Siddharth college of Arts Science and Commerce Alumni Association
siddharth college Alumni assosiation group
20/06/2025
येथील बहुजन समाजातील युवक शिकावा म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ' *सिद्धार्थ कॉलेज'* काढण्याचा विचार केला, या कॉलेजला ग्रॅंट ही मिळवली आणि विश्वविद्यालयाची मान्यताही प्राप्त करून घेतली. अस्पृश्य तसेच बहुजन समाजातील तरुण तरुणी या कॉलेजमध्ये शिकणार म्हणून त्यावेळच्या तथाकथित सवर्ण हिंदूंना पोटशूळ निर्माण झाला.
सिद्धार्थ कॉलेजला प्रथम विरोध केला तो गांधींचे जीव वाचवण्यासाठी बाबासाहेब यांच्याकडे शाब्दिक लोटांगण घातलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांच्या मुलाने अर्थात 'पंडित गोविंद मालवीय ' या व्यक्तीने, सिद्धार्थ कॉलेजची काही गरज नाही असे त्यांचे म्हणणे होते आणि हा प्रश्न त्याने थेट २६ मार्च १९४६ ला मध्यवर्ती विधानमंडळात विचारला. बहुजनांची मुले सवलती दरात शिकू नये म्हणून त्याचा सर्वतोपरी प्रयत्न चालू होता. याच विधांमंडळाच्या सेशन मध्ये बाबासाहेब यांनी गोविंद मालवीय याला सकाळचे तारे दाखवले आणि हजारो वर्षाचा इतिहास त्याच्या डोळ्यासमोर उभा करत यांचा #नकली_राष्ट्रवाद हाणून पाडला.
याच भाषणात बाबासाहेब यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालय म्हणजे ठराविक जातीच्या लोकांना ठराविक जातीच्या शिक्षकांकडून शिकवले जाणारे विश्वविद्यालय कसे आहे हे सांगत पंडित मालवीयचा दुटप्पीपणा उघडकीस आणला. याच विद्यापीठ मध्ये #कायस्थ मुलीला संस्कृत घेण्यासाठी बंदी आणली होती. ब्राम्हणेतर व्यक्ती शास्त्रात कितीही उच्च लायकीचा असला तरी विद्यापीठ या ब्राम्हणेतराला अध्यापक बनवू नये हा १९१६ साली केलेला अभंग ठरावबद्दल ही बाबासाहेब यांनी विचारणा केली.
सिद्धार्थ कॉलेजमध्ये सर्वाना प्रवेश मिळेल मग तो मुस्लिम असो किंवा पारशी, ब्राम्हण असो किंवा अस्पृश्य पण या कॉलेजमध्ये अस्पृश्याना प्रवेश, शिष्यवृत्ती व हॉस्टेल मध्ये विशेष सवलती मिळतील ही बाब बाबासाहेब यांनी अधोरेखित केली.
बाबासाहेब यांची सिद्धार्थ कॉलेज काढण्यामागची भूमिका लक्षात घ्यायला हवी ....
आज आपल्या सिध्दार्थ कॉलेजचा स्थापना दिवस ( २०जुन १९४६) आज कॉलेज स्थापन होऊन ७९ वर्ष होत आहेत गोर - गरीब शोषित समाजातील मुलं शिकावी हा महान उद्देश डोळ्यासमोर ठेवून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या कॉलेजची स्थापना केली ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा....
15/03/2025
सिद्धार्थ महाविद्यालयाच्या क्रीडाजगताची ऐतिहासिक कामगिरी!
जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई शहर, हे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. मुंबई शहरातील अनेक खेळाडू, जे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळतात, त्यांना या कार्यालयाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो.
मी जिमखान्याचा चार्ज स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या विविध क्रीडा योजनांचा संपूर्ण अभ्यास केला. त्यासाठी सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सूनतरी आणि उपप्राचार्य प्रा.रमेश झाडे उपप्राचार्य डॉ.ज्योती परुडकर, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. राजाराम दुगाने सर यांच्या सहकार्याने,प्रत्येक खेळामध्ये आपल्या खेळाडूंना सहभागी करण्याची संधी मिळाली. यामुळे अवघ्या एका वर्षात महाविद्यालयाला सुवर्ण आणि रौप्य पदकांसह असंख्य पुरस्कार प्राप्त झाले.
या यशामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचे लक्ष आपल्या महाविद्यालयाने वेधून घेतले. इतर महाविद्यालयांच्या तुलनेत आपल्या महाविद्यालयाचा प्रतिसाद उल्लेखनीय ठरला आणि त्यामुळे महाविद्यालयाला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
जर असेच सहकार्य महाविद्यालयाकडून मिळत राहिले, तर निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल.ते भविष्यात नावारूपाला येतील आणि सिद्धार्थ महाविद्यालयाचे नाव क्रीडाक्षेत्रात उज्ज्वल होईल.
मी गेल्या तीस वर्षांपासून आपल्या महाविद्यालयात कार्यरत आहे. विचार करा, या कालावधीत माझ्यापेक्षा अनेक दिग्गज व्यक्ती जिमखाना विभागात कार्यरत होत्या, पण याआधी कधीच एकही सन्मानपत्र मिळवले गेले नव्हते. ही खंत मला होती. परंतु प्राचार्य डॉ. अशोक सूनतरी, उपप्राचार्य प्रा. रमेश झाडे, उपप्राचार्य डॉ. ज्योती परुडकर, जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.राजाराम दुगाने सर, सीनियर कॉलेज आणि ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि संपूर्ण महाविद्यालयाच्या सहकार्याने अखेर आपण हे मोठे यश संपादन केले आहे.
या महत्त्वाच्या टप्प्यावर, मी जिमखान्याच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद 🙏
मेजर डॉ. भागवत किटेकर
चेअरमन जिमखाना, सिद्धार्थ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय , बुद्धभवन, मुंबई
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
जस्टीस पी. बी. सावंत
कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे 1986 मध्ये, शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी पोहोचले होते, त्यावेळी ते मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती होते. त्यावेळीही त्यांनी डॉ. आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज सुरू केले, त्यामुळे कोकणातून मुंबईत आलेल्या मुलाला वकिलीचे शिक्षण घेता आले. बाकी कॉलेजेसना संधी मिळत नव्हती. कारण, ती कॉलेजेस सकाळी दहा नंतर भरत असत. तर सिद्धार्थ कॉलेज सकाळी सात वाजता भरायचे, अशी आठवण सांगून, ते म्हणाले पोटासाठी मला हॉटेलमध्ये काम करावे लागत असे. सकाळी कॉलेज आपटून मी दहा नंतर कामावर जात असे. सिद्धार्थ कॉलेज त्यावेळी चर्चगेट स्टेशन समोरील एस.एन.डी.टी कॉलेजच्या जागेवर बैठ्या बराकीत भरत असे. त्या ठिकाणी आमचे कॉलेजचे वर्ग भरत असत अशी आठवण सांगून ते म्हणाले, आंबेडकरांनी माझ्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांची निकड ओळखून सकाळी सातचे वर्ग भरवले होते. त्यामुळेच मी हायकोर्टात जज होऊ शकलो. भोईवाड्याच्या बौद्धजन पंचायत समिती हॉलमध्ये 1987 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी पुन्हा बाबासाहेबांचे आभार मानले. ते म्हणाले मी आज सुप्रीम कोर्टात जज बनलो, ते केवळ बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेजची निर्मिती केल्यामुळेच. न्यायमूर्ती पी.बी. सावंत कोकणातून येऊन, मुंबईत लोहार चाळीत वास्तव्याला होते. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी मुंबईत शेतकरी कामगार पक्षात काम सुरू केले. कामगार आंदोलनात त्यांनी भाग घेतला. लोकांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोणी हॉल देत नसत. दिले तर अव्वाच्या सव्वा पैसे मागायचे. या रागातून त्यांनी प्लाझा थिएटर दादर (पूर्वीचा कोहिनूर सिनेमा) पश्चिमेला एक प्लॉट घेतला. तिथे शिवाजी मंदिर नाट्यगृह उभारले. छत्रपती शाहू सभागृह उभारले. मुंबईतील सांस्कृतिक चळवळीला त्यांनी चेहरा मिळवून दिला. मालवणी दशावतार, मामा वरेरकर, पु.ल. देशपांडे, शांता शेळके, विजय तेंडुलकर, प्रल्हाद केशव अत्रे, रत्नाकर मतकरी, वसंत कानेटकर, राम गणेश गडकरी, वासुदेव वामन खरे, विष्णुदास भावे, मच्छिंद्र कांबळे, वामन गोपाळ जोशी, अशोक पाटोळे यांना प्लॅटफॉर्म मिळवून दिला. पाटोळेंच्या 'आई रिटायर होतीये' चा पहिला प्रयोग, 17 ऑगस्ट 1989 ला शिवाजी मंदिर येथे झाला, त्यावेळी मी स्वतः तिथे हजर होतो. जब्बार पटेल यांचा 'घाशीराम कोतवाल', विजय तेंडुलकर यांचं कन्यादानचे येथेच प्रयोग झाले. प्रशांत दामले, विजय कदम, मंगेश कदम, अविनाश नारकर या रंगकर्मींचे हे दुसरे घरच होते.
1973 पासून ते मुंबई उच्च न्यायालयात गेले. न्यायमूर्ती म्हणून त्यांनी 1982 च्या एअर इंडिया दुर्घटनेची चौकशी केली होती. तर वकिली बरोबर त्यांनी न्यू लॉ कॉलेज मुंबई येथे 1966 मध्ये प्राध्यापकी केली. लग्न झाल्यानंतर त्यांनी दादर पूर्वेला कॉम्रेड डांगेंच्या घराजवळ घर घेतले. तेथून ते शिवाजी मंदिरच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी जात असत. त्यांच्यासोबत सी.एस. सावंत हे शेकापचे तीन वेळा आमदार राहिलेले त्यांचे घनिष्ठ मित्र सोबत असत. सी.एस. सावंत हे मेजर सुधीर सावंत यांचे वडील. न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे नाव भाजप सरकारने एल्गार परिषदेत गोवल्यामुळे, महाराष्ट्र आणि मुंबईतील एकाही रंगकर्मीने त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ज्याने आपल्याला प्लॅटफॉर्म मिळवून दिला, त्यांनाच हे लोक विसरली.
न्यायमूर्ती पी.बी. सावंतांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, वर्ल्ड प्रेस कौन्सिलचे चेअरमन पद भूषवले होते. मोदी काळातील मीडियाची गळचेपी बघून त्यांना खूप संताप यायचा. गोद्रा ट्रेन जळीत कांड, गुजरात दंगल यावर 2002 साली चौकशीसाठी जस्टिस कृष्ण अय्यर, पी.बी. सावंत यांचा चौकशी आयोग नेमला होता. त्यात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना दोषी ठरवले होते. त्यांच्यावर खटला भरून मनुष्यवधासाठी त्यांना दोषी ठरवावे असे त्यांचे मत बनले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना देशमुख यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या प्रभावाखाली जस्टीस पी. बी. सावंत यांची नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन, विजयकुमार गावित यांची चौकशी करण्यासाठी समिती गठित केली होती. त्यामुळे नवाब मलिक आणि सुरेश जैन यांना राजीनामा द्यावा लागला होता. चीफ जस्टीस दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीश जस्टिस मदन लोकूर , जस्टिस रंजन गोगोई, जस्टीस चेलमेश्वर, जस्टीस कुरियन जोसेफ या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. त्याला प्रथम पाठिंबा जाहीर करणारे न्यायमूर्ती सावंतच होते.
भाजप ही संधी नसून राष्ट्रीय आपत्ती आहे, त्याचे अनुभव भारतीय जनतेला पदोपदी येत आहेत, तरी भारतीय जनता ही अंधभक्ती सारखी वागते आहे असे त्यांनी 2015 मध्येच भाष्य केले होते. ते आज खरे ठरते आहे. 370 कलम काढल्यावर ते प्रचंड संतापले होते. ते म्हणाले नवजात बाळाला आईपासून दूर नेण्यासारखे आहे. 370 कलम हे काश्मीर आणि भारतातील एक कराराचा भाग होता. त्याने लेह- लडाखला प्रगतीची संधी लाभणार नाही आणि हे आता सत्यच ठरले. चीन लेह लडाखमध्ये घुसला आहे. त्यांचे सहा आमदार होते. ते आता हिल कौन्सिलमुळे गेले. आता त्यांचे प्रतिनिधी कोणीच नाही. म्हणून सोनम वांगचुक यांनी दिल्लीपर्यंत लॉंग मार्च काढला.
न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी सातत्याने 'द हिंदू', मेन स्ट्रीम, 'द इंडियन एक्सप्रेस' या दैनिकांमध्ये आणि मासिकांमध्ये सामाजिक आणि राजकीय प्रबोधन करणारे लिखाण केले आहे. त्यांची 'Grammar of Democracy', लोकतंत्र का व्याकरण , लोकशाहीचे व्याकरण, न्यायव्यवस्था व आरक्षण, कायद्याचे राज्य, धर्मचिंतन, सहकार चळवळ, लोकन्यायालय, क्रांतिकारक भगतसिंग, महात्मा फुले - सत्यशोधक चळवळ आणि समाज क्रांती, तरुणांना आवाहन, महाराष्ट्रातील समाज सुधारणांचे शिल्पकार, विद्यापीठ आणि पदवी, न्यायालयीन सक्रियता, समाज क्रांतीचा भारतीय मार्ग, भारतीय राज्यघटनेची मूलसूत्रे व अंमलबजावणी अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे.
लोकांचा वकील, मानवी हक्काचा रक्षणकर्ता, संविधानाचा रक्षणकर्ता ही ओळख त्यांनी कायम ठेवली. सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा वाढवणारे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तीना त्यांच्या चौथा स्मरण दिनी माजी विद्यार्थी संघाची विनम्र आदरांजली.
– 🙏🙏🙏
15/06/2024
*Admission process is going on in Siddharth College of Arts, Science and Commerce Fort , Mumbai -01
Siddharth College of Arts, Science and Commerce, Fort, Mumbai, founded by Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar. This eminent college offers admission to government aided courses
B. A., B. Com and B. Sc., M
Sc and Ph. D. degrees. Also admission process is open for self financed BMS, BAF, Bsc (IT) 1st year is going on. Students should confirm their admission by completing the admission process online as per the scheduled procedure.
University Link👇
https://muugadmission.samarth.edu.in
College website:
www.siddharthasc.edu.in
College admission Link👇
https://enrollonline.co.in/Registration/Apply/PESE
Dr. Babasaheb Ambedkar established the People's Education Society keeping in mind the interests of the hardworking, poor and underprivileged students. Since 1946, Siddhartha College has produced many eminent students who have made their mark across the world. This tradition continues till today.
11th, 12th Junior College in Siddhartha College of Arts, Science and Commerce and B.A., B. Sc, B.Com as well as BMS, BAF, Bsc (IT) in Senior College.
Business oriented undergraduate courses like these are available. M.Sc. Post Graduate in Physics, Chemistry, Botony and Ph. Students have the opportunity to study Physics, Chemistry, Marathi and Hindi for D.
The teaching staff of the college are experts in their respective subjects and have higher degrees. By connecting students who are deprived of mainstream education; The teaching staff here has been doing the duty of creating them consciously for many years with a sense of duty.
Therefore students who have passed 12th and degree can take admission to UG and PG courses respectively. In order to fulfill Dr. Babasaheb Ambedkar dream, college Principal Professor Dr. Ashok Sunatkari is appealing students from all sections of society to take admission in this esteem institute.
Students, you can contact respective teachers for FY admission in case of any query.
FYBSc: Dr. N. S. Chandan
9867742553
FYBA: Dr. P.T. Tamgadge
8169393969
FYBCom : Dr. C.N. Sonar
9867164167
28/12/2023
@@ वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेब.... अतिशय दुर्मिळ फोटो @@
मिलिंद कॉलेजच्या सहाव्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बाबासाहेबांनी Maharashtra and it's Three State या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.......
संदर्भ : मिलिंद अंक 1956
( personal collection of Prakash Tupe)
Prakash Tupe
Dr D R Jatav Reserch Center for Ambedkarism Aurangabad Maharashtra.
26/12/2023
अतिशय दुर्मिळ आणि कुणीही न बघितलेला मिलिंद कॉलेज अंक 1954 मधील संपादकीय मध्ये बाबासाहेब यांच्या संदर्भात लिहिलेले महत्वाची नोट/ टिपण... या अंकाचे संपादक होते Prof M P Rege ,Prof M N Wankhede,Prof N A Qureaishi, ,Dr S M Pinge
Prakash Tupe
Dr D R Jatav Reserch Center for Ambedkarism Aurangabad Maharashtra
12/12/2023
बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीने शिक्षण क्षेत्रांत फार मोठा दबदबा निर्माण केला होता. या सोसायटीवर भय्यासाहेबांना सदस्य करावे असे अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना वाटत होते. सामान्य कार्यकर्त्यांनी यासाठी खूप संघर्ष केला. याचा परिणाम म्हणून भय्यासाहेबांना ५ जुलै १९७० ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये घेण्यात आले. त्यांना सोसायटीचे सदस्य करण्यात आले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सदस्य असल्याने त्यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नेमणूक केली. या काळात त्यांनी विद्यापीठातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अडचणीत आणणाऱ्या निर्णयांना विरोध केला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमधील ऐतिहासिक, लोककल्याणकारी कार्य पाहून कोणीही तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाही.
२३ व २४ नोव्हेंबरला 1968 मुंबईमधील नायगावच्या पुरंदरे स्टेडियममध्ये धम्म परिषद भरली होती.' या परिषदेत महाराष्ट्रातील मराठी बौद्ध जनतेकडून 'बुद्ध आणि त्यांचा 'धम्म' या ग्रंथाची मराठी आवृत्ती निघावी अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी अजूनही पूर्ण झाली नव्हती. भय्यासाहेब पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सदस्य झाल्यावर त्यांनी या मागणीला उचलून धरले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनाने 'भय्यासाहेबांच्या रेट्यामुळे या ग्रंथाची मराठी आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. मराठीमध्ये ग्रंथाचा अनुवाद म.भि. चिटणीस, शा. श. रेगे व घनशाम तळवटकर यांनी केला.
त्यापूर्वी हा ग्रंथ १९५७ मध्ये इंग्रजीत प्रकाशित झाला. १९६१ मध्ये हिंदीत प्रकाशित झाला. या ग्रंथाची मराठी आवृत्ती १९७० मध्ये प्रकाशित झाली. हा ग्रंथ मराठीमध्ये प्रकाशित झाल्याने ग्रामीण भागातील सामान्यजनांना बौद्ध धम्माचे आचरण करणे व आकलन करणे सोयीचे झाले.
सुर्यपुत्र यशवंत आंबेडकर, उपाख्य भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
29/10/2023
सिद्धार्थ महाविद्यालय, आणि मिलिंद महाविद्यालय दरवर्षी जर्नल पब्लिश करते, 1950 पासून च्या अंकांचा आपण माजी विदयार्थी संघा मार्फत शोध घेत आहोत...
आपल्या group मधील, सन्मा. सदस्य वा त्यांच्या ओळखीच्या कुणाकडे यातील अंक उपलब्ध असल्यास plz कळवावे....
09/10/2023
*हिंदू कोड बील- आणि PES*
_"महिलांनी किती प्रगती साधली आहे यावरून मी समाजाची प्रगती मोजतो._ " - बी.आर. आंबेडकर
वरील वाक्याला अनुसरून महिलांच्या स्वातंत्र्यासाठी बाबासाहेबांनी, हिंदू कोड बिल 11 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेत सादर केले. 9 एप्रिल 1948 रोजी निवड समितीने त्याचा संदर्भ दिला, 24 फेब्रुवारी 1949 रोजी ते संसदेत मांडले गेले. आणी 4 वर्षांच्या विचारविनिमयानंतरही ते अनिर्णित राहिले. बाबासाहेबांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, he "killed and died unused and unsung."
स्वतंत्र भारतीय संसदेत कोणत्याही एका विधेयकावरील ही बहुधा प्रदीर्घ चर्चा होती. काँग्रेस हिंदू कोड बिलावर स्पष्टीकरण देण्यास उत्सुक नव्हती आणि त्यामुळे आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.
मिलिंद महाविद्यालयाचा found stone ज्या तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बाबासाहेबानी बसविला, त्यांनीच हिंदू कोड बिलावर, जरी ते लोकसभेत पारित झाले तरी त्यावर मी सही करणार नाही अशी भूमिका घेतली होती.
*1947 ते 1951 पर्यंत ची हिंदू कोड बिलाची chronology आपण समजून घ्यायला हवी* ..
एकीकडे हा विरोध होत असताना, बाबासाहेब दुसरीकडे बिलाच्या समर्थनात जनभूमिका बनविण्याचे प्रयत्न करत होते या कामी त्यांना,सोहनलाल शास्त्री यांनी खूप मोलाची मदत केली. त्यांच्यावर बाबासाहेबांनी सोपवलेली जबाबदारी त्यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडली.
बाबासाहेबानी साल 1945 ला *PES* स्थापन करून , सिद्धार्थ महाविद्यालयाची 1946 ला स्थापना केली तेव्हा ते म्हणतात की, The People’s Education Society’s objective is not merely to give education but to give education in such a manner as to promote intellectual, moral and social democracy. This is what modern India needs and this is what all well wishers of India must promote.”
___Dr.B. R. Ambedkar.
यालाच अनुसरून,
सिद्धार्थ व मिलिंद महाविद्यालयाने आपली परंपरा कायम राखत,या बिलाच्या समर्थनात लोकांची मनोभुमिका बनविण्यासाठी आपले योगदान दिले. हिंदू कोड बिला संदर्भात ज्या चर्चा सिद्धार्थ आणि मिलिंद महाविद्यालयात झाल्या, त्या महत्वपूर्ण ठरतात, आणि माजी विद्यार्थी म्हणून आपणास त्या ठाऊक असायला हव्यात...
पहिली चर्चा आहे सिद्धार्थ महाविद्यालयातील,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईत असल्याचा सुयोग साधून सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थी-पार्लमेंटने त्यांना हिंदू कोड बिलावर भाषण करण्याची विनंती केली. सिद्धार्थ कॉलेज हे डॉक्टरसाहेबांचेच अपत्य असल्याने, त्यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीस मान दिला आणि हिंदू कोड बिलावर भाषण करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे, ता. *११ जानेवारी १९५०* रोजी बुधवारी सकाळी ९.०० वाजता, त्यांचे भाषण सुंदराबाई हॉलमध्ये भरलेल्या विद्यार्थी पार्लमेंटच्या अधिवेशनात झाले,बुधवारी सकाळी ८.०० लाच सुंदराबाई हॉल विद्यार्थ्यांनी चिक्कार भरून गेला होता. विद्यार्थीनींची संख्या बरीच मोठी होती. श्रोते म्हणून बाहेरील प्रतिष्ठित मंडळीही हजर होती. तेव्हा या बिलावर बोलताना बाबासाहेब म्हणाले की,
"या *बिलाच्या कलमांची तपशीलवार अशी माहिती तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांना नसेल. कारण, तुम्ही तुमच्या नित्याच्या अभ्यासक्रमात आणि परीक्षेत गुरफटलेले असता तरीपण हे बिल आजच्या व भावी पिढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असल्याने व त्यामुळे आपल्या देशाचे कोणकोणते फायदे होणार आहेत हे नागरिक या नात्याने माहीत होणे जरूर असल्याने सदर बिलासंबंधीचे काही विशेष मी सांगणार आहे.
हिंदू कोड बिलामागे मुख्यतः दोन उद्दिष्टे आहेत. हिंदू कायदा सर्व देशभर सुसूत्र करणे हे पहिले उद्दिष्ट आहे. यालाच इंग्रजी भाषेत ' *कोडीफिकेशन* म्हणतात आणि हिंदू कायद्याच्या काही शाखांची सुधारणा घडविणे हे दुसरे उद्दिष्ट आहे. या दुसऱ्या उद्दिष्टावरच सर्व वादविवाद केंद्रित झाला आहे. ..
या भाषणात त्यांनी सविस्तर अशी चर्चा या बिलावर, विध्यार्थ्यांना करून दिली.
दुसरे उदाहरण या बाबतीत मिलिंद महाविद्यालयाचे आहे जिथे *1951* च्या डिसेंबर मध्ये हिंदू कोड बिलावर वादविवाद स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि बाबासाहेब स्वतः प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याबद्दल *महासूर्याच्या सानिध्यात* *ज्ञानभूमीतील पंचाहत्तर दिवस* या पुस्तकात मिलिंद चे माजी विद्यार्थी, लेखक टी.एन. गायकवाड, त्या debate बद्दल सांगतात,
The subject of debate is “The women have no rights in their ancestors' properties".
कसा वाटला विषय? सगळ्यांनी एकदम टाळ्यांचा कडकडाट केला. नोटीसने कॉलेजीयन्सना भाग घेण्याची सूचना केली. विद्यार्थी भाग घेण्यास तयार पण झाले. प्रोफेसर वानखेडे मिस नायडू -सेकंड इयर ह्या विद्यार्थीनीची तयारी करून घेत होते. वादविवाद स्पर्धेच्या तयारीत बहुतेक ब्राम्हण मुले, हक्क नसावा या बाजूचे तर ब्राम्हणेत्तर हक्क हवा अशी होती यादी.!
ठरलेल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आले. सोबत माईसाहेब होत्या. मुक्काम होता स्टेट होटेलमध्ये. त्याला औरंगाबाद होटेल सुध्दा म्हणत. पुढे-पुढे त्याचे नाव अशोक होटेल असे झाले.ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब, सौ. माईसाहेब कॉलेजमध्ये आले. ६ नंबरच्या हॉलमध्ये व्यवस्था केली होती. प्रेसिडेन्ट प्रो. रेगे होते. त्यांनी डिबेटींग विषय सुचवला, "दी विमन्स हॅव नो * राईटस् इन देअर अॅनसिस्टर्स प्रॉपर्टीज". ऐकताच बाबासाहेब आश्चर्याने म्हणाले, "व्हॉट?" रेगॅनी सब्जेक्ट रिपीट केला. तेंव्हाचे उद्गार मात्र आश्चर्याचे होते. डॉ. बाबासाहेबांचे. "ओ माय गॉड! पार्टी ऑफ ए हिन्दू कोड बील, कॅरी ऑन यूवर डिबेट.
यादी प्रमाणे विद्यार्थी पुकारलेल्या नावा प्रमाणे येत, विचार मांडत. दोघा-दोघां प्रतिस्पर्ध्याची भाषणे झाली. मध्येच बाबासाहेब म्हणाले, "नो लेडी स्टूडन्ट पार्टिसिपेटींग इन द डिबेटींग? दे हॅव टू फाईट देअर सेम राईट."
अन् तेव्हढ्यांत प्रो. रेगेंनी मिस नायडू सेकंड इयर विल स्पिक नाऊ ऑन दी सब्जेक्ट. असे अनाऊन्स केले.
"व्हेरी गुड! बी बोल्ड माय गर्ल'. म्हणत बाबासाहेबांनी प्रथम टाळी वाजविली. सभागृहांत पण टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेसिडेन्टच्या इशाऱ्याने बंद झाल्या. मिस नायडू आपल्या भाषांत अगोदरच्या वक्त्याच्या भाषणाचा धागा धरून त्याचे मुद्दे खोडत होती. एकाने असा मुद्दा मांडला होता. मुलीचे हात पिवळे करण्यास मुलीच्या बापाला प्रसंगी शेती विकायचा प्रसंग येतो. हा मुद्दा खोडताना त्या म्हणाल्या, समविचारी, शिक्षीत, सुशिल अशा जातीविरहीत मुलांबरोबर कोर्ट मॅरेज केले तर शेती विकावी लागणार नाही. आंतरजातीय विवाह करण्यास आई वडिलांनी स्वखुशीने परवानगी दिल्यास बापास कर्ज होणार नाही. माझ्या या बंधूला भिक सुध्दा मागावी लागणार नाही. हायर एजुकेशन घेतात आणि विचार लोअर.
"Shame! Shame! To my poor brother!"
हे वाक्य ऐकून बाबासाहेब "हिअर! हिअर" म्हणून टाळी वाजविली. दुसरा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला. माझा बंधू म्हणतो, "मुली कपड्यावर, गंध, पावडर, तेल साबण यावर फुजूल खर्च करतात. मिस नायडूंनी हळूच मार्मिक पणे चिमटा काढला. होय! मुली सौंदर्य प्रसाधने वापरतात ही गोष्ट जगजाहीर आहे. आम्ही दोघी-चौघी सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी दुकानात गेलो. व्हरायटीचा डिमांड केला. बाईसाब अभी अभी यह व्हरायटीज् बाबासाहब के कॉलेजके बच्चोंने खरीद ली. मै आपको कल मँगवा दूंगा! आप कल आना! हे वाक्य ऐकताच हॉलमध्ये हास्याचे फव्वारे उडाले. लगेच धागा धरून मिस नायडू म्हणाली. मला माझ्या बंधूकडून कबुलीची पावती मिळाली बस्स! मुलांना कशाला सौंदर्य प्रसाधने ? लग्नाच्या वेळी, मुलीला पहायला जातात ना? हाच रिवाज चालू चोहिकडे. “मुलगी पाहणे!” मग नटवू नये का मुलीला ? पण कुठे आहेत दुकानात सौदर्य प्रसाधन साहित्य?....
आमच्या साड्यांचा खर्च. कपडे तर वापरावीच लागणार ना! मग खर्च हा होणारच. याची मित्रांची चर्चा. चार पँट, चार शर्ट, दोन सूट काय-काय सांगतात. अंग झाकायल एक ड्रेस पुरे; पण नाही, काहींना रोज-रोज ड्रेस बदलावा लागतो. काही महाभाग आमच्या कॉलेजमध्ये सकाळ-दुपार तासा-तासाला ड्रेस बदलणारे. कोण बघतयं हो ह्यांना? सगळीकडे बुलंद हास्य...
ह्यांनाच कपड्यांचा शौक, हौस, वर म्हणायच साड्यांचा खर्च. शेवटचा मुद्दा सांगून मी माझे भाषण आटोपते घेते. कपडे-गंध पावडर, यांचा खर्च फुजूल खर्च, कपडे वर्षाकाठी किंवा सणावाराला खरेदी, गंध- पावडर तीन चार महिन्यात खरेदी. तरीही मुली उधळ माधळ, वारेमाप खर्चीक असतात. माझे बांधव हायर एज्यकेशन घ्यायला आलेत. वडिल पैसे पुरवतात. खर्च जपून करावा, आपलं शिक्षण पूर्ण करावं. म्हणतात, "काखेत कळसा अन् गावाला वळसा. अगदी तस्सेच. चार-पाच मित्र जमायचे रात्री "ड्रिंक-डिनर" किती पैसे खर्च झाले. त्या अवस्थेत भान नसते. म्हणे आम्ही मुलीच जादा खर्च करतो. स्वतःच्या डोळ्यांतल मुसळ दिसत नाही, मात्र दुसऱ्याच्या डोळ्यांतले कुसळ मात्र चटकन दिसते.
या एवढ्यावरून जर समजून घेतील की, एका आई-बापाची लेकरं भाऊ-बहीण. *पण बहिणीला हक्क देणार नाही, हा हेका सोडून देऊन विद्यासंपन्न बनून नविन विचार धारा समजून विपत्ती काळांतच बहिणीस मदत करावी, ही उदात्त भावना ठेऊन समान हक्क देण्यास तयार होवो.* *शिक्षणाने त्यांना ही सुबुद्धी सुचो. थँक यू ऑफ ऑल.*
मिस नायडू मुद्दे खोडत असतांना बाबासाहेबांची चुळबुळ चालू होती. माईसाहेब त्यांच्याकडे पाहून खाणाखुणा करीत होत्या. पण कशाच काय? मिस नायडूचे भाषण संपल अन् लगेच बाबांनी अध्यक्षांना बोलण्याची संधी मिळावी अशी विचारणा केली.
प्रो. रेगेंनी, “वाय ऑल मिन्स? यू कॅन !" थैंकस! माईसाहेबांनी दामूकडं पाहिलं. रंगित सरबत ग्लास आणला. आईसाहेबांनी औषधी मात्रा कॅपसूल बाबासाहेबांना दिला. या वेळेस थोडे नाराजीने पण कॅपसूल घेऊन पाणी पिऊन उभा राहिले..
My Dear President and Students,
You Have Listened to Some Speech. No rights and some of them demand rights. Demand and capture are different things. Rights Not Gots Far Demanding. Demand is some kind of begging.
Rights Must Be Captured By Struggle.
In That Hindu Religion.The Manuusmriti has returned no rights to women and Shudras. It is the main thing they are following religion laws but saying in other words, that expenditure real and wasted, you know man has to need
That's Why Spending Is Necessary. (कोटाच्या खिशातून सोनेरी साखळी असलेले घड्याळ काढून दाखवित म्हणाले) हाऊ मेनी ऑफ द डझन यू नो. (खिशातून पेन काढून दाखवित म्हणाले) हाऊ मेनी आय हॅव द पेनस् ? यू नो मोर दॅन डझन. You are supposing it is wasted but these are my needs. Need and spend depend upon individuality, personally how to spend. Pens, Watch, Clothes are the need of person. Nobody Can Suggest How To Spend. Income and spend must be in margin I know! As Well As A Know How To Live In A Society.
I don't like this philosophy. The man wore a loincloth and the woman nothing. There may be some manners to behave in the society so for that. There Must be spend something.
You all are getting higher education, be clever, keep some manners of society. You have to live old thinkings. Imagine Yourself Only.
I am living smoothly my life and my sister is handicapped. At in this position your sisters have no right. Her ancestors Properties. You Both Brother And Sisters The Same Children Of Your Same Parents Don't Give To The Sympathy. Give the right to her in the properties.
Thank you of all.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Fort
Mumbai
400001
