09/10/2021
➡ *पोलीस ठाणे*- भायखळा पोलीस ठाणे, मुंबई
➡️ निर्भया पथक कामगिरी
➡ निर्भया पथक,
*कामगिरी* - स्मृतीभ्रंश असलेल्या वृद्ध महिलेस नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप सोडले
➡️ *निर्भया अधिकारी* -म पो उपनि शेंडकर, मपोशि झांबाडे, पोशि अहिरे, पो शि कुवर
➡️पथक कामगिरी -
हकीकत - दिनांक 8/ 10/21 रोजी दुपारी 1.30 वाजता महिला नावे लुबईना टीन वाला राहणार अंजीर वाडी भायखळा यांनी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येऊन कळविले की त्यांची आई सकिना टीनवाला वय 70 वर्षे यांना स्मृतीभ्रंश चा आजार असून त्या दुपारी एक वाजता घरातून निघून गेल्या आहेत तरी तात्काळ निर्भया पथकाच्या मार्फत तिने नमूद वृद्ध महिलेचा पोलीस ठाणे हद्दीत शोध घेऊन तसेच पोलीस ठाणे हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरा चा वापर करून पाठपुरावा घेऊन शोध घेत असताना नमूद वृद्ध महिलाही दारूखाना शिवडी परिसरामध्ये फुटपाथ वर थकलेल्या अवस्थेत मिळून आली सदर महिलेस आधार देऊन शहानिशा करून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले
30/09/2021
➡ *पोलीस ठाणे*- भायखळा पोलीस ठाणे, मुंबई
➡️ निर्भया पथक कामगिरी
➡ भेट दिली ची तारीख वेळ*
दिनांक 26/09/2021 रोजी 12:30 ते 13.30 वाजताच्या दरम्यान
*घटनास्थळ* - नारळवाडी कब्रस्तान झोपडपट्टी येथे एकुण 20ते 25 महिला यांची कॉर्नर मिंटींग घेतली.
➡️ *निर्भया अधिकारी* म पो,उ.नि शेंडकर, पो शि. कुवर, म पो शि झाबाडे
➡️हकीकत -
आज दिनांक 30/09/21 रोजी 16.30 ते 17.30pm दरम्यान भायखळा निर्भया पथकाचे वर नमूद अधिकारी यांनी कॉर्नर मिटींगचे आयोजन करून खालील मार्गदर्शन केले.
▪️मुलींचे व मुलांचे होणारे लैंगिक शोषण
▪️महिलांचे छेडछाडीचे गैरप्रकार इत्यादी बाबत घ्यायची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले तसेच असे काही प्रकार घडले किंवा निदर्शनास आले तर त्वरित त्या संदर्भात पोलिसांना कळवने बाबत सूचना दिल्या, व कोणत्याही प्रकारची असुरक्षितता वाटल्यास तात्काळ पोलीस मदत क्रमांक 100, 103 ,1297, 7715913103 यावर संपर्क करून तात्काळ मदत घेण्याबाबत माहिती देण्यात आली आहे आणि आपले रक्षण करण्याबाबत मार्गदर्शन
29/09/2021
➡️ भायखळा पोलिस ठाणे हद्दीतील हेरंब दर्शन बिल्डिंग, डीपी घोडपदेव मुंबई येथे निर्भया पथकातील अधिकारी म.पो.उपनिरीक्षक सारिका गटकुळ, सफौ रेवंडकर,मपोहवा/775 मुरूडकर, मपोशि130155/बहिरम यांनी सदर परिसरातील महिलांची मिटिंग घेऊन त्यांना
•महिला अत्याचार,
•स्वसंरक्षणबाबत घ्यावयाची काळजी,
•स्त्रियांनी घ्यावयाच्या काळजी,
•बालका विरुद्ध चे गुन्हे
•बालकांचे लैंगिक शोषण
•महिलांचे छेडछाडीचे गैरप्रकार इत्यादी बाबत घ्यायची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले तसेच असे काही प्रकार घडले किंवा निदर्शनास आले तर त्वरित त्या संदर्भात पोलिसांना कळवने बाबत सूचना दिल्या,आणि आपले रक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस मदत क्रमांक 100, 103 यावर संपर्क करून तात्काळ मदत घेण्याबाबत माहिती देण्यात आली
27/09/2021
आदरणीय महोदय,
भायखळा पोलीस ठाणे हद्दीत आज दिनांक 26.09.2021 रोजी 17.50 वाजेच्या दरम्यान मोबाइल 2 वरील पोलिस उपनिरीक्षक शिर्के यांना ऑल सेंट होम माजगाव याठिकाणी फूट पाथजवळ गर्दी दिसून आल्याने नमूद ठिकाणी एक अंदाजे पाच वर्षांचा मुलगा रडत असताना मिळून आला सदर मुलास त्याचा नाव पत्ता विचारले असता तो त्याचे नाव शिवांश असे सांगून पत्ता सांगता येत नव्हता सदर ठिकाणी निर्भया पथकाचे मोबाईल पाच वाहनावरील महिला पोलीस उपनिरीक्षक शेंडकर व पथक त्यांना तात्काळ बोलावून त्यांचे मार्फतीने मुलाला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने संपूर्ण नाव सांगितल्याने त्याच सोबत घेऊन आजूबाजूच्या परिसरात त्याचे पालकांचा शोध घेत असताना भंडारा टेकडी गार्डन परिसरामध्ये एका जोडप्याने येऊन शिवांश आहे त्यांचा मुलगा असल्याचे कळविलेवरून सदर बाबत शहानिशा करून ओळख पटवून नमूद हरवलेल्या मुलाच्या वडिलांचा सविस्तर जबाब नोंदवून सदरचा मुलगा शिवांश सचिन जाधव वय 05वर्षे हा त्याचे पालकांच्या ताब्यात सुखरूप परत देण्यात आला आहे .