05/03/2022
➡ *दिनांक व वेळ :* -04/03/2022
रोजी दुपारी 12.45 ते 13.30 वाजताचे दरम्यान.
➡️ *जनजागृती केलेले ठिकाण*-
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन बीएमसी शाळा (हिंदी मेडीयम), गुंदवली, अंधेरी पूर्व, मुंबई
➡️ *निर्भया पथकाने 1 ली ते 4 थी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींबरोबर संवाद साधून खालील मुद्द्यांवर माहिती देऊन मार्गदर्शन केले* -
1. निर्भया पथक विषयी माहिती.
2. *गूड टच बॅड टच* म्हणजे काय आहे ते समजावून सांगितले.
3. उपस्थित मुला-मुलींना त्यांचे आई किंवा वडिलांचा मोबाईल नंबर लक्षात ठेवण्यास सांगितले तसेच सोबत लिहून ठेवण्यास सांगितले.
4. अनोळखी माणसाने कुठली खाण्याची वस्तू दिली तर ती घेऊ नये व त्याच्या सोबत न जाण्याच्या सूचना दिल्या.
5. सदर शाळेतील मुला-मुलींबरोबर किंवा त्यांच्या ओळखीचे मुलींबरोबर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार/ गैरप्रकार झाल्यास तात्काळ त्यांच्या आई-वडील, नातेवाईक, शिक्षकांना किंवा पोलिसांना कळवण्याचे सूचना देण्यात आल्या.
6.स्वसंरक्षणबाबत माहिती.
7. घरातून बाहेर पडताना आई वडील किंवा घरात कोणी असेल त्यांना सांगून जाण्याच्या सूचना दिली.
8.मुला-मुलींना त्यांचे सोबत होणाऱ्या *अनुचित प्रकाराबाबत सांगणे असुविधाजनक* वाटत असल्यास पोलीस ठाणे हद्दीत ठेवण्यात आलेल्या *तक्रार पेट्यांमध्ये लिखित स्वरूपात तक्रार* देण्यास सांगितले.
9. तसेच त्यांच्यासोबत काही गैरप्रकार घडले किंवा निदर्शनास आल्यास हेल्पलाईन क्रमांक 100, 103 तसेच अंधेरी निर्भया मो. क्र.- 8591935824 वर त्वरित संपर्क साधण्यास सांगितले किंवा शक्य असल्यास स्थानिक पोलीस स्टेशनला कळविण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले.
सदर वेळी 60 विद्यार्थिनी, 71विद्यार्थी असे *एकूण 131 विद्यार्थी व* 5 शिक्षिका 2 शिक्षक उपस्थित होते.

05/03/2022
07/10/2021