Yuva Janata Dal Secular - Mumbai

Yuva Janata Dal Secular - Mumbai

Share

Our Party:
We believe that everyone needs to be together and that everyone together can achieve more

Photos from Yuva Janata Dal Secular - Mumbai's post 26/11/2022

https://youtu.be/5XhThYqNbyM

गायरानग्रस्तांसाठी जनता दलाचे निषेध मोर्चा तसेच शासनाला निवेदन

शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित

ही लढाई एकजुटाने शासनाविरोधात लढू आणि न्याय मिळवून देऊ-महेश (बंटी) कोरी

गायरान आमच्या मालकीचे आहे-स्वाती (ताई) कोरी

गायरानग्रस्तांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढू-श्रीपतराव शिंदे

अन्यायग्रस्तना न्याय मिळवून देईपर्यंत शांत बसणार नाही-बाळेश नाईक

✳️ जनता दल सेक्युलर महाराष्ट्र ✳️

16/10/2022

📯 युवा जनता दल सेक्युलर मुंबई आयोजित दीपावली निम्मित मुंबई शहर मर्यादित किल्ला स्पर्धा २०२२📯

महाराष्ट्राचं वैभव म्हणजे गड किल्ले..
शौर्य, हिम्मत, लढाईचा इतिहास म्हणजे गड किल्ले...
स्वराज्य तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर एक एक क्षण ज्यांनी जगले ते म्हणजे गड किल्ले...
माहिती प्रत्येक किल्ल्याची एक सोनेरी इतिहासाची.💐💐

चला तर मग ह्या दिवाळीत आपल्या गड किल्ल्याची ओळख, आपल्या नविन पिढीला करवून देऊ.🖼️🖼️

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्यांचा इतिहास
वैभवशाली इतिहास..

✒️ स्पर्धेचे नियम✒️
१) ही स्पर्धा मुंबई शहर मर्यादित आहे.
२) किल्ला मातीचा बनवलेला असावा
३) स्पर्धा दोन गटात होणार आहे.
पहिला गट:बाल किल्लेदार ( वय मर्यादा ५ - १५ वयोगटातील )
दुसरा गट: किल्लेदार - ( वय मर्यादा १५ आणि पुढे )
४) ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीची असून सहभाग घेतलेल्यानी खालील संपर्क नंबर दिलेल्या वॉट्सअप वर आपल्या किल्याची संपूर्ण माहिती आणि किल्याचा विडिओ २३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पाठवावे.
५) सर्व सहभागी स्पर्धाकांना प्रमाणपत्र दिले जाईल.

🎉🎉 पारितोषिक :पहिला गट ( वय मर्यादा ५ - १५ वयोगटातील ) : बाल किल्लेदार - आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
दुसरा गट ( वय मर्यादा १५ आणि पुढे ) : किल्लेदार - तीन पारितोषिक (आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)

🔰 आयोजक : केतन कदम ( युवा जनता दल सेक्युलर मुंबई )

📌 संपर्कासाठी 🏃🏾‍♂️🚶‍♂️🚶‍♀️ :
मुंबई उत्तर विभाग - किरण बागुल- 9892264077, सुधीर यादव-9769253452

मुंबई उत्तर पश्चिम विभाग - सुमित कांबळे - 9920211975 (अविष्कार प्रतिष्ठान)

मुंबई ईशान्य विभाग - निलेश सावंत - 9892458161

मुंबई उत्तर मध्य विभाग - आदित्य साळवे - 9867930141, प्रशांत जाधव 8097102052

मुंबई दक्षिण मध्य विभाग - योगेश कांबळे-9022090096, अविनाश कदम-8779747790

मुंबई दक्षिण विभाग - दिपक वागळे-9967897733, पंकज कांबळे 8898179160

📌📌 नोंदणीसाठी गूगल फॉर्म📌📌:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfntA6P1tFD-IoszIYbxv0w_8zOqX-CqK38Xvv7U4f2LpG05g/viewform?usp=sf_link

हर एक का बल जनता दल

10/10/2022

किल्ला स्पर्धा २०२१ च्या घवघवीत यशानंतर पुन्हा एकदा दिवाळी निमित्त मुंबई शहर मर्यादित किल्ला स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात येणार आहे.त्या संदर्भातील माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल.
आयोजक
युवा जनता दल मुंबई आणि देवांश सामाजिक संस्था

Photos from Yuva Janata Dal Secular - Mumbai's post 18/09/2022

पुढचे पाऊल...
एका शासकीय उपक्रमातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर काल प्रदेश जनता दलाच्या कार्यालयात दुसरी बैठक झाली. या उपक्रमात सुमारे ३५० कंत्राटी कामगार आहेत.
बैठकीला साधारण ४० - ४५ कामगार उपस्तिथ होते तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात आले,यावेळी रितसर संघटना स्थापन करून या कामगारांचे प्रश्न व्यवस्थापनकडे मांडण्याचा तसेच त्यांच्यावरील अन्यायाबाबर केंद्रीय कामगार न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला.
जनता दल सेक्युलर आव्हाहन करते कि संघटित आणि असंघटित कर्मचाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. नवीन कामगार कायद्यामुळे कामगार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या आणि पूर्णतःवास नेण्यासाठी जनता दल सेक्युलर नेहमी कटीबद्ध आहे आणि असेल.

आपला केतन कदम
8657192742
बेरोजगार युवा समिती
जनता दल सेक्युलर

30/03/2022

नीतिमान सरकारने राज्यातील तीनशे आमदारांना दुसरा घरोबा थाटता यावा, यासाठी मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. प्रारंभी झालेल्या टीकेमुळे आता मोफत नव्हे तर ७५ लाखाला म्हणे ही घरे देण्यात येणार आहेत. खरे तर या किमतीत मुंबईच्या टोकाला वन रूम किचनचे घर फार तर मिळू शकते. परंतु आपल्या दयाळू सरकारने आमदारांना परवडणाऱ्या किमतीत ही घरे देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.
खरे तर संपूर्ण अधिवेशन काळात महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात सातत्याने खडाजंगी उडत होती. मात्र आमदारांचा निधी चार कोटींवरून पाच कोटी करण्याचा निर्णय घेताना आणि आमदारांना घरे देण्याचा निर्णय जाहीर करताना सर्वपक्षीय एकमत दिसून आले. यापूर्वी आपल्याच सरकारने आमदारांना गाड्या घेण्यासाठी तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज देऊ केले होते. त्यावेळीही असेच एकमत होते.
असो, महोदय आपल्याला सांगू इच्छितो की, मुंबईत परवडणाऱ्या किमतीत घरे घेऊ इच्छिणाऱ्या रहिवाशांची संख्या जवळपास दहा लाख आहे. त्यांना निवारा हवा आहे, पण बिल्डरांकडून सांगण्यात येणारे दर त्यांना परवडत नाहीत! म्हणून ते भाड्याच्या घरात वा छोट्या खुराड्यांमध्ये राहत आहेत. ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे आणि बाबुराव सामंत यांच्या नेतृत्वाखाली परवडणाऱ्या किमतीतील घरांसाठी दुसरे आंदोलन सुरू झाले, त्यावेळीही सव्वा लाख लोकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये भरून महाराष्ट्र सरकारकडे अर्ज केले होते. पण आपल्या आघाडी सरकारचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यूएलसी कायदाच रद्द करून मुंबईकरांच्या आशेवर पाणी फिरवले. त्यानंतरही या कायद्याअंतर्गत राज्य सरकारला मिळालेल्या एक हजार एकर जमिनीवर पाणी सोडण्याचे काम आपल्या पक्षाच्या सरकारने केली आहे.
या मुंबई शहरात अनधिकृत झोपड्या बांधणारांना घर मिळू शकते, सरकार, महापालिका, रेल्वे यामधले बाबू स्वतःसाठी घरे मिळवू शकतात, सरकारी कर्मचारी त्यांना राहण्यासाठी भाड्याने दिलेल्या घरांवर कायमचा हक्क सांगू शकतात; पण, सामान्य मुंबईकरांना हक्काचा निवारा मिळू शकत नाही! त्यांना मोफत काही नको असून, गोरेगावच्या नागरी निवारा सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून परवडणाऱ्या किमतीत घर हवे आहे. पण त्यासाठी काही करण्याची आपल्या सरकारची तयारी दिसत नाही.
मात्र, या ३०० बेघर आमदारांच्या निमित्ताने मुंबईत परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध नाहीत; अगदी कोट्यधीश आमदारांनाही मुंबईतील घरे परवडणारी नाहीत हे आपल्या लक्षात आले असावे, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना मुंबई विषयी मुळीच प्रेम नसून या शहराकडे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून पाहतात, असा समज आहे. त्यामुळे तीनशे आमदारांना मुंबईकरांचे प्रश्न समजावेत म्हणून त्यांना थेट मुंबईकर करून त्यांच्या मनात मुंबई विषयी प्रेम निर्माण करण्याचा आणि त्यांच्या मदतीने मुंबईकरांचे प्रश्न सोडविण्याचा उदात्त हेतू आम्हाला दिसत आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर राज्यभरातील आमदारांना परवडणाऱ्या किमतीत घर देण्याच्या निर्णयाचे सामान्य मुंबईकरांच्या वतीने आम्ही स्वागतच करतो. वास्तवात माहूल येथे हजारो घरे आज पडून आहेत. अगदी दोन-तीन घरे जोडून आमदारांना ती दिली तरी तीनशेच नव्हे सर्वच आमदारांची सोय होऊ शकेल. तरी सर्व आमदारांची सोय करण्याच्या दृष्टीने या सचनेचा विचार व्हावा, ही विनंती! ( त्यामुळे सामान्य मुंबईकरांचे जगणेही लोकप्रतिनिधींना कळू शकेल)
नवीन वास्तू घेतल्यानंतर संबंधित कुटुंबाला काही भेट देण्याची आपली प्रथा व परंपरा आहे. त्यामुळे मुंबईकर होणाऱ्या आमदारांना निवाऱ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांच्या वतीने चड्डी-बनियान आणि महिला आमदारांना साडी-चोळी भेट देण्याचा निर्णय निवारा अभियान, मुंबई या परवडणाऱ्या किमतीतील घरांसाठी लढाई लढणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही घेतला आहे.
तरी या ३०० आमदारांची नावे व पत्ते आम्हाला कळिवण्यात यावीत, ही विनंती! आपण सांगितल्यास मुंबईकरांना आवाहन करून आमदारांना दुसरा घरोबा थाटण्यासाठी लागणाऱ्या भांड्याकुंड्यांची सोय करून देण्याची आमची तयारी आहे, याचीही नोंद घ्यावी.
तरी कृपया लवकरात लवकर, ही यादी पाठवावी, ही विनंती!

आपले विश्वासू,

श्रीपाद लोटलीकर, प्रभाकर नारकर, प्रकाश जाधव

जगदिश नलावडे संजीवकुमार सदानंद केतन कदम

निवारा अभियान, मुंबई

15/03/2022
Photos from Yuva Janata Dal Secular - Mumbai's post 12/03/2022

प्राचार्य डॉ.किशोर खुशाले (KEM Hospital - HOD, Anatomy Department ) यांची युवा जनता दल मुंबई अध्यक्ष केतन कदम यांनी त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी युवा जनता दल मुंबई सचिव दिपक वागळे आणि योगेश कांबळे, बिपीन जाधव उपस्थित होते.

11/03/2022

जनता दलातर्फे अलिकडेच भांडूप पश्चिम भागात एक क्रीडांगण विकसित करण्यात आले आहे. या क्रीडांगणावर आज (स्थानिक संघ) आणि उद्या (राज्य पातळीवरील) व्हॉलिबॉलचे सामने रंगणार आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही नामवंत खेळाडू उद्याच्या सामन्यांच्या वेळी उपस्थित राहणार आहेत. दोन्ही स्पर्धांचा बक्षिस समारंभ उद्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास अंतिम सामना झाल्यावर होणार आहे. शक्य असेल त्यां जनता दलाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी सामन्यांच्या ठिकाणी भेट द्यावी!
धन्यवाद!

05/03/2022

मुंबईतील टोईंग बंद?
आज युवा जनता दलाच्या शिष्टमंडळासह मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली!
यावेळी मुंबईतील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली.
मुख्यत: रस्त्यालगत उभी केलेली वाहने उचलून नेण्याच्या प्रकारामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. पार्किंगची सुविधा नसल्याने लोक नाईलाज म्हणून वाहने रस्त्यालगत उभी करतात, याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. असे वाहन उचलून नेल्यामुळे अनधिकृत पार्किंगच्या दंडाबरोबरच, वाहन उचलून नेण्याचे शुल्क वसूल केले जाते, तसेच ते सोडवून आणण्यासाठी रिक्षा वा टॅक्सी करावी लागण्याबरोबरच तास-दोन तासांचा वेळही मोडतो. याबाबत गाडी उचलून न नेता अनधिकृत पार्किंगचा स्टिकर संबंधित वाहनावर लावून नंतर तेवढाच दंड वसूल करण्याचा विचार करण्यात येणार आहे. मात्र, संबंधित वाहन बराच काळ तेथेच उभे राहिल्यास ते उचलून नेले जाणार आहे!
उपस्तित जनता दलाच्या शिष्टमंडळात मुंबई अध्यक्ष प्रभाकरजी नारकर मुंबई युवा अध्यक्ष केतन कदम, दक्षिण मुंबई युवा अध्यक्ष पंकज कांबळे दक्षिण मुंबई युवा अध्यक्ष किरण बागुल, उमेश मोहिते आणि अविनाश कदम होते.

Photos from Yuva Janata Dal Secular - Mumbai's post 22/02/2022
Photos from Yuva Janata Dal Secular - Mumbai's post 20/02/2022

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी विविध मंडळांनी वेगवेगळ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नेत्रदिपक सजावटी करून शिवरायांचे आचार आणि विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच महाराजांची जयंती आनंदोत्सवात साजरी केली. या मंडळाना प्रोत्साहन म्हणून युवा जनता दल मुंबई तर्फे सन्मानपत्र आणि शिवाजी कोण होते या पुस्तकाच्या १५ प्रती देण्यात आल्या.

आपला,
केतन कदम
युवा जनता दल सेक्युलर मुंबई
8657192742

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mumbai