना पुन्हा दलित तरुणावर हा हल्ला गंभीर आहे.
🔘 खामगाव पोलीसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी. 🔘 पीडित तरुणाला पोलीस संरक्षण द्यावे.
🔘गृहमंत्री दलित अत्याचार यावर गप्प आहेत.
🔘 कोणत्याच घटनेवर ते बोलत नाहीत.
🔘 राज्यात दलितांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
🔘 तात्काळ या घटनेची त्यांनी दखल घ्यावी.
🔘 पोलीस अधीक्षकांनी तात्काळ आरोपीना अटक करण्यासाठी प्रयत्न करावेत.
केवळ घामाचे पैसे मागितले म्हणून झुंडिने मारहाण करण्यात आली. एका 24 वर्षीय तरुणाला भयंकर मारहाण करण्यात आली आहे. तो ओरडत राहिला पण कुणीही त्याला मदत केली नाही. त्याने त्याच्या हातात मोबाईलने रेकॉर्डिंग केली. या रेकॉर्डिंगचा आधार घेऊन पोलीसांनी आरोपीना ताब्यात घ्यावे. तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल!
पोलीसांचा धाक या भागात राहिलेला नाही. त्यामुळे जातीय गुंड बोकाळले आहेत.
भारतीय ब्लॅक पॅंथर संघटना जाहीर निषेध करत आहे!
Deepak Kedar
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Telephone
Website
Address
Mumbai
