25/05/2026
िल्हा विधी सेवा प्राधिकरण,रायगड-अलिबाग येथे मनोधैर्य अंतर्गत पिडितांकरिता दि.२१/०५/२०२६ रोजी विधी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पीडित नुकसान भरपाई योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सार्वजनिक सेवा, समाजातील महिलांची सुरक्षा आणि गोपनीयता, बाल न्याय व्यवस्थेत सुधारणा आणि बाल हक्कांचे संरक्षण यांविषयी लोकअभिरक्षक कार्यालयातील वकिलांनी माहिती दिली.
20/05/2026
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,रायगड-अलिबाग मार्फत तालुका विधी सेवा समिती,पाली कडून दि.१५/०५/२०२६ रोजी नालसा जागृती (तळागाळातील माहिती आणि पारदर्शकता उपक्रमासाठी न्याय जागृती) योजना २०२५ या उपक्रमांतर्गत पंचायत समिती, पाली यांनी आयोजित केलेल्या कृषी मेळावा या कार्यक्रमामध्ये उपस्थित नागरिकांना नालसा/मालसा द्वारे देण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेबाबतचे पॅम्प्लेट्स देण्यात आले.
06/05/2026
DLSA Nagpur Organized Legal Awaness Programme on Following Topics - 1 Protection of Child Sexual Offence Act, 2- Juvenile Justice Act, 3- Anti To***co Day at Village Varoda, Tq. Kamleshwar Dist- Nagpur.
02/05/2026
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली तर्फे आज दिनांक०१ मे, २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दीना बाबत गडचिरोली शहरातील बांधकाम कामगाराना माहिती पत्रके वाटून कामगार दिनाबाबत माहिती देण्यात आली.
30/04/2026
ल्हा विधी सेवा प्राधिकरण,रायगड-अलिबाग मार्फत तालुका विधी सेवा समिती,पेण कडून दि.२८/०४/२०२६ रोजी इंद्रनगर आदिवासीवाडी,वडखळ येथे विधी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये जागतिक आरोग्य दिन, जागतिक पृथ्वी दिन, बालविवाह प्रतिबंध, महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगार, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, नालसा (जागृती - तळागाळातील माहिती आणि पारदर्शकतेसाठी न्याय जागृती उपक्रम) योजना, २०२५ या विषयांवर पॅनल वकिलांनी उपस्थितांना माहिती दिली.
29/04/2026
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,रायगड-अलिबाग मार्फत तालुका विधी सेवा समिती,पनवेल कडून पॅनल वकिलांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.