02/07/2026
दिनांक: 30 जून 2026
।। जय जवान ।। जय किसान ।। जय भूमिपुत्र ।।
भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांचा तानसा येथे"एल्गार मोर्चा"प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न
*तानसा,शहापूर:* कुणबी सेना व आंतरराष्ट्रीय बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा कार्यालयावर आज दि. 30 जून 2026 रोजी आयोजित *"एल्गार मोर्चा" हजारो भूमिपुत्र, शेतकरी व प्रकल्पग्रस्तांच्या प्रचंड उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीपणे संपन्न* झाला.
*कुणबी सेना प्रमुख मा. श्री. विश्वनाथ जी पाटील साहेब* यांच्या नेतृत्वाखाली व *आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दिनेश दादा पाटील* यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला.
*मोर्चाचे ठळक मुद्दे:*
1. *विराट जनसागर:* ठाणे व पालघर जिल्ह्यातील 82 गावांमधून आलेल्या भूमिपुत्र, महिला, युवक व शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एकजुटीचे विराट दर्शन घडवले.
2. *श्रीमान दिनेश दादा पाटील यांचे आक्रमक भाषण:* व्यासपीठावरून बोलताना दिनेश दादा पाटील म्हणाले, _"जमिनी आमच्या, पाणी आमचे, त्याग आमचा... मग अन्याय का? 950 भूमिपुत्रांना नोकरी देणारे विश्वनाथ पाटील साहेब हेच खरे लोकनेते आहेत. पद नसतानाही त्यांनी जे काम केले ते सत्तेत बसलेल्यांना जमले नाही. जमीन कायमची घेतली मग नोकरी फक्त 13 वर्षे? वारसाला नोकरीचा हक्क मिळालाच पाहिजे. जलवाहिनीच्या कडेला भूमिपुत्रांसाठी भव्य हॉस्पिटल झालेच पाहिजे. आजचा हा एल्गार म्हणजे शेवटचा इशारा आहे."
3. *मा. विश्वनाथ पाटील साहेब यांचा निर्धार:* _"25 वर्षे आम्ही लढलो, 950 नोकऱ्या मिळवल्या, 82 गावांना पाणी दिले. पण शासनाला अजूनही जाग येत नाही. नवीन धरणे बांधून आमच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. जोपर्यंत भूमिपुत्राला 50% पाण्याचा वाटा, वारसाला नोकरी व सुसज्ज हॉस्पिटल मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही."
4. *प्रशासनाला निवेदन:* मोर्चाच्या शेवटी मनपा अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 15 दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास *पुढील आंदोलन अधिक तीव्र व निर्णायक असेल,* असा इशारा यावेळी देण्यात आला.
*प्रमुख मागण्यांचा पुनरुच्चार:*
- जलवाहिनी बाधितांना कायमस्वरूपी नोकरी
- कमी केलेल्या भूमिपुत्रांना पुन्हा सेवेत घेणे
- प्रकल्पग्रस्तांना वारसा हक्काने नोकरी
- सर्व धरणांमधून ठाणे-पालघरला 50% पाण्याचा वाटा
- भूमिपुत्रांसाठी अत्याधुनिक हॉस्पिटल
आजच्या एल्गार मोर्चाने शासन व मनपा प्रशासनाला भूमिपुत्रांच्या एकजुटीची व ताकदीची जाणीव करून दिली आहे. हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील.
।। भूमिपुत्र एकजूट जिंदाबाद ।।