06/07/2021
अखिल सार्वजनिक उत्सव समिती (महाराष्ट्र) यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तिकार यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकातील अटी महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तिकार यांना मान्य नसून त्या शिथिल करण्यात याव्या अशी मागणी समितीतर्फे राजसाहेबांना करण्यात आली.
राजसाहेबांनी आपलं मत व्यक्त करताना उत्सव हा उत्सवासारखाच झाला पाहिजे . मी मुख्यमंत्र्यांशी या विषयांवर बोलतो आणि लवकरात लवकर चर्चेच्या माध्यमातून या विषयावर मार्ग निघेल असे आश्वासन दिले.
Follow Frame Me Media on:
► Facebook: https://www.facebook.com/framememedianews
► Instagram: https://www.instagram.com/framememedianews
► YouTube: https://youtube.com/c/FrameMeMedia?sub_confirmation=1
►Website: https://framememedia.com/m/framememedianews
#मुंबईचा_गणेशोत्सव #खळ्ळखट्याक #मनसे
30/06/2021
गणेश भक्ताची आर्त हाक...
लालबाग परळ
मुंबई गणेशोत्सवाचं माहेरघर
आम्ही असे उत्सव साजरे केले की जगाने कौतुक केलेय आमचे...कधी शिस्तीसाठी ,कधी व्यवस्थापनासाठी ,कधी गर्दिसाठी तर कधी आमच्यात असलेल्या एकनिष्टे साठी
हजारो भाविक जमतात रस्त्यावर जेव्हा चिंतामणी चे आगमन होते.पण इतक्या गर्दीतही कधी वाद विवाद नाहीत....ही आमची शिस्त
दोन दोन दिवस उभे असतात लालबाग राजाच्या दर्शनाला पण कधी त्यांची गैरसोय नाही ...हे आमचे व्यवस्थापन
२२ फुटा ची मूर्ती बसवून बाहेर भव्य देखावा उभा करून गणेश गल्ली नेहमीच थाटात उभी राहिलीय...ही आमच्या उत्सवा ची भव्यता
उंच मूर्ती बनवून नेहमीच सामजिक कार्य करणारा आमचा परेल चा राजा... हे आमचे
सामाजिक भान
सुबक..पाहताच राहावे अशी मूर्ती आणि पारंपरिक विसर्जनासाठी प्रसिध्द आहे माझा तेजुकाया चा राजा...२ टन वजन असून सुद्धा मूर्ती खांद्या वरून विसर्जन करताना पाहिले आहे अख्या चौपटीने आणि जगाने..ही जिद्द आणि एकनिष्ठ आमची...
शिस्त, व्यवस्थापन,सामजिक भान याचे उदाहरण बनवून ठेवले आहे आमच्या गणेशोत्सव मंडळांनी
शिर्डी च्या पालख्या बंद
पंढरपुरात वारी बंद
दहीहंडी बंद
प्रदूषणाच्या नावाखाली होळी बंद
दिवाळी बंद
शासन नक्की आमचे च आहे ना ??
नियमावली गेल्या वर्षी ही दिली आणि आम्ही मंडळांनी ती पाळली सुद्धा कारण आम्हाला ही कळते हो संकट जगावर आहे आणि आपण एकत्र येऊन लढले पाहिजे...पण
ही संकटे जेव्हा पक्षाची रॅली होते तेव्हा कुठे जातात..?
मेट्रो उद्घाटनाला कोरोना नाही
आम्हालाही तुमची नियमावली बनवताना सांगा..आम्हाला ही आमचे मत आणि व्यवस्थापन मांडण्याची संधी द्या...
असो
शेवटी एकच विनंती आहे शासनाला गणेशोत्सव आम्हाला सन नाही भावना आहे आमची....त्या बरोबर खेळू नका🙏
गणेश भक्त
लालबाग/परळ
Follow Frame Me Media on:
► page: https://www.facebook.com/framememedianews
► Instagram: https://www.instagram.com/framememedianews
► YouTube: https://youtube.com/c/FrameMeMedia?sub_confirmation=1
►Website: https://framememedia.com/
24/06/2021
या वर्षी ट्रॉली वर कि पाटा वर ?
कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा..